' जगात पहिल्यांदाच लागू होणार Syllabus नसलेली शिक्षणपद्धती – InMarathi

जगात पहिल्यांदाच लागू होणार Syllabus नसलेली शिक्षणपद्धती

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लहान असताना अभ्यास कर म्हटलं की आपल्याला कंटाळा का बरं यायचा? कारण दरोरोज अभ्यास करावा लागायचा. अभ्यास’ द्यायचं कोण तर शिक्षक, कारण शिकवलेल्या Syllabus ची उजळणी व्हावी म्हणून आणि शिक्षकांना देखील हा ठराविक Syllabus ठराविक वेळेत पूर्ण करावा लागायचा मग ते Syllabus पूर्ण करण्यावर भर द्यायचे, किंबहुना मग या Syllabus चा लोड आपल्या खांद्यावरही यायचा आणि सारखा अभ्यास करावा लागल्याने आपण अभ्यासाला, शाळेला, शिक्षकांना आणि विशेषत: शिक्षणालाच शिव्या द्यायचो. पण समजा Syllabus नावाचा हा वैतागचं काढून टाकला तर? म्हणजे शिक्षण Syllabus Free असेल तर..???

syllabus-free-education-sysyetm-finland-marathipizza01

स्रोत

जगातील सर्वोत्तम ‘Education System’ म्हणून फिनलॅंड देशाकडे पाहिले जाते.

शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्व प्रकारच्या ‘International ratings’ मध्ये हा देश नेहमी अव्वल असतो. याच फिनलॅंड देशाने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. तो निर्णय म्हणजे संपूर्ण शिक्षण Syllabus Free करणे. या निर्णयानुसार Syllabus मधून सर्वच विषय काढून टाकले जाणार आहेत अर्थात Syllabus चं नसेल. आता इथे ना गणिताचे, भाषेचे, विज्ञानाचे किंवा इतिहासाचे कसले म्हणजे कसलेच क्लास घेतले जाणार नाहीत.

syllabus-free-education-sysyetm-finland-marathipizza02

स्रोत

यावर बोलताना तेथील प्रमुखांनी सांगितले कि,

सध्या फिनलॅंडमध्ये देखील पारंपारिक पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. पण २१ व्या शतकात आता आपल्याला नव्या पद्धतीच्या शिक्षणाची गरज भासणार आहे जे येणाऱ्या भविष्यात आपल्या फायद्याचे ठरेल.

या नवीन पद्धतीनुसार फिनलॅंडमधील विद्यार्थी आता वेगवेगळ्या विषयाचे शिक्षण न घेता हेच शिक्षण Events अथवा Interdisciplinary फोरमॅटमध्ये घेतील.

उदाहरणार्थ, पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास भूगोल आणि गणिताच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शिकवला जाईल. तसेच ‘Working in a Cafe’ सारखे कोर्स घेऊन विद्यार्थी इंग्रजी भाषा, अर्थशास्त्र आणि कम्युनिकेशनचे शिक्षण घेऊ शकतात. म्हणजे त्यांना एकाच गोष्टीमधून विविध विषयांचे ज्ञान मिळेल.

सर्वप्रथम ही नवीन शिक्षणपद्धती १६ वर्षांच्या वरील विद्यार्थ्यांसाठी लागू केली जाईल. या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना हवा तो टॉपिक निवडून शिक्षण घेता येईल. यावेळेस त्या विद्यार्थ्याला हे विचारात घेऊन टॉपिक निवडायचा आहे की त्याला मोठे झाल्यावर काय बनायचे आहे. जेणेकरून समजा एखाद्या विद्यार्थ्याला मोठे होऊन इतिहासाबद्दल संशोधन करायचे असेल तर त्याला गणित वगैरे अतिरिक्त विषय शिकण्याची गरज भासणार नाही.

फिनलॅंडची Education System टीमवर्कच्या आधारावर चालते. यात शिक्षक आणि विद्यार्थी दोहोंचा समावेश होतो. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एका टीमप्रमाणे कार्य केले तर शिक्षण अधिक चांगल्या पद्धतीने प्रदान केले जाऊ शकते असे तेथील तज्ञांचे मत आहे.

syllabus-free-education-sysyetm-finland-marathipizza03

स्रोत

एकीकडे फिनलॅंड सारखा लहान देश एका अमुलाग्र बदलाच्या दिशेने पाउल टाकत आहे तर दुसरीकडे भारतासारखा मोठा देश अजूनही खिळखिळ्या झालेल्या Education System वर कसाबसा तग धरून उभा आहे.

आपल्या शिक्षण व्यवस्थेला देखील लक्षणीय स्वरूपाच्या बदलांची गरज आहे तरच १००% साक्षरतेचे उद्दिष्ट आपण गाठू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?