त्यांचे मेंदू सत्र्यांच्या आकाराएवढे होते म्हणे, शोध लागलाय एका नव्या मानवी प्रजातीचा !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मानवाच्या उत्क्रांतीविषयी आजही  २१ व्या शतकात संशोधन सुरू आहे आणि अजूनही त्याचे ठोस कारण वा त्या मागचे ठोस निष्कर्ष मिळालेले नाहीत, ह्यावरून आपण अंदाज बंधू शकतो की हा विषय किती गहन आहे. आजही कित्येक वैज्ञानिक संशोधक, दिवस रात्र एक करून मानवी इतिहासाच्या शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्याच दिशेने एक यशस्वी पाउल पडले आहे असे म्हणता येईल.

homo-naledi-marathipizza01
pmdvod.nationalgeographic.com

दक्षिण अाफ्रिकेमध्ये मानवाच्या नव्या प्रजाती शोधल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. संशोधकांच्या मते जोहान्सबर्गपासून सुमारे ५० किमी दूर ‘रायझिंग स्टार’ गुहांमध्ये गाडलेले १५ मानवी सांगाड्यांचे अर्धवट भाग आढळले आहेत. रिपोर्टनुसार त्यांची लांबी ५ फूट आणि वजन ४५ किलोपेक्षा अधिक आहे

=====

=====


homo-naledi-marathipizza02
wikimedia.org

सायन्स मॅगझिन ‘ईलाइफ’ मध्ये पब्लिश स्टडी रिपोर्टवरून असे लक्षात येते की, या प्रजातीतील लोक धार्मिक कामेही करायचे. संशोधकांच्या मते या शोधामुळे पूर्वजांबद्दलचे आपले विचार बदलण्यास मदत होणार आहे. या नव्या प्रजातीला ‘होमो नलेडी’ नाव देण्यात आले आहे. स्थानिक भाषेत त्याचा अर्थ ‘स्टार मॅन’ असा होतो.

रिपोर्टनुसार, नलेडीचा मेंदूही फार छोटा असतो. त्याचा आकार जवळपास एका संत्रीएवढा असावा. गुहेत खोदकाम करताना संशोधकांना १५५० च्या आसपास अवशेष आढळले आहेत. हे नलेडी प्रजातीतील १५ नवजात बालके आणि प्रौढांच्या सांगाड्याचे भाग असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ही प्रजाती पृथ्वीवर किती वर्षांपूर्वी अस्तित्वात होती याबाबत संशोधकांना अद्याप माहिती मिळालेली नाही.

homo-naledi-marathipizza03
wikimedia.org

=====

=====

संशोधकांच्या टीमचे नेतृत्व करणारे प्रोफेसर ली बर्गर यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की,

त्यांच्या मते नवी प्रजाती ‘जिनियस होमो’ म्हणजे आधुनिक मानवासारखी असू शकते. त्यांच्या अंदाजानुसार ही प्रजाती सुमारे 30 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये राहत असावी.

नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे प्रोफेसर क्रिस स्ट्रींगर यांनी नलेडी यांचा हा शोध अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले,

आम्हाला मानवाच्या अधिकाधिक प्रजातींबाबत माहिती मिळत आहे. त्यावरून मानवाच्या विकासासाठी निसर्गाने नेहमीच प्रयोग केले असल्याचे समोर येते. रिपोर्टनुसार नव्या प्रजातीचे अवशेष जोहान्सबर्गच्या विटवाटर्सरँड युनिव्हर्सिटीच्या एका सेफ रूममध्ये ठेवले आहेत. ही खोली एखाद्या बँकेच्या लॉकरएवढीच सुरक्षित आहे.

homo-naledi-marathipizza04
cnn.com

ह्या शोधामुळे मानवी उत्क्रांतीबद्दल जाणून घेण्याच्या विषयात क्रांतिकारी बदल घडून आला आहे हे मात्र नक्की !

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?