' तथाकथित “लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी” विचारवंतांचा जागतिक पोपट – InMarathi

तथाकथित “लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी” विचारवंतांचा जागतिक पोपट

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी असे स्वतःला समजणारे जगभरातील बुद्धीवादी लोक/विचारवंत हे सामान्य लोकांपासून विचारांनी इतके दुर कसे झालेले आहेत, सर्वसामान्य लोकांपासून यांची नाळ कशी तुटलेली आहे – याचे तीन ठळक उदाहरणे नुकतीच घडली आहेत.

भारतात मोदींच्या निवडून येण्याने ही बाब भारतीय विचारवंतांच्या बाबतीत अधोरेखीत झाली, तिकडे युरोपात ब्रेक्झिटमुळे, यावरील कार्यक्रमात बीबीसीवर एक महाशयांनी तर – “हे कसे शक्य आहे? आजपर्यंत ब्रिटनने युरोपियन युनियनमधून वेगळे व्हावे असे मत असणारा एकही मनुष्य मला भेटला नाही!”असे मत व्यक्त केले होते…! आणि तिसरे उदाहरण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्रपती म्हणून निवड होणे हे होय. इथेही सर्व जगभरातील बुद्धीवादी, लिबरल विचारवंत “हिलरीच जिंकणार” हे शेवटपर्यंत लोकांना सांगत होते.

 

trump and modi marathipizza

 

इंग्रजीत “contempt” नावाचा शब्द आहे बघा. “हे लिबरल विचारवंत असे वास्तवापासून का दुर गेले” त्याचं उत्तर या शब्दात आहे.

भारतातही लिबरल विचारवंतांचा समूह मोदीविषयी जबरदस्त दुर्रभावना बाळगून असल्यामुळे त्यांच्या विश्लेषणात ती प्रतिबिंबित होऊन ते वास्तवापासून भरकटतात. हेच नेमके ट्रम्प बाबतीतही घडले आहे. त्यामुळे या दोघांनी भारतातील व जगभरातील लिबरल बुद्धीवादी मानल्या जाणाऱ्या लोकांना साफ खोटे ठरवले.

आज ट्रम्पने मुस्लीम देशावर बॅन लावला म्हणून आकाशपाताळ एक करणारे लोक ओबामाने काय केले यावर कधीही बोलले नाहीत कारण ओबामा छुपेपणाने या लिबरल, डेमोक्रॅटिक लोकांच्या मनातील पाळलेल्या मुल्यांना वरकरणी गोंजारत असत, त्याला धक्का नं लावता हे सर्व करत असत. पण ओबामाने जगभरात काय काय उचापती केल्यात हे तपासता ट्रम्प आणि त्यांच्यात फार फरक करता येणार नाही.

obama war marathipizza

स्रोत

फरक असेलच तर एक छुपेपणाने लिबरल डेमोक्रॅटचे आवरण ओढून करायचा तर दुसरा फटकळ आहे, भिडभाड न ठेवता जे करायचं ते उघड उघड बोलून करतोय इतकाच आहे – कृती दोघांचीही सारखीच आहे.

उदाहरणार्थ – ज्या देशावर अमेरिकेने बंदी घातली त्या देशाच्या नागरिकांनी मागील चाळीस वर्षात एकाही अमेरिकनास मारलेले नाही. पण सौदी अरेबिया, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशातील लोकांपायी, सरकारच्या पाठबळापायी हजारो अमेरिकन मेलेले आहेत. हे वास्तव आहे. त्यामुळे या बँनमधून फार काही भरीव होणार नाही. झालेच तर अमेरिकेचे नुकसानच होईल. पण मग हा निर्णय का घेतला?

मित्रानो, एक मनुष्य खूप मोठेमोठे दावे करून सत्तेवर आलाय तेव्हा काहीतरी फेससेव्हींग त्याला हवेच असते. ज्यांनी त्यांना मत दिले आहे त्यांच्यासाठी ही कृती करण्यात आलेली आहे. येवढाच याचा अर्थ आहे.

