' अवैध धंदे, गुंडगिरी आणि रक्तपात: उत्तर प्रदेशमधील रक्तरंजित राजकारणाचे थरारक वास्तव – InMarathi

अवैध धंदे, गुंडगिरी आणि रक्तपात: उत्तर प्रदेशमधील रक्तरंजित राजकारणाचे थरारक वास्तव

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपण उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार या राज्यातील राजकारणाविषयी ऐकलंच असेल. किंवा गँग्स ऑफ वासेपूर सारख्या चित्रपटातून त्याचा थरार अनुभवलाही असेल. परंतु खरंच ही राज्य अशी आहेत का? तर उत्तर आहे, हो.

आज आपण उत्तर प्रदेशातील डर्टी पॉलीटिक्सच्या विषयात काही जाणून घेणार आहोत. जिथं केवळ गुंडाराज चालत असे आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून निवडणूका लढवल्या जात असत एकदा का जिंकून आलं की मग आपल्यावर लागलेले सर्व डाग पुसायचे किंवा हरलो तर हा खूनी खेळ असाच चालू ठेवायचा.

काही वेळा तर पोट निवडणूक लागावी म्हणून सीटींग आमदारांनासुध्दा गोळ्या घालून ठार केल्याच्या घटना याच उत्तर प्रदेशमध्ये घडल्या आहेत.

त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की उत्तर प्रदेशचं राजकारण म्हणजे नेमकं काय…

 

imghonour-killing-inmarathi
ibtimes.co.in

असं म्हणतात की उत्तर प्रदेश आणि बिहारच्या घराघरात नेता किंवा पुढारी जन्माला येतो दुर्दैवानं तो नेता नाहीच झाला तर गुंड तरी नक्कीच होता. सगळ्यात आश्चर्यकारक आणि हास्यास्पद गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवणारा नेता जर गुंड मवाली आणि आरोपी असेल तर त्याची जिंकण्याची शक्यता ही एका सभ्य उमेदवारापेक्षा तीन पट जास्त असते.

असाच एक किस्सा आहे अलाहाबादचा. अलाहाबाद मतदारसंघातून पंडीत नेहरूंपासून इंदिरा गांधी आणि अमिताभ बच्चनपर्यंत सर्वांनी आपलं नशीब आजमावलं. या शहारानं या सर्वांना यश दिलं पण या नेत्यांनी चूकूनही या शहराला विकास दिला नाही. असो.

अलाहाबादच्या झूंसी मतदारसंघातील आमदार जवाहर पंडीत यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. आणि त्यांच्यासोबत आणखी दोघांनादेखील आपला जीव गमवावा लागला.

इलाहाबादमध्ये पहिल्यांदाच एके ४७ चा वापर करण्यात आला होता. भाड्यानी बोलावलेल्या या शार्पशूटर्सनी संपूर्ण इलाहाबाद या हत्याकांडांनं हादरवून सोडला.

असं म्हटलं जातयं की या हत्येमागे अवैध दारूचे धंदे आणि अवैध वाळू उपसा ही दोन कारणं देखील होती. या खूनाच्या केसमध्ये त्यावेळच्या करवरिया कुटूंबाविरोधात तक्रार दाखल केली गेली. आता हा परिवारदेखील आपण जाणून घेऊयात.

 

karvariya-inmarathi
khaskhabar.com

एक भाऊ उदयभान भाजपचा आमदार, दुसरा सुरजभान समाजवादी पार्टीचा आमदार तर तिसरा कपिलमुनी करवरिया बसपाचा फूलपूर मतदारसंघाचा खासदार होता. २० वर्ष केसमध्ये कसलाच निकाल लागला नाही.

