चे ग्वेरा : गरिबांसाठी तिसऱ्या महायुद्धाची योजना आखणारा साम्यवादी क्रांतिकारी!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

कधीतरी इंटरनेटवर जगप्रसिद्ध प्रवासवर्णनात्मक चित्रपटांची यादी शोधा. यात तुम्हाला एक नाव हमखास दिसेल ते म्हणजे – मोटारसायकल डायरीज!

हा चित्रपट पाहताना बघणारा अगदी अंतर्मुख होतो. तो कोणत्याही विचारधारेचा का असेना हा चित्रपट पाहिल्यावर त्याला स्वतःच्या विचारधारेचा काहीवेळ विसर पडतो आणि चित्रपटात मांडलेल्या सद्यपरिस्थितीशी तो स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहेआणि ती सत्य घटना आहे क्युबाचा प्रसिद्ध क्रांतिकारी चे ग्वेरा च्या जीवनावर!

=====

=====


che-guevara-marathipizza

स्रोत

आपल्या मित्रासोबत अमेरिकेच्या सफरीवर निघालेल्या चे ग्वेराच्या मनावर साम्यवादी विचारधारेचा भयंकर पगडा कसा बसतो ते या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. याच साम्यवादी विचारधारेतून पुढे जन्म होतो एका क्रांतीयोध्याचा! आज आपण चे ग्वेराच्या याच क्रांतिकारी जीवनाबद्दल जाणून घेऊया.

क्युबा क्रांतीचा इतिहास वाचताना, त्याबद्दल जाणून घेताना चे ग्वेरा आपल्या मनावर अक्षरश: गारुड करतो. अथक प्रयत्नांनंतर चे ग्वेरा क्युबा मध्ये साम्यवादी क्रांती घडवून आणतो. केवळ साम्यवादचं या जगाला तारू शकतो अशी श्रद्धा बाळगून असणाऱ्या चे ग्वेराचे संपूर्ण जगामध्ये साम्यवादी क्रांती घडवून आणण्याचे स्वप्न होते. त्याची ही इच्छा इतकी प्रबळ होती की या साम्यवादी क्रांतीसाठी तिसरे महायुद्ध करण्यासही तो तयार होता.

che-guevara-marathipizza01

स्रोत

चे ग्वेरा चा जन्म १४ जून १९२८ रोजी अर्जेंटिना देशातील रोसारियो शहरात झाला. त्याचे कुटुंब देखील सुखवस्तू होते. तो स्वत: डॉक्टरकीचे शिक्षण घेत होता. त्याचे पूर्ण नाव होते- Ernesto Rafael Guevara De Le Serna!

त्याला फिरण्याची भयंकर आवड होती. यातूनच त्याच्या मित्राने आणि त्याने मोटारसायकल वरून अमेरिका खंड पालथा घालण्याची योजना आखली. या रोड ट्रीप दरम्यान चे ग्वेरा ने पहिली ती लॅटीन अमेरिकेमधील गरिबी, बेरोजगारी आणि शिक्षणाचा अभाव. प्रजेच्या या अतीव वेदना चे ग्वेरा ला साम्यवादी विचारधारेच्या अधिक जवळ घेऊन गेल्या.

फिडेल कॅस्ट्रो हे नाव कोणाला माहित नसेल तर नवलच! १९५४ मध्ये चे ग्वेरा ची फिडेल कॅस्ट्रोशी भेट झाली. या दोघांनी एकत्र येत क्युबाचा हुकुमशहा फुलगेनकिओ बतिस्ता याचे सरकार पाडले आणि क्युबामध्ये क्रांती घडवून आणली. या अभूतपूर्व यशानंतर चे ग्वेरा चा आत्मविश्वास अधिक बळावला. आता त्याला संपूर्ण जगातील गरिबांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. संपूर्ण जग केवळ साम्यवादाच्या विचारधारेवरच स्वतंत्र होऊ शकते असा त्याने समज करून घेतला. क्युबा मधील कारभार फिडेल कॅस्ट्रो आणि सहकाऱ्यांवर सोडून तो पुन्हा एकदा क्रांतीकारकच्या भूमिकेत आला आणि त्याने या वेळी क्रांती घडवून आणण्यासाठी निवडला बोलिव्हिया देश!

 

che-guevara-marathipizza03

स्रोत

याच वेळी त्याच्या मनात विचार आला की एका एका देशात क्रांती घडवून आणण्या ऐवजी संपूर्ण जगाला हुकुमशाही सरकारच्या विरोधात पेटून उठवावे. त्या दिशेने त्याने तयारी सुरु केली. त्याची ही तयारी म्हणजे एकप्रकारे तिसऱ्या महायुद्धाचे बिगुल होते. पण त्याचे हे प्रयत्न अपुरे पडले आणि बोलिव्हिया मधील चे ग्वेरा ची क्रांती फोल ठरली.

खचलेल्या चे ग्वेरा चा फायदा घेऊन ७ ओक्टोंबर १९६७ रोजी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने आणि बोलीव्हीयाच्या आर्मीने मिळून त्याला पकडले आणि दोन दिवसांनी ९ ओक्टोंबर रोजी त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

che-guevara-marathipizza02

स्रोत

=====

=====

मृत्यूपूर्वी चे ग्वेरा चे उद्गगार होते,

मला माहिती आहे की तुम्ही मला गोळ्या घालणार आहात. तुम्ही एका माणसाला मारू शकता पण त्याच्या विचारांना कधीच संपवू शकत नाही हे लक्षात ठेवा.

che-guevara-marathipizza04

स्रोत

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: