' flipkart च्या अडचणी – भारतीय इ-कॉमर्सचे चांगले दिवस संपले? – InMarathi

flipkart च्या अडचणी – भारतीय इ-कॉमर्सचे चांगले दिवस संपले?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

भारतात ऑनलाईन रिटेल – म्हणजेच इ-कॉमर्सचा झंझावात सुरू करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या flipkart ला एका मागे एक धक्के बसत आहेत.

flipkart

 

पहिला मोठा धक्का बसला फेब्रुवरी २०१६ मधे.

Flipkart मधील अनेक investors पैकी एक असलेल्या Morgan Stanley ह्या investment firm ने त्यांच्या स्वतःच्या शेअर्सची किंमत कमी केली. Morgan Stanley ने flipkart च्या प्रत्येक शेअरची किंमत १४२ $ हून अधिक मानली होती. ती कमी करून १०३.९२ $ केली.

ह्यामुळे flipkart चं valuation एका फटक्यात 4 billion $ ने कमी झालं.

कंपनीची 15.2 billion डॉलर्सची किंमत एकदम 11 billion वर येऊन ठेपली.

 

दुसरा धक्का बसला मे २०१६ मधे.

Valic Co आणि Fidelity Rutland Square Trust II ह्या दोन्ही investors नी त्यांच्या शेअर्सची किंमतसुद्धा कमी केली. दोघांनीही आधीचं valuation (अनुक्रमे १२३ आणि १३५ डॉलर्स) कमी करून ९८ आणि ८२ डॉलर्सवर आणून ठेवलं!

 

तिसरा दणका लगेचच – मे २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात बसला

आणि ह्यावेळी परत एकदा Morgan Stanley नेच valuation कमी केलं. पण ह्या वेळच्या devaluation मुळे (१५.५ टक्के!) flipkart “10 billion” डॉलर्सच्या खाली आली आणि तिचं valuation झालं – 9.39 billion डॉलर्स.

 

पण ह्या सर्वाबद्दल कंपनीचे को-फाउंडर सचिन बंसल “फारसे” गंभीर नाहीयेत.

सचिन आणि बिनी बन्सल, flipkart चे को-फाउंडर्स
सचिन आणि बिनी बंसल, flipkart चे को-फाउंडर्स

 

गुडगावला झालेल्या India Internet Day 2016 मधे बोलताना सचिन म्हणाले :

एका छोट्या शेअरहोल्डरचं मत बदलल्यामुळे काही फरक पडतो असं मला वाटत नाही. त्यामुळे मी त्याचा फारसा विचार करत नाही. आम्हाला अजून फंडिंगची गरज पडली तर आम्ही आहे त्या मार्गाने फंड्स उभे करू आणि पुढे जाऊ. गोष्टी अपोआप सुरळीत होतील.

 

हे खरंसुद्धा आहे. Snapchat च्या एका investor – Fidelity Investments – ने Snapchat चं valuation कमी केलं होतं आणि काही महिन्यांनी परत वाढवलं.

पण अनेक market observers हे म्हणत आहेत की भारतीय इ-कॉमर्समधे असं devaluation तो पर्यंत होत राहील जो पर्यंत बिझनेस मॉडेल बदलत नाही. सध्याच्या मोठे डिस्काऊंट आणि रिटर्न्स असणाऱ्या मॉडेलमधे बदल व्हायला हवेत असं अनेकांचं मत आहे.

 

जे असेल ते असो. जोपर्यंत  “डिस्काऊंट आणि रिटर्न्स” आहेत, तो पर्यंत आम्हा ग्राहकांची चंगळ आहे ! 😀

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?