त्याच्यानंतर गोरखपूर मतदारसंघातील माजी मंत्री शारदा रावत यांची देखील ८ सप्टेंबर १९९१ साली हत्या करण्यात आली.ही हत्या म्हणजे वर्चस्वाच्या लडाईचा परिणाम होता असं जाणकारांचं मत आहे.रावत हे यादव यांच्या सरकारमध्ये मंत्री राहीले होते. शारदा यांची तर हत्या झालीच परंतु त्यांचा मुलगा यशपाल रावत याच्यावर १८ वर्षांनंतर दुसऱ्या एका हत्येचा आरोप सिध्द झाला आणि तो जेलमध्ये गेला.

त्यांनं हत्या केली होती एका रोड काँट्रॅक्टरची. हा रोड काँट्रॅक्टर म्हणजे विजय यादव. विजय यादव हा फार निर्ढावलेला ठेकेदार होता. तो सगळ्यांसमोर शारदा रावतला मारल्याची कबूली देऊन दहशत निर्माण करायचा.

शारदा रावतच्या मुलानं म्हणजेचं यशपालनं त्याच्याकडे २० लाख रूपयांची खंडणी मागीतली विजयनं ती देण्यास नकार दिला. या परिणाम म्हणून यशपालनं विजयचा खून केला. आणि त्यानं त्याच्या बापाच्या हत्येचादेखील बदला घेतला असं बोललं जातंय.

२ जून १९९५ ला लखनऊ गेस्ट हाऊस प्रकरणात मायावतीला जनतेच्या बऱ्याच शिव्या खाव्या लागल्या होत्या. वेळ तर ही आली होती की याच गेस्ट हाऊसमध्ये मायावती बंद होत्या आणि गेस्ट हाऊसच्या बाहेर लोकांची गर्दी होती जी मायावतीला नको नको त्या शिव्या घालत होती. मायावतीवर बलात्कार करण्याचीसुध्दा धमकी देण्यात आली या घटनेनं मायावती पुरत्या हादरून गेल्या होत्या.

 

mayavati-inmarathi
indiatimes.com

परंतु खरा खेळ तर इथून पुढे सुरू झाला. त्या गर्दीला भडकावणारा एक आमदार ज्याचं नावं होतं ओमप्रकाश पासवान जो १९९६ सालच्या निवडणूकीत जनतेला संबोधीत करत होता. त्याच्यावर बॉम्बहल्ला केला गेला ज्याच्यात ओमप्रकाश जागीच मरण पावला. या हत्येचा मास्टरमाईंड असेलला आरोपी राकेश यादव याल कधीकाळी मायावतीनं पोसलं होतं सोबतच आमदारकीचं तिकीट देखील दिलं होतं.

याच यादवनं हे देखील एका इंटरव्यूमध्ये कबूल केलं की मायावतीचं चीरहरण करण्याचा प्रयत्न ओमप्रकाशनं केला त्यामुळं त्याची हत्या करावी लागली.

ओमप्रकाश पासवाननं या यादवची वेळोवेळी नाचक्की करण्याचा प्रयत्न केला. एक किस्सा यादव असाही सांगतो की ,-एकदा ओमप्रकाश दबंग स्टाईलमध्ये उघड्या जीपमध्ये आपल्या माणसांसह यादवच्या घरी आला. संपूर्ण परिवाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि नको त्या भाषेमध्ये शिवीगाळ केली. आणि हाच अपमान राकेश यादवच्या जिव्हारी लागला आणि त्यानं ओमप्रकाशला संपवण्याचा घाट घातला.

आत्तापर्यंत वाचलेल्या दोन-तीन घटनांतून आपल्याला लक्षात आलं असेलंच की उत्तर प्रदेशचं राजकारणं म्हणजे किस चिडीया का नाम है.

या काही ठळक आणि सर्वश्रूत असलेल्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा हजारो हिडन गोष्टी आणि किस्से उत्तर प्रदेश आपल्या पोटात सामावून राजकीय वाटचाल करत आहे. आता फक्त परिस्थिती सुधारण्याची आशा आहे ती नवीन आलेल्या सरकारपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून त्यामुळे या मातीचा गंधच असा आहे की यात काही सुधारणाही करू शकतो हा येणारा काळच ठरवेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?