अणुबॉम्ब नं वापरता भारत आणि चीन दोघं मिळून, अमेरिकाला युद्धात हरवू शकतील का?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

भारत आणि चीन जगातली मोठी सैन्य शक्ती असलेले देश. जर ह्या दोन्ही शक्ती एकत्र झाल्या तर जग आपल्यामुढे नमतं घेईल, असं कुणालाही वाटू शकतं. पण – हे दोघं देश मिळून अमेरिकेला हरवू शकतील का?

क्वोरावर हा प्रश्न विचारला गेला. त्यावर दिलेलं हे उत्तर, आपल्याला अमेरिकन सैन्याची ताकद आणि त्यासमोर इतर सर्व देशांचे defense किती इवलेशे आहेत हे दाखवतं.

 

१) अमेरिकेचा, एकट्याचा सैन्यावरचा खर्च जगातील सर्व शक्तींच्या एकत्रित खर्चापेक्षा जास्त आहे.

===
===

 

US-others_defense-comparison-marathipizza

 

२) Technologyच्या बाबतीत अमेरिकेसमोर चीन किती छोटा आहे ह्याची छोटीशी झलक २०१०चे हे आकडे दाखवतात

 

US-China-military-comparison-marathipizza

 

३) अमेरिका – 11 aircraft carriers (लढाऊ विमानांना वाहून नेणारं जहाज), 139 stealth aircraft (रडार किंवा सोनारमध्ये दिसू नं शकणारे लढाऊ विमान)

भारत आणि चीन – प्रत्येकी 1 aircraft carrier आणि शून्य stealth aircraft !

इतरही प्रत्येक advance defense तंत्रात भारत आणि चीन दोघेही अमेरिकेसमोर टिकू शकत नाहीत.

 

४) अमेरिका, त्यांच्या असंख्य military satellites च्या मदतीने प्रत्येक देशावर कडक नजर ठेऊन आहे. त्यामुळे कुठल्याही देशाने अमेरिकेवर आक्रमण करण्याची थोडी जरी चिन्हं दाखवली तरी अमेरिका त्या देशावर ICBM (Intercontinental ballistic missile) ने हल्ला करून तो देश बेचिराख करू शकते.

 

===
===

५) अर्थात – हे सर्व “जर भारत+चीन ने अमेरिकेवर हल्ला केला” तर. जर उलट घडलं, म्हणजेच अमेरिकेने भारत किंवा चीनवर हल्ला केला, तर हे दोन्ही देश स्वतःला सहज defend करू शकतात आणि अमेरिकेचा हल्ला परतवू शकतात.

 

थोडक्यात – इकडून तिकडे हल्ला करणारा असो किंवा तिकडून इकडे हल्ला करणारा असो – हल्लेखोर नक्कीच पराजित होणार.

भारत, चीन आणि अमेरिका – तिघेही हे सर्व चांगलंच जाणून आहेत. म्हणूनच वेगवेगळ्या “अहिंसक” मार्गाने एकमेकांवर आर्थिक कुरघोडी करण्याचे प्रयत्न हे तिन्ही देश करत आहेत.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

 

Omkar Dabhadkar

Editor @ मराठी pizza

omkar has 206 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?