CFL बल्ब्स वापरावे की LED? पैश्याची अणि विजेची बचत करायची असेल तर नक्की वाचा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

घरातील सर्वात महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक वस्तू म्हणजे- बल्ब! बल्ब खराब झाला की आपण गाठतो दुकान, मग दुकानदार विचारतो कोणता बल्ब देऊ – एलईडी कि सीएफएल? झालं…हा प्रश्न आला की काय उत्तर द्यावं  हे कळत नाही. मग जो काही स्वत बल्ब मिळेल तो आपण निवडतो. हे या यामुळे होतं कारण अजूनही जन सामन्यांना एलईडी आणि सीएफएल बल्ब मधील फरक माहिती नाहीये.

चला तर आज आपण हाच फरक जाणून घेऊया, मग तुमची निवड जरा सोप्पी होईल!

 

cfl-led-marathipizza01
i.ytimg.com

 

एलईडी बल्ब म्हणजे काय?


एलईडी म्हणजे ‘लाइट एमिटिंग डायोड’ होय. आजवरच्या सर्वोत्तम शोधांपैकी एक म्हणून याची गणना केली जाते. एलईडी इतर कोणत्याही बल्ब पेक्षा सर्वात जास्त उर्जा आणि प्रकाश देतात. याचं कारणामुळे विविध उद्योग क्षेत्रांमध्ये एलईडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. परंतु यामध्ये लेड (lead) आणि  निकेल (Nickel) सारखे  हानिकारक घटक देखील असतात. पण एलईडी बद्दल सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे एलईडी रिसायकल केल्या जाऊ शकतात.

 

सीएफएल बल्ब म्हणजे काय?

सीएफएल म्हणणे ‘कॉम्पैक्ट फ्लोरोसेंट लाइट’ होय. हे बल्ब इतर प्रकारच्या बल्बपेक्षा जास्त उर्जा देतात, पण एलईडीपेक्षा कमी उर्जा देतात. सीएफएल बल्ब हे ऑर्गन पासून बनलेले असतात आणि त्यात पाऱ्याची मात्र देखील कमी असते. ऑफिसात, दुकानात वा घरांमध्ये जे काही बल्ब पाहायला मिळतात ते बऱ्याचदा सीएफएल असतात.

cfl-led-marathipizza02
charlstonlights.com

काय आहे एलईडी आणि सीएफएल बल्ब मधील फरक?

एलईडी बल्ब हा सीएफएल बल्बच्या तुलनेत कमी वीज वापरतो, सीएफएल बल्ब एका वर्षाला सरासरी ८० % उर्जेचा वापर करतो.

एका एलईडी बल्बचे आयुष्य हे साधारणत: ५०,००० तास किंवा त्यापेक्षा जास्त असते. तर दुसऱ्या बाजूला सीएफएल बल्बचे आयुष्य हे ८,००० तासांपुरतेच मर्यादित असते.

एलईडी बल्ब हे सीएफएल बल्बपेक्षा जास्त महाग असतात.

सीएफएलपेक्षा एलईडी बल्ब जास्त टिकाऊ आणि अधिक काळ वापरता येणारे असतात.

एलईडी बल्बचा आकार सीएफएल बल्बपेक्षा छोटा असतो.

सीएफएल बल्बचा बाह्य भाग हा काचेचा असतो.आणि जर तो फुटला तर सीएफएल बल्ब बदलावा लागतो, पण एलईडी बल्बमध्ये असा कमीपणा नाही. एलईडी बल्बचे सर्व घटक त्याच्या आतच असतात. त्याचा बाह्य भाग हा प्लास्टीक कोटिंगचा असल्याने सहसा फुटत नाही. आणि मुख्य गोष्ट म्हणजे जरी हा भाग फुटला तरी एलईडी बल्ब बिनदिक्कतपणे काम करतो.

सीएफएल बल्बमध्ये तुम्हाला ६ महिने ते २ वर्षापर्यंतची वॉरंटी मिळते, पण एलईडी बल्बमध्ये मात्र २ वर्षे ते ३ वर्षे इतकी वॉरंटी मिळते.

 

cfl-led-marathipizza03
tedstips.files.wordpress.com

एलईडी बल्ब गरम होत नाही, पण सीएफएल बल्ब लवकर गरम होतो.

सीएफएल बल्बपेक्षा एलईडी बल्ब वजनात हलके असतात.

आपल्या भारत सरकारतर्फे एलईडी बल्ब वापरासंदर्भात एक योजना आहे. ज्या अंतर्गत वीज कार्यालयामध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे जमा करून तुम्ही ८५० रुपयांमध्ये उजाला कंपनीचे विविध वॉल्ट्सचे १० बल्ब खरेदी करू शकता, ज्यासाठी तुम्हाला प्रत्येक बल्बमागे २ वर्षांची वॉरंटी मिळते. सीएफएल बल्बसाठी अशी कोणतीही योजना नाही.

वरील कारणांमुळेच ग्राहकांचा कल एलईडी वापराकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *