संपूर्ण अंडरवर्ल्ड हादरवून सोडणाऱ्या “त्या” एन्काउंटर स्पेशालिस्टची रीएन्ट्री…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

प्रदीप शर्मा मुंबई पोलीस खात्यामधील ८० च्या दशकातील एक असे नाव जे ऐकल्यावर मोठ-मोठ्या गुन्हेगारांना घाम फुटत असे. प्रदीप शर्मा यांनी त्यावेळी सर्व गुंडांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या हिट लिस्टमध्ये कोणाचे नाव कधी येईल, याचा नेम नव्हता. चित्रपटामध्ये जसे एखाद्या गोष्टीला रंगवून सांगितलेले असते, तशीच काहीशी रंगतदार त्यांच्या खऱ्या जीवनाची गोष्ट आहे.

९ वर्षापूर्वी त्यांना २००८ मध्ये छोटा राजनचा खास माणूस लखन भैय्या याच्या खोट्या एनकाउंटरमध्ये नाव आल्याने सर्विसमधून काढण्यात आले होते.

मुंबईच्या या गाजलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनात अनेक चढ-उतार आले, चला मग आज त्यांच्या जीवनाचा आढावा घेऊया…

 

Pradeep sharma.marathipizza
mages.jagran.com


प्रदीप शर्मा यांचा जन्म १९६१ मध्ये झाला. उत्तरप्रदेशच्या आग्रामधून महाराष्ट्राच्या धुळे या जिल्ह्यामध्ये शर्मा यांचे कुटुंब राहण्यासाठी आले होते. त्यांचे वडील धुळे शहरातील डिग्री महाविद्यालयामध्ये इंग्रजीचे शिक्षक होते. पण मुलगा सरळ पोलीस फोर्समध्ये गेला. प्रदीप शर्मा यांनी मुंबई पोलीस सर्विस कमिशनची परीक्षा पास केली आणि पोलीस खात्यामधील सर्वात नामवंत अधिकारी अरविंद ईनामदार यांच्या देखरेखीखाली नाशिकच्या पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले.

या बॅचमधून पोलिसांची खूप खतरनाक एनकाउंटर गँग निघाली होती. प्रदीप शर्मा, प्रफुल भोसले, शिवाजी कोलेकर, विनायक सावडे, विजय साळसकर, रविंद्र आंग्रे, राजू पिल्ले, अशोक बोरकर, असलम मोमीन. राजू पिल्ले वगळता हे इतर सर्व पोलीस अधिकारी जनतेच्या आणि मिडीयाच्या नजरेमध्ये मोठे स्टार बनले आणि अंडरवर्ल्डच्या नजरेमध्ये खुपू लागले.

 

Pradeep sharma2.marathipizza
originmedia0.mensxp.com

प्रदीप शर्मा यांची पहिली पोस्टिंग माहीम पोलीस स्टेशनमध्ये झाली. तिथूनच त्यांना स्पेशल ब्राँचमध्ये पाठवण्यात आले. याच काळामध्ये प्रदीप शर्मा यांची जवळीक छोटा राजन गँगशी वाढली. ओ.पी. सिंह हा प्रदीप शर्मा यांचा खबऱ्या होता. त्याच्या मृत्युनंतर शर्मा हे दाऊद गँगकडे वळले.

मुंबईमध्ये ८०च्या दशकामधील शेवटचा काळ असा होता, जेव्हा अंडरवर्ल्डशी निगडीत सर्व लोकांना एक-एक करून एनकाउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी यमसदनी धाडत होते. पोलिसांना पूर्णपणे सूट मिळाली होती. कोणत्याही डॉनचा एनकाउंटर केल्यानंतर मिडिया ब्रीफिंगमध्ये प्रदीप आणि त्यांचे साथीदार सांगत असत की,

आम्ही गुन्हेगारांना पकडत होतो. पण त्याने सहयोग केला नाही, त्यांनी पलटवार करण्याचा आणि पळण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही गोळ्या मारल्या.

 

Pradeep sharma3.marathipizza
static.dnaindia.com

प्रदीप शर्मा आणि त्यांचे साथीदारांनी आतापर्यंत खूप एनकाउंटर केले आहेत. स्वतः प्रदीप शर्मा यांच्या नावावर सस्पेंड होण्याच्या आधीपर्यंत ११२ एनकाउंटर होते. प्रदीप शर्मा यांनी विनोद मटकर, परवेज सिद्धिकी, रफिक डब्बावाला, सादिक कालिया आणि लष्कर-ए-तोयबाच्या तीन सहकाऱ्यांना संपवले होते.

या काळामध्ये एनकाउंटरच्या या रक्तपाताला नाइलाज असल्याने पोलिसांची परवानगी मिळाली होती. या काळामध्ये प्रदीप शर्मा, विजय साळसकर, असलम मोमीन यांची पोच अंडरवर्ल्डच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत होती. प्रदीप शर्मा आपल्या एनकाउंटर ऑपरेशनमुळे कित्येकवेळा चर्चेमध्ये आले होते.

पण हळूहळू मिडीयाने या वारंवार होणाऱ्या एनकाउंटर्सवर प्रश्नचिन्ह निर्माण केले, तेव्हा पहिल्यांदा प्रदीप शर्मा यांचे नाव प्रकाशझोतात आले.

तेव्हापर्यंत सिनियर इनस्पेक्टर पदापर्यंत बढती मिळालेल्या प्रदीप शर्मांबद्दल एक दावा केला जायचा की, मुंबईमधील कोणत्याही ठिकाणच्या खंडणी वसूल केलेल्या पैश्यांमध्ये त्यांची भागीदारी नेहमी असते.

 

Pradeep sharma4.marathipizza
static.dnaindia.com

भू-माफियासारखे काम करून एका बिल्डर मित्रासाठी प्लॉट हडपण्याच्या आरोपाबरोबरच, २००३ मध्ये त्यांच्या कैदेमध्ये असलेल्या ख्वाजा युनुसच्या मृत्युनंतर प्रदीप शर्मा यांचे ट्रान्सफर करण्यात आले.

लखन भैय्याच्या खोट्या एनकाउंटरमध्ये प्रदीप शर्मांचे नाव आले, अंडरवर्ल्डमध्ये असलेली त्यांची पोच आणि कोट्यवधींची संपत्ती यांसारख्या सर्व गोष्टी प्रदीप शर्मा यांच्या विरोधात गेल्या. त्यामुळे पोलीस खात्यातील एक जिगरबाज एनकाउंटर स्पेशालिस्ट मध्यंतरी जणू गायबच झाला होता. पण आता पुन्हा एकदा प्रदीप शर्मा पोलीस खात्यात रुजू झाले आहेत.

ठाणे पोलीस मध्ये खंडणी विरोधी पथकात ते रुजू झाले आहेत!

या बातमीने आणखी कोणाला काही फरक पडला असेल किंवा नसेलही पण गुन्हेगारांचे धाबे नक्की दणाणले असतील…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *