' अपघात होण्याआधीच ही “टेस्ला” कार अपघाताची भविष्यवाणी करते – InMarathi

अपघात होण्याआधीच ही “टेस्ला” कार अपघाताची भविष्यवाणी करते

 

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आपण आत्तापर्यंत अनेक sci fi चित्रपटांमध्ये सुपर कार्स पहिल्या असतील ज्या अनेक करामती करतात. अश्या कार्स खऱ्या दुनियेमध्ये आणण्याचे बरेच प्रयत्न चालू असतात.

ऑडी, मर्सिडीस, बीएमडबल्यू ह्या अग्रणी कंपन्या  पेट्रोल डिझेल सारख्या Conventional Fuel वर चालणाऱ्या खूप सुंदर, आधुनिक आणि महागड्या प्रिमिएम स्पोर्ट्स कार्स तयार करतात. पण ह्या सुपर कार्स च्या दुनियेत एक अशी कार तयार करणारी कंपनी आहे जी भविष्याचा विचार करते, तिचं नाव आहे “टेस्ला”!

tesla-car-marathipizza02

स्रोत

२००३ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी इलेक्ट्रिक कार्स बनविते, त्यांच्या design ऑडी, मर्सिडीसच्या स्पोर्ट्स कार सारख्या आहेत पण टेस्लाच्या कार्स चालतात Electrical Energy वर!
या क्षेत्रात क्रांती करून त्यांनी अजून एक पाऊल टाकले आहे नवीन ऑटो पायलट कार्स तयार करून, म्हणजे ह्या कार्स कोणत्याही ड्राइवर शिवाय चालू शकतात.

tesla-car-marathipizza01

स्रोत

तर त्यांच्या ह्या ऑटो पायलट कारचा, एका कस्टमरने टाकलेला एक विडिओ सध्या youtube वर धुमाकूळ घालतो आहे. हा विडीओ कारच्याच डॅश कॅमेरा ने शूट केला आहे.

ह्या विडिओ मध्ये असे दिसते आहे की, टेस्ला कार द्रुतगती मार्गावरून हाय स्पीड मध्ये जात आहे, इतक्यात एक बीप ऐकू येते आणि कार emergency ब्रेक्स apply करून थांबते, आणि पुढच्या क्षणात समोरील दोन कार्स ची टक्कर होऊन, दुसरी कार उलटी होते. ही बीप म्हणजे कार चा Front Collusion Alarm होता. जर टेस्ला कार ने वेळीच ब्रेक्स नसते लावले तर ह्या अपघातामध्ये ती देखील सामील झाली असती, पण खरी अचंब्याची गोष्ट ही नाहीये, आश्चर्य तर हे आहे की, अपघात होण्याआधी, समोरील गाडीची टक्कर होण्याआधी, पूर्ण एका सेकंदाआधी टेस्ला कार ने बीप देऊन पुढील अपघाताची भविष्यवाणी केली.

tesla-car-marathipizza03

स्रोत

ह्या कार ने पुढील Electric युगाची देखील भविष्य वाणी केली आहे असेच म्हणावे लागेल!

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Sushil Joshi

I am Sushil.

sushil-joshi has 2 posts and counting.See all posts by sushil-joshi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?