' ‘लिव्ह इन’मध्ये अर्धशतक, ऐंशीव्या वर्षी लग्न ! उदयपूरच्या जोडप्याचा असामान्य जीवनप्रवास – InMarathi

‘लिव्ह इन’मध्ये अर्धशतक, ऐंशीव्या वर्षी लग्न ! उदयपूरच्या जोडप्याचा असामान्य जीवनप्रवास

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

प्रेम ही एक अशी भावना आहे जी, जात-पात, वय, स्टेटस, श्रीमंती-गरिबी ह्या सर्वांच्या पलीकडे आहे. जेव्हा माणूस प्रेमात पडतो तेव्हा त्याला त्या व्यक्तीशिवाय जगातील आणखी काहीही दुय्यमच असतं. आणि जर आपण खरच त्या व्यक्तीवर प्रेम करत असू तर आपण तो आपल्या मिळतोच, फक्त त्याकरिता वाट पाहण्याची गरज असते. याचाच प्रत्यय उदयपूरच्या परगियपाडा गावात पाहायला मिळाला. जिथे ४८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर प्रेमात असलेले ८० वर्षीय देवदास आणि ७६ वर्षीय मगडू बाई ह्यांचं लग्न झालं.

 

udaipur-couple-inmarathi04

 

४८ वर्षांआधी देवदास कालासुआ  हे बाजूच्या गावातील मगडू बाई ह्यांच्या प्रेमात पडले. ह्यांच्या प्रेमात इतरांसारख्या समस्या नव्हत्याच. म्हणजे, जातिवाद किंवा धर्म हे ह्यांच्या प्रेमाच्या आड येत नव्हते तर समस्या ही जरा बिकट होती. कारण देवदास हे विवाहित होते. विवाहित असून देखील ते प्रेमात पडले होते. हळूहळू त्या दोघांनाही आपण एकमेकांवर किती प्रेम करतो हे कळू लागलं आणि अखेर त्यांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण कितीही म्हटलं तरी लोकांनी ह्याला विवाहबाह्य संबंधाचेच नाव दिले. त्यामुळे सामाजिक स्वीकृती नसल्याने देवदास हे मगडू बाई ह्यांना आपल्या घरी तर आणू शकले पण ते त्यांच्याशी लग्न करू शकले नाही.

ह्यातच आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे देवदास ह्यांच्या पत्नीला त्यांच्या प्रेयसी आणि त्यांच्यातील संबंधापासून काहीही प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी सोबत सोबत ४८ वर्ष अगदी आनंदाने सोबत संसार थाटला. म्हणजे ४८ वर्षांपासून हे प्रेमियुगल लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. अखेर एवढ्या वर्षानंतर त्यांच्या मुलांनी सामाजिक स्वीकृतीने त्याचं लग्न लावून दिलं. आणि त्यांच्या नात्याला नावं मिळालं. ह्या विवाहसोहळ्यात त्यांची नातवंड देखील सहभागी झाली होती.

 

udaipur-couple-inmarathi02

 

देवदास ह्यांचा मुलगा अर्जुनलाल हा एक शिक्षक आहे. आपल्या आई-वडिलांच्या नात्यावर बोलताना ते सांगतात की, ‘मला नेहेमी असं वाटायचं की माझ्या आई-वडिलांच्या नात्याला एक नावं मिळावं. पण स्थानिक परंपराच्या मते दोन्ही पक्ष आणि पंचायत ह्यांच्या परवानगी शिवाय हे लग्न होणं शक्य नव्हतं.’

 

udaipur-couple-inmarathi

 

आज आपण खूप मॉडर्ण अशी लाइफस्टाइल जगतो. जिथे आपण सर्व आधुनिक गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, पण तरी आपण अजूनही नात्यांमध्ये आधुनिकीकरण करण्यात समर्थ नाहीत. आजही जर कोणी लिव्हइन मध्ये राहत असेल तर आपण त्यांच्याबद्दल वाईटच विचार करतो. त्यातच देवदास आणि मगडू बाई ह्यांची ही प्रेमकहाणी नात्यातील आधुनिकीकरणाचे एक उत्तम उदाहरण ठरू शकते.

स्त्रोत : टाईम्स ऑफ इंडिया

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?