कसं आहे, “वाटणे” एक वेगळी गोष्ट असते, “बोलणे” त्याहून वेगळी तर “प्रत्यक्षात करणे” त्याहूनही वेगळे असते. तीनही गोष्टीत मूलभूत फरक आहे. ब-याचदा आपण आपल्याला वाटते ते बोलू शकत नाहीत, बोललो ते करू शकत नाहीत त्यामुळे लगेचच गहजब माजविण्यची गरज नाही. मागील एका लेखात सुरवातीस असे निर्णय अपेक्षित आहेतच असे लिहले होते पण ते फक्त राजकीय प्रचारबाजीसाठी घेतलेले असतील. (तो लेख इथे वाचू शकता: डोनाल्ड अमेरिकेला कुठे घेऊन जाईल? नव्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आढावा) धोरणात फार काही बदल होणार नाही…ते खरे ठरतंय…

भारतातही मोदी सत्तेवर आल्यानंतर व यायच्या आधी याच पद्धतीने इथल्या लिबरल विचारवंतानी “काही तरी अनहोनी होणार आहे” अशा प्रकारचे वातावरण निर्माण केले होते.

modi muslims marathipizza

लोकांनी यांचे ऐकून घेतले आणि बहुमताने मोदीला निवडून दिले. अमेरिकेतही लोकांनी हेच केले. थोडक्यात, हा विचार जास्त दुर पर्यंत लोकांच्यात जाऊ शकलेला नाही. हे ज्या पद्धतीने लोकांची या दोन नेत्यांबाबतीत जनमानसात छवी स्थापित करू पाहत होते…ज्याला इंग्रजीत “नँरेटिव्हज शेपिंग” असे म्हणतात…त्याला लोकांनी नाकारले आहे. आता याबाबतीत एक उदाहरण देतो.

आज अमेरिकेत ट्रम्पने मुस्लीम धर्माबाबतीत केलेल्या खोट्या प्रचारास तिथे मोठ्या प्रमाणात मान्यता मिळत असल्याचे दिसून येत आहे. तिथेच काय, भारतातही अशाच प्रकारचे परसेप्शन लोकांमध्ये आहे.

आता हे परसेप्शन कसे व कुणी बनवले – हे पाहणे महत्त्वाचे आहे.

अमेरिकन 9/11चा हल्ला झाल्यानंतर तिने दहशतवादाविरोधात युद्ध सुरू केले. या काळात मग तिने इराक, अफगाणिस्तानात आपल्या फौजा धाडल्या. या ठिकाणी आपल्या केलेल्या घुसखोरीला योग्य ठरविण्यासाठी मग तिने जबरदस्त प्रोपँगंडा ही केला. यात मग मुस्लीम म्हणजे कट्टर, धर्मांधच असे परसेप्शन लोकांच्या मनात निर्माण झाले. हे निर्माण करण्यासाठी मग नँरेटिव्ह शेपिंग करण्यात आली. या साठी माध्यमातील लोकांना हाताशी धरण्यात आले. आता या संबंधी ट्रम्पने केलेला दावा व अमेरिकन लोकानतील परसेप्शन किती बकवास आहे हे कळण्यासाठी काही आकडे बघा – ते वाचा आणि तुम्हीच ठरवा.

9/11 नंतर अमेरिकेत मुस्लीम दहशतवादी यांनी 9 लोकांचा बळी घेतलाय. तेथील गनकल्चरमुळे याच कालावधीत 12,883 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय तर रस्ते अपघातात याच कालावधीत तिथे 37000 हजार येवढे मृत्यू झालेले आहेत. पण परसेप्शन ही खूपच खतरनाक गोष्ट असते. ती वास्तवालाही नाकारायला भाग पाडू शकते, म्हणून कधीही राजकीय नेते बोलतात काय – या पेक्षा करतात काय – यावरून त्यांच्याविषयी मत बनवले पाहिजे.

पण हे “लिबरल डेमोक्रॅटिक विचारवंत” कृती पेक्षा प्रचारबाजीला भूलून मते व्यक्त करतात आणि मग तोंडघशी पडतात.

तर सांगायचा मुद्दा असा की –

जग म्हणजे तुमच्या बुद्धीवाद्यांच्या बुद्धीत असलेली, स्वतःच्या उराशी व मनात बाळगलेली कल्पना तेवढी नाही.

त्यामुळे तुम्हाला वाटते त्यापेक्षा वेगळेच बहुसंख्य लोकांना वाटू शकते. हे वारंवार सिद्धही झालंय. त्यामुळे तुमच्या विश्लेषणाला अजूनही अचूक करायचं असेल तर सर्वसामान्य लोकांच्या खऱ्याखुऱ्या समस्या आधी जाणून घ्या, समजून घ्या मग विश्लेषण करा.

काही पारंपरिक गृहितके मांडून सतत त्यावरच विश्लेषणाची व मताची मांडणी करणे यापुढे चालणार नाही.

हां, यामुळे तुमचा “अहं” जरूर सुखावत असेल. यामुळे तुमच्या वर्तुळात तुम्हाला मान्यताही मिळत असेल.

पण सर्वसामान्य  लोकांमध्ये मात्र यामुळे मान्यता मिळत नाही. कारण तुमचं आणि आमचं जग फार वेगळं आहे. हेच वारंवार अधोरेखीत झालंय…अजूनही होतंय..!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 25 posts and counting.See all posts by shivraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?