' DMart चे फ्री कुपन मिळणारा WhatsApp मेसेज : आणखी एक भयंकर गंभीर ऑनलाईन फ्रॉड – InMarathi

DMart चे फ्री कुपन मिळणारा WhatsApp मेसेज : आणखी एक भयंकर गंभीर ऑनलाईन फ्रॉड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आज WhtsApp वर पुढील मेसेज धुमाकूळ घालत आहे :

===

D-Mart is giving FREE INR2500 shopping voucher 🎁 to celebrate it’s 17th anniversary, click here to get yours : http://www.dmartındia.com/voucher Enjoy.

===

 

D-mart-inmarathi
moneycontrol.com

हे असे मेसेजेस नेहेमी येतात. अमेझॉन ने जुना माल खपवण्यासाठी 50 रुपयांत जीन्स विकायला काढल्यात, एअरटेल ने कॅशबॅक ऑफर आणलीये, इ.

ह्या मेसेजेसमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास आपण अगदी मूळ खऱ्या कम्पनीच्या वेबसाईटवर आल्यासारखं वाटतं. हुबेहूब डिझाइन कॉपी करून एक वेगळी सिंगल-पेज वेबसाईट तयार केलेली असते. लोगो, रंगसंगती इतकी हुबेहूब असते की ही मूळ वेबसाईट नसून फेक लँडिंग पेज आहे हे कळतही नाही.

मग अश्या पेजवर एकतर तुमच्याकडून ऑर्डरच्या निमित्ताने पैसे घेतले जातात किंवा तुमचे कार्ड / नेटबँकिंग डिटेल्स सेव्ह केले जातात – किंवा – तुमचा पत्ता, फोन नंबर, इमेल सेव्ह केला जाऊन, ह्या डिटेल्स विविध मार्केटिंग कंपन्यांना विकला जातो.

 

D-mart-inmarathi01
indiainfoline.com

आपण दरवेळी चांगल्या भावनेने लिंक्स फॉरवर्ड करत असताना, इतरांसाठी व स्वतःसाठी सुद्धा असा खड्डा खोदतोय के आपल्याला कधी कळत नाही.

त्यामुळे असं कशावरही क्लीक करताना खबरदारी घ्यायला हवी.

ही खबरदारी घ्यायची म्हणजे काय – तर ज्या लिंकवर क्लीक करून तुम्ही त्या पेजवर गेला आहात ती लिंक कशी दिसते, त्यात कोणती अक्षरं आहेत हे तपासून बघा.

मूळ कंपनी (अमेझॉन, एअरटेल, डिमार्ट) ची वेबसाईट गुगल करून शोधा – दोन्ही लिंक एकसारख्या आहेत का हे बघा. मूळ कंपनी च्या वेबसाईटवर जाऊन तिथे अशी स्कीम दिसतोय का बघा.

 

 

ह्या डिमार्ट मेसेजवाल्यांनी जी लिंक तयार केली आहे ती ब्राऊजर वर “dmartindia.com” अशीच दिसते. पण ती कॉपी करून दुसरीकडे पेस्ट केल्यावर खरी लिंक दिसते :

http://www.xn--dmartndia-zpb.com

म्हणजेच की फेक लिंक आहे.

 

D-mart-inmarathi02
livemint.com

आणि हा मेसेज खोटा आहे ह्याची पावती खुद्द डिमार्ट ने दिली आहे. डिमार्टच्या वेबसाईटवर (dmartindia.com) पुढील संदेश टिकर होतोय :

Dear Customers, There are certain miscreants forwarding link to a fake website which purportedly is giving out DMart Shopping voucher. Please note that we at DMart have not issued any such voucher. Please do not fall prey to such offers. Team DMart

म्हणजेच – काही लोक खोट्या वेबसाईटच्या लिंकसोबत डिमार्टच्या व्हाउचर्स देण्याबद्दल ऑफर असणारा मेसेज फॉरवर्ड करत आहेत, डिमार्टने अशी कुठलीही स्कीम आणलेली नाही.

===

(बाय द वे – अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वा तत्सम वेबसाईटवर शॉपिंग करताना खरोखर पैसे वाचवायचे असतील तर वाचा :

ऑनलाईन शॉपिंग करताना भरपूर पैसे वाचवण्याच्या, हमखास यशस्वी होणाऱ्या टिप्स!)

खुद्द DMart ला स्पष्टीकरण द्यावं लागलं ह्यातच सदर फ्रॉडचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात येते.

त्यामुळे कृपया अश्या लिंकवर कुठल्या डिटेल्स देताना खबरदारी बाळगा. ९९.९९% शक्यता अशीच आहे की ही लिंक खोटी आहे. वर सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून, पूर्ण खात्री बाळगूनच कुठल्याही वेबसाईटवर आपल्या डिटेल्स द्या.

सावध रहा, जागरूक रहा.

स्वतः तर फसू नकाच, असे मेसेज फॉरवर्ड करून इतर कुणाच्या फसवणुकीस कारण ही बनू नका.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?