' “आधार” लिंक्ड बँक खातं आणि गॅस सबसिडी : सरकारी यंत्रणेचा “असाही” मनस्ताप – InMarathi

“आधार” लिंक्ड बँक खातं आणि गॅस सबसिडी : सरकारी यंत्रणेचा “असाही” मनस्ताप

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आधार जोडलेल्या बँक खात्यावर गॅसची सबसिडी डायरेक्ट पाठवणं (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर – DBT) ही तशी उत्कृष्ट संकल्पना.

पण पब्लिकला विनाकारण मनस्ताप कसा देता येईल असा विचार करूनच सरकारी सिस्टीम उभ्या होतात. जणू त्यांच्या फ्लोचार्टमध्ये एकतरी स्टेप “does this make the user get extremely agitated” हा थम्ब रूलच असतो.

ह्या आधार-बँक जोडणीच्या बाबतीत काही अजबगजब नियम आहेत, जे आपल्याला माहितीच नसतात.

तुम्ही ह्या DBT साठी एकदा एक बँक ठरवलीत की ती जोडणी कायमस्वरूपी व्हावी ना? पण नाही.

त्यानंतर तुम्ही वेगळं खातं उघडलंत आणि तिथे आधार नंबर दिलात तर ती बँक परस्पर DBT साठी तुमचं बँक खातं जोडून टाकू शकते. कधीकधी बँक कर्मचारी असे उपद्व्याप करत नाहीत, कधीकधी करतात.

आणखी गंमत पुढे.

 

adhar lpg subsidy frustrating issues inmarathi
indiatimes.com

 

तुमचं खातं तुम्ही बंद केलंत तर?

ही आधार जोडणी तुटून, तुमच्या दुसऱ्या (ह्या खात्याच्या आधी ज्या खात्याला जोडलेलं होतं तिथे, किंवा आधार क्रमांक दिलेल्या कोणत्याही खात्याला) आपोआप जोडणी व्हायला हवी की नाही?

Nope! तसं होत नाही!

तुम्हाला मेसेज येणार –

“तुमचं आधार कोणत्याही खात्याशी जोडलेलं नसल्याने तुम्हाला सबसिडी पाठवता येणार नाही.”…!

आता तुम्ही सहाजिकच दुसऱ्या बँकेत जाता. अडचण सांगता. पुन्हा एकदा आधार जोडणी, DBT रजिस्ट्रेशन करता. ती काऊंटरवरची कुमारी तुमचं application घेते. ४८ तासांत जोडणी होईल हे सांगते. ४८ तासात बँकेचा ईमेलपण येतो.

तुम्ही सुटकेचा निःश्वास सोडता.

पण…

Don’t underestimate the power of Government Systems.

पुढील गॅस ऑर्डरच्या वेळी पुन्हा मेसेज येतो.

“तुमचं आधार कोणत्याही खात्याशी जोडलेलं नसल्याने तुम्हाला सबसिडी पाठवता येणार नाही.”

Dammit.

तुम्ही पुन्हा बँकेत जाता. तुमची दर्दभरी दास्तान ऐकवता. ती कुमारी तुम्ही अज्ञानी वा निर्बुद्ध वा निर्बुद्ध अज्ञानी असल्यागत तुमच्याकडे कटाक्ष टाकते. तुमचं कनेक्शन “आधीच झालंय” असं सांगते.

एक काम करा ना सर? तुमच्या गॅस एजन्सीत चौकशीत करा.

Damn Damn Dammit…! ही गडबड एजन्सीतच असणार! आधी कसं लक्षात आलं नाही?

 

adhar lpg subsidy tussle inmarathi
timesofindia.com

तुम्ही समाधानी आणि आशावादी भावनेने एजन्सीत जाता. तिथेसुद्धा कुमारीच आहे. ती तुमच्या आरपार बघत असते. चेहऱ्यावरील एकही रेषा हलू नं देता तुमचं म्हणणं ऐकते. मुखडा समोरच्या “कॅम्पिटर” कडे वळवते, कीबोर्डवर दणादण बोटं आदळते.

