' Sci-fi movies: वाटतात त्याहून गहिऱ्या, दिसतात त्याहून भव्य! – InMarathi

Sci-fi movies: वाटतात त्याहून गहिऱ्या, दिसतात त्याहून भव्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सनकी वैज्ञानिक, उगाच अनावश्यक रित्या चमकदार दाखवलेल्या त्यांच्या प्रयोगशाळा व त्यामधून लागणारे विनाशकारी शोध आणि वैज्ञानिक समज नसणारे विज्ञान कथेचे नायक – एवढी तुमची विज्ञान-पटा (Sci-fi) बद्दलची अपेक्षा असेल अन फक्त visual effects साठी तुम्ही ते चित्रपट बघत असाल, तर तुम्ही ते १००% कधीच enjoy केले नसणार.

काही दिवसांपूर्वी आलेल्या Jurassic World नावाच्या चित्रपटाबद्दल आमचा एक मित्र म्हणाला ‘अरे किती typical फॉर्मुला आहे! एक नवीन, पहिल्यापेक्षा मोठा, हिंस्त्र प्राणी – तो अपघाताने मोकळा सुटणार, त्यातून होणारा विध्वंस!’

But wait – तुम्हालादेखील असंच वाटत असेल तर – Jurassic Park मालिकेत त्यांनी दाखवलेलं विज्ञान तुम्ही miss केलंत!

पहिल्या Jurassic Park मध्ये, करोडो वर्षांपूर्वी लुप्त झालेले dinosaurs पुन्हा कसे निर्माण केले ह्याचं दिलेलं उत्तर तुम्हाला प्रचंड आवडू शकतं.

लुप्त झालेल्या प्रजातीला असं कृतीम रित्या निर्माण करण्याच्या नैतिकतेची सिनेमाच्या पात्रांमधली चर्चासुद्धा तुम्हाला विचार करायला लावते. अशा शोधांमुळे आपल्या कामाला आता महत्व नाही राहिलं असं वाटून विचारात पडलेला एक paleontologist (जीवाश्म वैज्ञानिक) सुद्धा आपल्याला आवडतो.

ह्याच सिरीजमधल्या latest चित्रपटात – Jurassic World – मध्ये Genetic Hybrid ची संकल्पना वापरण्यात आली होती, ज्यामध्ये दोन वेगळ्या प्रजातीच्या dinosaurs चे जनुक वापरून नवीन hybrid dinosaurs बनवतात. ह्या नवीनच जन्माला आलेल्या प्रजातीने त्याचं अन्नसाखळीमधलं स्थान जर स्वतःच शोधलं तर काय होईल हा नायकाने विचारलेला प्रश्नसुद्धा आपल्या बुद्धीला भिडतो.

 

jurassic park poster inmarathi

 

एक चांगली विज्ञानकथा किंवा चित्रपट चांगला की वाईट हे कश्यावरून ठरेल? तर – त्याच्यामध्ये वापरलेल्या वैज्ञानिक संकल्पना किंवा आजच्या विज्ञानाची दिशा आणि त्यातून तुम्हाला विचार करायला लावण्यात आलेलं यश — ह्यावरून. कथानकातील fiction हे ह्या समीकरणाला पूरक म्हणून वापरलेलं असतं.

पृथ्वीवरील जीवनाच्या उत्पत्ती बद्दल Panspermia हा सिद्धांत नेहमी चर्चिला जातो. या नुसार पृथ्वीवर जीवनाची सुरुवात ही इतरत्र कुठून आलेल्या सूक्ष्म जीवांमार्फत झालेली असल्याचं मानलं जातं. २०१२ मध्ये आलेल्या Prometheus ने याच सिद्धान्ताशी निगडीत कथानक मांडलं.

ह्यात त्यांनी fiction चा केलेला उपयोग म्हणजे, हा panspermia “कुणी तरी जाणून बुजून केला” अस दाखवलं. मग पुढे कथेमध्ये ‘आपण आपल्या निर्मात्याना जाऊन आपल्याला नं सुटलेले प्रश्न किंवा आपल्या निर्मितीचं कारण’ विचारणं ही संकल्पनाच उदात्त वाटते.

Sci-fi चित्रपटांमध्ये वापरलेले वैज्ञानिक तथ्य किंवा अशा चित्रपटांमधून दाखवलेला वैज्ञानिक दृष्टीकोन, ही पण अभिव्यक्ती असू शकते, याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे Nolanचा Interstellar. कधी इंजिनीरिंगच्या प्रथम वर्षात शिकलेली time-dilation ची सिद्धता; त्याचं उदाहरण पडद्यावर पाहताना येणारी रोमांचक भावना – हे सगळं मनोरंजनापलिकडचं असतं.

सापेक्षतावाद किंवा गुरुत्वीय लहरी किंवा कृष्णविवरसारख्या किचकट वैज्ञानिक संकल्पना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणं अन असं करताना केलेल्या अभ्यासाचा प्रत्यक्ष विज्ञानालाही उपयोग होणं, ह्यापेक्षा जास्त चित्रपटाचं यश असू शकत नाही.

म्हणूनच दिग्दर्शक उत्तम असेल तर प्रेक्षकांना विचार करायला लावून, भविष्यातल्या प्रगतीबद्दल आपलं मत बनवण्याचं काम विज्ञान चित्रपट हे documentary किंवा माहितीपटांपेक्षा जास्त परिणामरित्या करू शकतात.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?