भारतातल्या “या” शहरात चक्क कांदे-बटाट्याच्या भावात विकले जातात काजू!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपले आरोग्य जपायला आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. जसे की- योगासने, प्राणायाम, दूध, पौष्टिक आहाराचा समावेश इत्यादी. सुकामेवा हा सुद्धा या प्रयोगातील एक. याचे सेवन आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते.

कमी प्रमाणात घेऊनसुद्धा जास्त प्रमाणात ऊर्जा, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिज देणारे पदार्थ म्हणजे सुका मेवा.

हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असल्याने व स्निग्ध पदार्थाची गरज असल्याने, हिवाळा हा सुकामेवा घेण्यासाठीचा उत्तम काळ.

 

dryfruits-inmarathi
amazon.in

शरीराला यामुळे खूप सारे फायदे मिळतात आणि म्हणूनच आपण याचा वापर विविध खाद्यपदार्थांमध्ये आवर्जून करतो. मग ती मिठाई असो किंवा चिवडा. दिवाळीच्या खाद्यपदार्थांची चव वाढवतात ते काजू, बेदाणे, पिस्ते असे सुक्यामेव्यातील घटक.

काजू कतली न आवडणारा माणूस विरळाच. आजकाल तर अनेक बिस्किटांमध्ये सुद्धा काजू आणि बदाम यांचा सर्रास वापर केला जातो.

भारतात मात्र बहुतांश लोकं या सुक्यामेव्याची किंमत ऐकूनच तो विकत घेण्याचा फंदात पडत नाहीत.

आपल्या खिशाला हे परवडणार नाही त्यामुळे नकोच ते अशी त्यांची धारणा असते. परवडेल असा सुकामेवा ही गोष्ट अस्तित्त्वात तरी आहे का असा प्रश्न पडावा असे याचे भाव गगनाला भिडलेले आपल्याला पाहायला मिळतात.

किमान आठशे – बाराशे रुपये प्रति किलो किंमतीला हा सुकामेवा विकला जातो.

 

dry-fruit-inmarathi
pinterest.com

जर आपल्याला कोणी सांगितलं की यातले सर्वात चविष्ट आणि आपल्यापैकी कित्येकांना आवडणारे काजू भारतातील एका शहरात कवडीमोलाने विकले जातात तर तुमचा त्यांच्या किमतीवर विश्वास बसणार नाही.

तुम्ही त्यांची किंमत ऐकून तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.

कारण इथे काजूची किंमत ही कांदे-बटाट्यांच्या किंमतीएवढी कमी आहे.


तुम्हाला कोणी सांगितलं की भारतात हजार-बाराशे रुपये प्रति किलो किंमतीला मिळणारे काजू इथे फक्त १०-२० रुपये किलोने मिळतात तर? चकित झालात ना? फक्त १०-२० रुपये किलो? पण हे खरं आहे. यासाठी आपल्याला परदेशात जायची गरज नाही.

आपल्याच देशातील झारखंड राज्यातील जामताड़ा जिल्ह्यामध्ये काजू हे कांदे-बटाटे आणि इतर भाज्यांच्या किंमतीला मिळतात.

आता तुमचं कुतूहल निश्चितच चाळवलं गेलं असेल की एवढ्या कमी किंमतीत इथे काजू मिळण्यामागचं गुपित काय?

 

jamtara-inmarathi
youtube.com

जामताड़ा जिल्हा मुख्यालयापासून जवळपास चार किमी. अंतरावर ४९ एकरच्या विशाल भूभागावर काजूच्या बागा आहेत. इथे दरवर्षी हजारो टन काजूचे उत्पादन होते. इथे बागांमध्ये काम करणारे स्त्री पुरुष स्वस्तामध्ये या काजूची विक्री करतात.

काजूच्या शेतीमधून मिळणारे फायदे लक्षात घेता आणि देशातील इतर प्रांतांमध्ये गगनाला भिडलेले काजूचे भाव पाहता काजूची शेती करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

आश्चर्याची गोष्ट ही की एवढ्या विशाल क्षेत्रफळावर काजूची शेती आणि त्यापासून इतके चांगले उत्पादन हे गेल्या काही वर्षांमधील प्रयत्नांचे फलित आहे.

जामताड़ाच्या लोकांचे असे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी जामताडाचे एक्स डेप्युटी कमिशनर कृपानंद झा यांचे इथे पोस्टिंग झाले. त्यांना काजू खूप आवडत असत.

त्यांच्या आभाळाला भिडलेल्या किंमती बघून त्यांच्या मनात काजूची शेती करण्याचा विचार आला.

त्यांनी ओडिसाच्या कृषी वैज्ञानिकांकडून जमिनीचे परिक्षण करून घेऊन इथे शेती करायला सुरुवात केली आणि काही वर्षांमध्येच विस्तीर्ण भूभागावर काजूच्या बागा दिसायला लागल्या.

 

Cashew-Farming-inmarathi
agrifarming.in

मिस्टर झा इथून गेल्यावर केवळ तीन लाख रुपयांच्या बदल्यात निमाई चन्द्र घोष अँड कंपनीला याच्या निगराणीचे काम सोपविण्यात आले. पण या संपूर्ण बागेची निगराणी करण्यात ते अयशस्वी ठरले.

त्यामुळे जामताड़ाचे रहिवासी आणि इथून जाणारे वाटसरू फुकटात इथून काजू तोडून घेऊन जातात आणि त्यांची विक्री अत्यल्प किंमतीत करतात.

राज्य सरकार कृषी विभागाच्या साहाय्याने विशाल भूभागावर काजूची झाडे लावण्याची तयारी करत आहे पण अजूनपर्यंत त्याची सुरुवात झालेली नाही.

त्यामुळे तुम्ही सुद्धा जर कांदे बटाट्याच्या भावात काजू खाऊ इच्छित असाल तर जामताड्याला जरूर जा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *