कंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखता येते का? जाणून घ्या…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अनेकदा असं होतं की भावनांच्या भरात आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर त्याचा परिणाम भोगावा लागतो. सेक्सचं देखील असचं आहे. प्रेमभावनेत वाहत गेल्याने आपल्याला अनेकदा सुरक्षेचा विसर पडतो आणि मग त्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आजकाल सर्वच कपल त्यांना कधी आई-वडील व्हायचं आहे ह्याचं प्लानिंग करतात. म्हणजे जर नुकतचं लग्न झालेलं असेलं, किंवा दोघेही जॉब करत असतील, किंवा सध्या आई-वडील ही जबाबदारी स्वीकारण्याची तयार नसेल, अशी सर्व कारणे त्या प्लानिंग मागे असतात.

मग त्यासाठी शरीर संबंध बनविताना अनेक जोडपे कदाचित कंडोमचा वापर करत असतील. पण कधी-कधी भावनांच्या भरात आपल्याला कंडोमचा विसर पडतो आणि मनाची काहीच तयारी नसताना आपल्याला पालकत्व स्वीकाराव लागतं. आणि मग त्यातून पती-पत्नीच्या नात्यातील ताणताणाव, दुरावा हे सर्व घडून येतं.

 

pregnancy-inmarathi
coveragetimes.com

हे सर्व होण्यापेक्षा तयारी नसताना गर्भधारणा होऊच न देणे हाच सर्वात उत्तम मार्ग. पण तुम्हाला हे माहित आहे का की, तुम्ही कंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखू शकता? होय कंडोम व्यतिरिक्त इतर अनेक असे उपाय आहेत ज्याने तुम्ही गर्भधारणा रोखू शकता आणि आपले जीवन हवे तसे जगू शकता.

बर्थ कंट्रोल पॅच

हा एका प्रकारचा पॅच असतो, ज्याला स्त्रिया आपल्या शरीराला चिटकवू शकतात. हा Estrogen आणि Progestin हार्मोन्सना रिलीज करून प्रेग्नसीला थांबवतो. योग्य प्रकारे वापरल्यास ही पद्धत ९९% यशस्वी ठरू शकते. पण ह्याला वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

americanpregnancy.org

Birth control implant

हा काडीपेटीच्या काढीएवढ्या आकाराचा रॉड असतो. ह्याला स्त्रीच्या शरीरात इम्प्लांट केले जाते. हा देखील हार्मोन्सना रिलीज करून गर्भधारणा होण्यापासून थांबवतो. Birth control implant ४ वर्षांपर्यंत काम करते. तरी ह्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

 

bce-inmarathi
manhattancenterforgynecology.com

Spermicides

हे देखील एक प्रकारे गर्भनिरोधक म्हणून काम करते. जे पुरुषाच्या वीर्यला अंडाशयापर्यंत पोहोचू देत नाही. ह्याचा वापर सेक्सपुर्वी केला जातो. पण ह्याचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

 

spermicide-inmarathi
soc.ucsb.edu

सुरक्षित आठवडा

स्त्रियांच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसानंतरच्या ८ व्या दिवसापासून ते २० व्या दिवसापर्यंतचा काळ हा सेक्स साठी सुरक्षित काळ मानला जातो.

पुल अॅण्ड प्री मैथड

जर तुम्ही सेक्स करतानाच्या शेवटच्या क्षणांत स्वतःवर नियंत्रण ठेवून आपल्या साथीदारापासून दूर होऊ शकत असाल तर ह्या पद्धतीने देखील गर्भधारणेला थांबवले जाऊ शकते. आणि ह्यासाठी तुम्हाला न कंडोमची गरज ना कुठल्या इतर गोष्टीची. तसेच ह्याचा सक्सेस रेट हा देखील कंडोम इतकाच आहे. ह्या पद्धतीचा सक्सेस रेट हा ८३% आहे तर कंडोमचा ८४%.

IUCD मेथड

आजकाल IUCD ही पद्धती स्त्रिया जास्तकरून वापरतात. ह्याला डॉक्टरकडून स्त्रियांच्या शरीरात इम्प्लांट केले जाते, ज्यामुळे गर्भधारणा थांबवता येते. तुम्ही ह्याला आपल्या सुविधेनुसार काढू देखील शकता.

 

IUD-inmarathi
greatist.com/

गर्भनिरोधक गोळ्या

तुम्ही गर्भधारणा थांबविण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा देखील वापर करू शकता. पण ह्या गोळ्या घेतल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकते. त्यामुळे ह्यांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

कंडोम वापरण्यात अडचणी असतील तर यापैकी काही सोयीच्या पद्धती वापरून तुम्ही अनपेक्षित संततीप्राप्ती थांबवू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?