' इस्रोच्या विश्वविक्रमात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या ‘प्लॅनेट’ची गोष्ट! – InMarathi

इस्रोच्या विश्वविक्रमात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या ‘प्लॅनेट’ची गोष्ट!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

इस्रो ने 104 उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करून विश्वविक्रम केला आहे. भारताच्या अवकाश संशोधन संस्थेच्या कालच्या यशानंतर सर्वांचा अभिमान अजून वाढला आहे. ह्या 104 उपग्रहांपैकी फक्त 3 उपग्रह भारताचे होते. बाकीचे सर्व उपग्रह वेगवेगळ्या देशांचे असून 88 फक्त एकाच ‘प्लॅनेट‘ ह्या कंपनीचे होते. 104 ह्या विक्रमी आकड्यात मोठा वाटा उचलण्याच्या निमित्ताने जरा जाणून घेऊया प्लॅनेट कंपनीबद्दल..!

Isro mission pslv marathipizza

स्रोत

2010 मध्ये नासाच्या निवृत्त संशोधकांनी ‘प्लॅनेट लॅब्स’ ची सुरुवात केली. जिचं एकमेव लक्ष्य होतं पृथ्वीच्या एकुण एका कोपऱ्याचा imaging द्वारे अभ्यास करता यायला हवा.

पाच वर्षांपुर्वी प्लॅनेट कंपनीने एक लक्ष्य डोळ्यासमोर ठेवलं. ‘पृथ्वीच्या प्रत्येक भागाचा प्रत्येक दिवशी फोटोत संग्रह करणे – imaging

planet-company-marathipizza

स्रोत

त्या imaging चा वापर जर चांगल्या कामासाठी केला तर बऱ्याच नैसर्गिक बदलांवर बारीक लक्ष ठेवता येईल. वणवा, पूर, भूकंप अश्या आवाक्याबाहेरच्या संकटांची कल्पना आधीच येऊन मानवाला तयारी करायला वेळ मिळू शकेल.

प्लॅनेट टीमच्या मते ह्या कामासाठी 100 ते 150 उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत गरजेचे आहेत.

काल प्रक्षेपित करण्यात आलेले 88 डव्ह उपग्रह ज्यांना Flock 3p असंही ओळखलं जातं, PSLV रॉकेटमधुन श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून प्रक्षेपित केले. डव्ह उपग्रहांचं हे 15वं तर भारतातून – म्हणजेच बाहेरील राष्ट्रतून दुसरं प्रक्षेपण होतं.

dove-satellites-marathipizza

स्रोत

आता प्लॅनेट कंपनीचे 144 उपग्रह कक्षेत असून त्यांचा काम शेवटच्या स्टेज वर आलं आहे. 88 उपग्रह अंतराळात गेल्यानंतर आपोआप बॅच मध्ये वर्गीकरण होण्यासाठी प्रोग्रॅम केले आहेत – autonomous.

प्लॅनेटचं काम फक्त 88 उपग्रह बनवणे एवढंच दिसत असलं तरी त्यांनी ground station चं जगातील सर्वात मोठं प्रायव्हेट नेटवर्क तयार केलंय. उपग्रहांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे, त्यांची विशिष्ट कंट्रोल सिस्टीम बनवणे ह्यांसारखी न दिसणारी कामेही त्यांनी केलीत.

प्लॅनेट ने एक नवीन सॉफ्टवेअर तयार केलं आहे. ह्या सॉफ्टवेअर ने प्लॅनेटच्या ग्राहकांना, संशोधकांना, सरकार आणि वेगवेगळ्या समाजसेवा संस्थांना उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग करता येईल.

planet-softwares-marathipizza

स्रोत

तांत्रिक कामासोबतच पैसे उभा करणे, परवाना काढणे, प्रक्षेपणासाठी बुकिंग करणे आणि त्यासोबतच शेकडो पार्टनर्स ची फळी तयार करणे ह्यांसारखीही कामे केली.

एकूण दोन विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत.

1. सर्वात जास्त उपग्रह एकाच रॉकेटवरून प्रक्षेपित करणे

2. एखाद्या कंपनीचे खाजगी 149 उपग्रह अंतराळात असणे.

तीन महिन्यात Flock-3p आपल्या कामास सुरुवात करतील असं गणित प्लॅनेटचं आहे. 200mbps ची डाऊन लिंक असलेलं प्रत्येक Flock 3p दिवसाला 20 लक्ष चौ किमी जागेचे imaging करू शकतं.

flock-3p-marathipizza

स्रोत

प्लॅनेटचे डायरेक्टर ROBBIE SCHINGLER टीमच्या यशाबद्दल सांगतात,

ह्या सगळ्या प्लॅनेटच्या यशाचं श्रेय निर्विवादपणे प्लॅनेटच्या टीम ला जातं ज्यांनी ह्यासाठी अथक परिश्रम घेतलेत. पाच वर्षांपासुन आम्हाला त्यांचा आदर होता आणि आज आम्ही त्यांचे आभारी आहोत.
आता महत्वाचे म्हणजे ही सगळी माहिती गरजूंना पुरवणे पण सध्या आमच्या तुमच्या ह्या यशानंतर त्यांनी एक पार्टी नक्कीच कमावली आहे.

planet-labs-marathipizza

स्रोत

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?