' मोदींना “पर्याय नाही” म्हणून ते २०१९ जिंकतील – हे कितपत सत्य आहे? वाचा.. – InMarathi

मोदींना “पर्याय नाही” म्हणून ते २०१९ जिंकतील – हे कितपत सत्य आहे? वाचा..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मोदी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे स्टार खेळाडू आहेत. सगळे राजकीय विश्लेषक आपली बुद्धी पणाला लावून मोदींबद्दल भाकीत करत आहेत. मोदी २०१९ ची निवडणूक २०१४ सारखी जिंकून निवडून येवू शकणार नाहीत असा एक ठाम मतप्रवाह आहे.

अर्थात भाजप आणि भाजपा चे खंदे समर्थक या गोष्टींचा विरोध करतात.

मोदींच्या विरुद्ध कोणीही खंदा विरोधक नाही. आज तरी मोदीला पर्याय दिसत नाही. सगळे विरोधक मोदींविरुद्ध एकवटलेले आहेत पण तरीही त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही त्यामुळे २०१९ ला मोदीच निवडून येणार असा जयघोष भाजप करताना दिसतो.

 

modi-bjp
youtube.com

२०१४ सालची गोष्ट पाहिली तर anti-incumbency च्या विरोधात लोकांनी मतदान केले. मोदी नावाची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेवर स्वार होवून भाजप निवडून आला पण ही सत्ता भाजप टिकवून ठेवू शकेल काय?

कारण जसे आज भाजप मोदीला पर्याय नाही असे म्हणत आहे तोच भाजप २००४ साली अटलबिहारी वाजपेयी यांना पर्याय नाही असे ठासून सांगत होता.

२००४ साली वाजपेयी हे भाजप चा राष्ट्रीय चेहरा होती. लोकांचे आवडते पंतप्रधान होते. पोखरण आणि कारगिल प्रकरणात त्यांची भूमिका लोकांना आवडली होती.

त्यावळी पक्षांतर्गत वाजपेयींच्या सर्वात जवळ असणारे प्रमोद महाजन यांनी शायनिंग इंडिया कँपेन राबवले.

फील गुड, शायनिंग इंडिया हे शब्द ज्याच्या त्याच्या कानावर पडायचे आणि त्यावेळी भाजप च्या विरोधात होता सोनिया गांधी यांना घेवून उभा राहिलेला अशक्त आणि दुबळा कॉंग्रेस पक्ष.

 

vajpayee-inmarathi
youtube.com

सोनिया गांधींच्या पारड्यात मत जाणार नाहीत याची भाजप ला पक्की खात्री होती मात्र निवडणुकीच्या निकाला नंतर लोकांनी भाजप चा फील गुड शायनिंग इंडिया नाकारला होता.

इतिहासात जर डोकावून पहिले तर १९७७ साली इंदिरा गांधी यांना देखील भारताच्या राजकीय इतिहासा मध्ये त्यावेळी कुणी टक्कर देवू शकेल असा प्रतिस्पर्धी नव्हता.

पण तरीही एक लक्षात घेतलं पाहिजे इंदिरा गांधी यांनी देखील जनतेला जी वचने दिली होती, गरीबी हटाव यासारखे नारे दिले होते ती वचने त्या पूर्ण करण्यात कुठेतरी अपयशी पडल्या होत्या.

 

indira surname gandhi why.marathipizza
jagran.com

त्यात भर टाकली १९७५ सालच्या आणीबाणी ने. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदा कॉंग्रेसएतर सरकार सत्तेवर येवू शकले. १९८४ साली इंदिरा गांधी गेल्यानंतर देखील राजीव गांधीना त्यांचा वारसदार म्हणून पुढे गेले. लोकांनी कॉंग्रेस च्या पारड्यात भरभरून मते टाकली.

राजीव गांधी हे आधुनिक भारताचा चेहरा होते. त्यांना भारतात आर्थिक सुधारणा करायच्या होत्या, समाजमान उंचवायचे होते.

स्वच्छ चारित्र्याचा पंतप्रधान अशी त्यांची प्रतिमा होती मात्र बोफोर्स सारख्या प्रकरणात ही प्रतिमा डागाळली गेली.

जी सहानुभूतीची लाट राजीव गांधी यांना १९८४ साली पंतप्रधान बनवून गेली त्याच्या नंतर च्या निवडणुकी मध्ये त्याचा कुठलाही करिष्मा त्यांच्या उपयोगाला आला नाही. १९८९ च्या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली.

 

atal-rajeev-inmarathi
dnaindia.com

ही उदाहरणे जर ध्यानात ठेवली तर जर अशी लाटांवर स्वार होवून ज्या निवडणुका जिंकल्या जातात त्या तशा अल्पायुषी असतात असे लक्षात येईल. प्रत्येक वेळी तोच करिष्मा पुन्हा निर्माण होईल असे होत नाही.

त्यामुळे मोदींना युगपुरुष मानणाऱ्या भाजप ने या इतिहासाचा विचार करायला हवा.

शिवाय २०१४ साली मोदी anti-incumbency चा प्रचार करून सत्तेवर आलेले होते. आज विचार करायचा झाला तर भाजप ची २२ राज्यांमध्ये सत्ता आहे. त्यामुळे anti- incumbecny चा चेंडू आता कॉंग्रेस आणि इतर पक्षांच्या हातात गेलेला आहे.

२०१६ पासून भाजप च्या समर्थकांमध्ये कमालीची घट दिसून येत आहे.

CSDS ने घेतलेल्या moods of nations या सर्व्हे मध्ये ४७% लोकांनी मोदी सरकार पुन्हा निवडून येण्याच्या अवस्थेत नाही असे मत नोंदविले.

 

modi-inmarathi
punjabtribune.com

ग्रामीण भागात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, २०१४ साली शेतकऱ्यांना दिलेली वचने पाळण्यात आलेले अपयश यामुळे ग्रामीण भागातील समर्थन देखील काही प्रमाणात भाजप विरोधी झालेले दिसून येत आहे.

या गोष्टींकडे लक्ष न देता भाजप ची मोदी ला पर्याय नाही ही थिअरी चालूच राहिली तर २०१९ ची निवडणूक भाजप साठी अवघड जाईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?