तुमच्याकडे नजर फेकून म्हणते –

“तुमचं अकाऊंट कनेक्ट आहे. अमुक अमुक बँक.”

Holy shit…हे अकाउंट तर मी बंद केलंय ४ महिन्यांपूर्वी!

ती कुमारीसुद्धा तुमच्याकडे तुम्ही अज्ञानी वा निर्बुद्ध वा निर्बुद्ध अज्ञानी असल्यागत तुमच्याकडे कटाक्ष टाकते.

“तुमच्या जुन्या बँक अकाऊंटलाच अजूनही आधार जोडलेलं आहे.”

फ्रस्ट्रेशन लेव्हल : फीलिंग लाईक कमिटींग अ मर्डर.

तुम्ही दातओठ खात जुन्या बँकेत जाता. तिथल्या कुमारीला पुन्हा तेच पुराण ऐकवता. तीसुद्धा तुम्ही अज्ञानी वा निर्बुद्ध वा निर्बुद्ध अज्ञानी असल्यागत तुमच्याकडे कटाक्ष टाकते.

“अकाऊंट बंद झालंय म्हटल्यावर आधार आपोआप डीलिंक होणार ना सर?”

Yeah right.

“तुमच्या नव्या अकाऊंटला लिंकिंग झाली नाहीये सर.”

फ्रस्ट्रेशन लेव्हल : फीलिंग लाईक कमिटींग स्यूइसाईड.

पुन्हा कुमारी क्र १. नवी बँक. पुन्हा पुराण. पुन्हा लिंकींगचा फॉर्म. नव्याने जोडणी. नवे ४८ तास. नवा कॉन्फर्मेशन ईमेल. नवी गॅस ऑर्डर. नवा मेसेज.

“तुमचं आधार कोणत्याही खात्याशी जोडलेलं नसल्याने तुम्हाला सबसिडी पाठवता येणार नाही.”

इस रात की सुबह नहीं.

आता तुम्ही ट्विटर उघडून दोन्ही बँकांना शिव्या शाप देणारे ट्विट्स करता. सगळं फ्रस्ट्रेशन काढता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला जुन्या बँकेचा फोन येतो –

“सर तुमचं अकाऊंट बंद करताना “आधार जोडणी रद्द करा” म्हणणारी रिक्वेस्ट दिली नाहीत तुम्ही! त्यामुळे अजूनही आधार त्याच अकाउंटला जोडलेलं आहे.”

Wow. अकाउंट अस्तित्वात नाही पणआधार जोडणी कायम आहे. क्या सोचके आधार बनाए थे नंदन बाबू?

फोनवरील कुमारीचा टोनसुद्धा तुम्ही अज्ञानी वा निर्बुद्ध वा निर्बुद्ध अज्ञानी असल्यागत असतो.

“Go to bank. Submit the application to de-link the account.”

फ्रस्ट्रेशन लेव्हल : फीलिंग लाईक कमिटींग मास मर्डर अँड देन स्यूइसाईड.

जुन्या बँकेत गेल्यावर ती कुमारी तुमचं अस्तित्व टाळायचा प्रयत्न करते. तुम्ही चिकाटीने तिला पुराण + “वरून आलेला कॉल” ऐकवता.

ती कोऱ्या कागदावर application लिहून घेते.

का? प्रिंटेड फॉर्म नाहीये?

“No. Because you know, you are a unique case.”

ह्यावेळी तुम्हीच मनातल्या मनात स्वतःला आपण अज्ञानी वा निर्बुद्ध वा निर्बुद्ध अज्ञानी असल्याचं सांगता.

Finally…

४८ तासांत जुनी जोडणी रद्द, नवी जोडणी लागू असे दोन्ही मेसेज येतात.

पुढील २४ तासांत, मागे मिस झालेल्या सगळ्या सबसिडी अकाऊंटमध्ये डिपॉजिट झाल्याचे मेसेजही येतात.

कहाणी सुफळ संपूर्ण.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?