' जाणून घ्या, पॉवर ऑफ अटॉर्नी विषयी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे – InMarathi

जाणून घ्या, पॉवर ऑफ अटॉर्नी विषयी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही कधीतरी कुठेना कुठे पॉवर ऑफ अटर्नी विषयी नक्कीच ऐकले असेल. त्याविषयी वेगवेगळे प्रश्न सुद्धा तुमच्या मनात आले असतील, की काय असते पॉवर ऑफ अटर्नी? किती प्रकारची असते पॉवर ऑफ अटर्नी? कोण तयार करू शकते पॉवर ऑफ अटर्नी वगैरे वगैरे!

चला मग या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेऊया. हा लेख वाचल्यानंतर तुमच्या मनात पॉवर ऑफ अटर्नी विषयी कोणतीच शंका राहणार नाही.

power-of-attorney-marathipizza01

 

१. काय आहे पॉवर ऑफ अटर्नी?

पॉवर ऑफ अटर्नी हा एक असा लिखित दस्तावेज असतो जो तयार करणाऱ्या व्यक्तीला ‘प्रिंसिपल’ म्हटले जाते आणि ज्याच्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी  बनवली जाते त्याला ‘एजंट’ म्हटले जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, पॉवर ऑफ अटर्नी एजंटला प्रिंसिपलची कामे किंवा अधिकार हस्तांतरित करते. एक विशेष गोष्ट अशी आहे की, पॉवर ऑफ अटर्नी तयार झाल्यानंतर एक एजंट ती सर्व कामे करू शकतो आणि सर्व अधिकार वापरू शकतो जे प्रिंसिपल वापरायचा.

 

२. पॉवर ऑफ अटर्नी किती प्रकारची असते?

पॉवर ऑफ अटर्नी दोन प्रकारची असते, ज्यामध्ये पहिली ‘पॉवर ऑफ अटर्नी जनरल’ आणि दुसरी ‘पॉवर ऑफ अटर्नी स्पेशल’ बनवली जाते. पॉवर ऑफ अटर्नी जनरल नुसार एजंटला प्रिंसिपलची जवळपास सगळी कामे करण्याचा हक्क कायद्यानुसार प्राप्त होतो आणि पॉवर ऑफ अटर्नी स्पेशलनुसार एजंटला प्रिंसिपलची काही ठराविक विशेष कामे करण्याचा हक्क कायद्यानुसार प्राप्त होतो.

 

३. पॉवर ऑफ अटर्नी कोणकोणत्या कामांसाठी बनवली जाते?

पॉवर ऑफ अटर्नी ही विशेषत: करार करण्यासाठी, अधिकार हस्तांतरित करण्यासाठी, अस्थिर आणि स्थावर असलेल्या मालमत्तेशी निगडीत कामासाठी, आयकर परतावा करण्यासाठी तसेच इतर व्यक्तींशी कायदेशीररित्या व्यवहार करण्याचा हक्क प्रदान करण्यासाठी बनवली जाते.

power-of-attorney-marathipizza02

 

४. पॉवर ऑफ अटर्नी कोणाच्या हितासाठी बनवली जाते?

पॉवर ऑफ अटर्नी हा खूप महत्त्वाचा सरकारी कागद असतो. याच कारणामुळे पॉवर ऑफ अटर्नी मधून एजंट निवडण्याआधी खूप काळजी घेणे गरजेचे आहे, कारण पॉवर ऑफ अटर्नी बनवल्यानंतर एजंट जे काही काम करेल त्याला प्रिंसिपल पूर्णपणे जबाबदार आणि बांधील राहील. त्यामुळे एजंट म्हणून प्रत्येकवेळी एका अश्या व्यक्तीला नियुक्त करावे जो पूर्णपणे विश्वासाच्या पात्र असण्याबरोबरच प्रिंसिपलची कामे चांगल्या प्रकारे करण्यास सक्षम असेल.

===

५. कशी बनवायची पॉवर ऑफ अटर्नी?

पॉवर ऑफ अटर्नीची कार्यवाही १०० रुपयाच्या नॉन-जुडिशियल स्टॅम्प पेपर वर केली जाते आणि याला नोटरी करणे आवश्यक आहे. यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी बनवणाऱ्या व्यक्तीची सही, स्वीकार करणाऱ्याची सही आणि दोन साक्षीदारांची आवश्यकता असते.

 

६. कधीपर्यंत वैध असते पॉवर ऑफ अटर्नी?

पॉवर ऑफ अटर्नीची वैधता तेव्हा पर्यंत असते जेव्हापर्यंत ती रद्द केले जात नाही किंवा ती स्वतः रद्द होत नाही, परंतु स्थावर संपत्तीच्या हस्तांतरण संबंधात बनवण्यात आलेली पॉवर ऑफ अटर्नीची वैधता एका वर्षाचीच असते.

power-of-attorney-marathipizza03

 

७. कधी रद्द होते पॉवर ऑफ अटर्नी?

पॉवर ऑफ अटर्नी प्रिंसिपल कडून रद्द केल्यावर, प्रिंसिपलचा मृत्यू झाल्यावर, दिवाळखोरी अथवा मानसिक संतुलन बिघडण्याच्या स्थितीमध्ये, ज्या कार्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी तयार केली आहे ते कार्य संपल्यानंतर, प्रिंसिपल आणि एजंटच्या सहमतीने किंवा एजंटने अधिकार सोडल्यावर रद्द होते.

काय मंडळी लक्षात आलं का हे गुंतागुंतीचं वाटणारं प्रकरण किती सोप्पं आहे ते! चला तर मग इतरांसोबत ही माहिती शेअर करा आणि त्यांच्या देखील ज्ञानात भर टाका.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?