' ही आहेत भारतातील सर्वात जलद इंटरनेट असलेली शहरे… दक्षिणेने मारली आहे बाजी… – InMarathi

ही आहेत भारतातील सर्वात जलद इंटरनेट असलेली शहरे… दक्षिणेने मारली आहे बाजी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल फोन आणि इंटरनेट ही माणसाची जणू एक मुलभूत गरजच बनलेली आहे. इंटरनेटशिवाय जगण्याचा ते आता विचार देखील करू शकत नाही. तरुण पिढीमध्ये याची क्रेज जरा जास्तच आहे. इंटरनेटमुळे आज आपण जगाशी जोडले गेलेले आहोत.

इंटरनेटमुळे घरबसल्या आपण दूरवर असलेल्या आपल्या नातेवाईकांशी किंवा आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकतो, तसेच त्यांच्याशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे फेस टू फेस चॅट करू शकतो.

इंटरनेटवर आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती सहज उपलब्ध होते.

 

Internet speed of India.Inmarathi

 

इंटरनेट आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे, असे म्हटले तर त्यात काहीच चुकीचे नाही. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार या इंटरनेटचा वापर करत असतो. काहीजण कमी प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात, तर काहीजण खूप मोठ्या प्रमाणावर इंटरनेट वापरतात.

पण कधी – कधी आपल्या हे लक्षात येते की, काही ठिकाणी आपल्या इंटरनेटला चांगला स्पीड मिळतो, तर काही ठिकाणी खूप वाईट स्पीड मिळतो.

वाय – फायच्या बाबतीत देखील असेच काहीसे होत असल्याचे आपल्याला दिसून येते. आपला भारत देश आजच्या क्षणाला खूप मोठ्या डिजिटल क्रांतीतून जात आहे.

इंटरनेट वापरकर्त्यांची प्रचंड संख्या असलेला आपला भारत जगातील सर्वात जास्त इंटरनेट वापरणाऱ्या देशांपैकी एक देश आहे.

त्यामुळे एवढ्या जास्त इंटरनेट वापरकर्त्यांना इंटरनेटची उत्तम गती मिळवून देणे सोपे नसले, तरी देखील भारताने यामध्ये एक मोठी प्रगती करून दाखवली आहे.

 

Internet speed of India.Inmarathi1

 

इंटरनेटची स्पीड टेस्ट करणाऱ्या ओकलानुसार, भारताचा इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत जगामध्ये इतर देशांच्या तुलनेत ६७ वा क्रमांक लागतो. २०१९ मध्ये फिक्स्ड ब्रॉडबॅन्ड स्पीडच्या सहाय्याने हा आकडा काढण्यात आला होता.

हे सर्वेक्षण करण्यात आले त्याआधीच्या एका महिन्यामध्ये भारत हा इंटरनेट स्पीडच्या बाबतीत दोन स्थानांनी वर आला होता. तसेच, दुसरीकडे मोबाइल डेटाच्या बाबतीत एका महिन्यात भारताने ३ स्थानांनी वाढ दर्शवली होती.

डिसेंबर २०१९ मधील आकडेवारीनुसार सध्या भारत मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत १२८ व्या स्थानावर आहे. या यादीत दक्षिण कोरियाचे स्थान पहिले आहे.

भारतातील सरासरी फिक्स्ड ब्रॉडबॅन्ड डाउनलोड स्पीड हा ३५.८४ एमबीपीएस (एमबी प्रती सेकंद) आहे आणि मोबाईलच्या इंटरनेटची स्पीड ११.४६ एमबी प्रतिसेकंद एवढा आहे.

या अग्रगण्य स्पीड टेस्ट कंपनीने भारतातील राज्य आणि शहरांनुसार त्यांच्या इंटरनेट स्पीडचा डेटा देखील जाहीर केला आहे. जर आपण संपूर्ण भारतातील फिक्स्ड ब्रॉडबॅन्ड स्पीडबद्दल विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की, यामध्ये भारताचे दक्षिणी राज्ये आघाडीवर आहेत.

ओकला कंपनीच्या रिपोर्टनुसार, चेन्नईमध्ये इतर राज्यांपेक्षा सरासरी सर्वात जास्त डाउनलोडिंग स्पीड आहे.

चेन्नईमध्ये ५१.०७ एमबी प्रतिसेकंद एवढा सरासरी स्पीड आहे. ४२.५ एमबी प्रतिसेकंद स्पीडसह बंगलोर दुसऱ्या आणि ४१.६८ एमबी प्रतिसेकंद स्पीडसह हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबईमध्ये १७.१ एमबी प्रतिसेकंद एवढी स्पीड आहे.

इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत दक्षिणेकडील बंगळुरू हे शहर दुसऱ्या तर हैदराबाद हे शहर तिसऱ्या स्थानावर आहे.

तसेच, दिल्लीचा या बाबतीत चौथा क्रमांक लागतो. यामध्ये टॉप पाचपैकी चार शहर दक्षिण भारतातील आहेत, तर फक्त एक शहर उत्तर भारतातील आहे. मुंबईला या यादीमध्ये टॉप पाचमध्ये स्थान मिळत नाही.

 

Internet-speed-of-India.Inmarathi3

 

इंटरनेट स्पीडच्या या यादीमध्ये मुंबईचा क्रमांक फारच खाली लागतो. अर्थात ही आकडेवारी केवळ ब्रॉडबँड सेवेची असून, मोबाईल डेटा स्पीडच्या बाबतीत मात्र देशाची आर्थिक राजधानी मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?