' रजनीकांतचा जावई ‘धनुष’च्या जन्मदात्यांचा घोळ! – InMarathi

रजनीकांतचा जावई ‘धनुष’च्या जन्मदात्यांचा घोळ!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेला आणि प्रसिद्ध चेहरा म्हणून ‘धनुष’ कडे पाहिलं जातं. दक्षिणात्य चित्रपट हिंदी भाषेतून आपल्याकडे दाखवण्यास सुरुवात झाल्यापासून धनुष हा आपल्यादेखील ओळखीचा झाला आहे. इतर हिरोंकडे कशी पिळदार बॉडी, सिक्स पॅक्स, गोरा चेहरा वगैरे असतात पण धनुषकडे मात्र यापैकी काहीच नाही, तरीही त्याची स्टाईल, त्याचा रुबाब सर्वांवर छाप पाडून जातो आणि एकदा पाहिलेला धनुष आपल्या कायमच्या लक्षात राहतो. त्याच्या कोलावरी गाण्याची जादू आजही तशीच कायम आहे.

dhanush-maari-marathipizza

स्रोत

रजनीकांतचा जावई असल्याकारणाने देखील नेहमी चर्चेत असणारा हा सुपरस्टार सध्या मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. चित्रपटात तो यासारख्या विचित्र परिस्थितीला सामोरा गेला आहे, पण ही विचित्र परिस्थिती रियल लाईफ मध्ये आपल्या समोर येउन ऊभी ठाकेल असा त्याने स्वप्नात देखील विचार केला नसावा.

कारण सध्या एक वाद चांगललाच उफाळला आहे तो वाद आहे- धनुषच्या खऱ्या पालकत्वाचा!

dhanush-real-parents-marathipizza

स्रोत

६० वर्षीय आर. काथीरेसन आणि त्यांच्या पत्नी के. मीनाक्षी यांनी असा दावा केला आहे की- “धनुष हा आमचा मुलगा आहे”

चेन्नई पासून ४८० किमी दूर असलेल्या मनमपत्ती गावामध्ये हे दाम्पत्य राहते. ६० वर्षीय आर. काथीरेसन हे निवृत्त बस कंडक्टर आहेत. त्यांनी धनुषच्या जन्माचा दाखला आणि त्याचे लहानपणीचे फोटोज सादर करीत न्यायालयामध्ये असे अपील केले आहे की ,

धनुष आमचा मुलगा असून त्याने मुलाच्या नात्याने आम्हाला दर महिन्याला ६५००० रुपये इतका देखभाल खर्च द्यावा आणि आमची काळजी घ्यावी.

आपला दावा अधिक सबळ करताना काथीरेसन म्हणतात की,

धनुषचा जन्म मदुराई मधील राजाजी हॉस्पिटलमध्ये झाला होता. धनुषचे खरे नाव कलाईसेल्वन होते. २००२ साली जिल्ह्याच्या शाळेत शिकत असताना तो पळून गेला होता. नंतर प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक कस्तुरी राजा यांनी त्याचा ताबा घेतल्यावर त्याने स्वत:चे नाव बदलून “धनुष के. राजा” असे ठेवले.

dhanush-kasthuri-raja-marathipizza

स्रोत

कायद्यानुसार धनुष हा निर्माते-दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा सर्वात धाकटा असा तिसरा मुलगा आहे. धनुषने या दाव्याचा इन्कार करत म्हटले की,

माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी या दाम्पत्याच्या मागून कोणीतरी रचलेला हा बनाव आहे.

या दाम्पत्याने धनुषच्या अंगावर असलेल्या काही खुणा देखील सांगितल्या आहेत. त्यांची पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. या दाम्पत्याच्या म्हणण्यानुसार,

धनुषच्या खांद्यावर तीळ आहे तसेच त्याच्या हातावर एक जखमेची खुण आहे

dhanush-biological-son-marathipizza

स्रोत

धनुषच्या समर्थनार्थ तमिळ दिग्दर्शक विसू पुढे आले आहेत. ते म्हणतात की,

tamil-director-visu-marathipizza

स्रोत

कस्तुरी राजा यांनी माझ्यासोबत १६ वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि त्यांच्या कुटुंबाला मी चांगला ओळखतो. माझ्याकडे दोन छायचित्रे आहेत जी धनुष १० वर्षांचा असताना काढली होती. त्यात कस्तुरी राजा, त्यांची पत्नी, इतर मुले आणि धनुष आहे. आणि हे दाम्पत्य सांगत आहे त्याप्रमाणे त्यांचा मुलगा हरवण्यापूर्वी खूप अगोदर ही छायाचित्रे घेण्यात आली आहेत.

तर असं आहे हे संपूर्ण प्रकरण आणि अजूनही सर्वांना एकाच उत्तराची प्रतीक्षा आहे की धनुषचे खरे पालक कोण??

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?