' मनपा निकाल : भाजपची सेनेला अप्रत्यक्ष मदत आणि “देवेन्द्रयुग” घोषणेची घाई – InMarathi

मनपा निकाल : भाजपची सेनेला अप्रत्यक्ष मदत आणि “देवेन्द्रयुग” घोषणेची घाई

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

महानगर पालिका आणि जिल्हापरिषद ह्यांचे निवडणूक निकाल सोबत लागले असले तरी माध्यमाचा सगळा भर पालिकांवर आहे. TRP ची गणिते आणि ब्रेकिंग न्युज देणारे उमेदवार महापालिकांत असल्यामुळे असेल कदाचित. ह्या विश्लेषण कुंभ मेळ्याचा भर ‘सेना संपली’, ‘भाजप उगवली’, ‘देवेंद्र अवतरले’ आणि ‘नोटबंदी निस्तरली’ असा आहे. त्यामुळे हे पालिका निकाल संगितले जाताहेत तितके महत्वपूर्ण नसले तरी ह्या चारी दाव्यांची चिकित्सा आणि त्यांचा पुढील राजकारणावर होणार परिणाम ह्यावर चर्चा करणे गरजचे ठरते.

पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेचा उदय-अस्त.

राज्यभरातील पालिकांचे निकाल बघितल्यास (तसेच झेडपीचे पण) भाजपचे संख्याबळ वाढले हे निश्चित. मुळात निवडणूक हा शुन्य शिल्लकी चा खेळ (zero sum game) असल्याने भाजप वाढली तर कोण खुंटले हा प्रश्न नक्की पडतो. मुंबई पालिका सर्वात जास्त चर्चेत असल्याने घाईत त्याचे उत्तर कुणी “शिवसेना” असे देईल एकवार. पण राजव्यापी आकडे तसेच पक्षांचे बलाबल बघता, भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी चा space व्यपला आहे. त्यातही काँग्रेस हे “अनिर्णायकी नेतृत्व” आणि राष्ट्रवादी हे “अनुभवी आणि संयमी आणि कुटील नेतृत्व” ह्यामुळे आकसले आहे हे दिसते. पालिकेतील भाजपच्या वाढीव जागा तिथूनच आलेल्या आहेत. त्यातही शिवसेना आणि तिचे संख्याबळ आहे तिथे आणि थोड्याफार फरकाने होते तेवढेच आहे हे पण लक्षात येते. हे सर्व आजच दै लोकमत मध्ये आलेल्या तक्त्यांतून स्पष्ट दिसत आहे.

Corporation Election 2017 Results Lokmat 01 marathipizza
सौजन्य: लोकमत

 

Corporation Election 2017 Results Lokmat 02 marathipizza
सौजन्य: लोकमत

 

Corporation Election 2017 Results Lokmat 03 marathipizza
सौजन्य: लोकमत

 

Corporation Election 2017 Results Lokmat 04 marathipizza
सौजन्य: लोकमत

त्यातही इतर पालिका आणि झेडपी साठी शिवसेना आणि भाजप ह्यांनी उघड उघड दावे केलेले नव्हते. पण मुंबईच्या बाबतीत दोघांनी ही “संपूर्ण बहुमत…!” असाच डाव मांडल्याचे भासवले होते. शिवसेना त्यातल्या त्यात ह्या बद्दल फार गंभीर असेलेले दिसली. त्यामुळे सेनेला आवडले असते तेवढे भव्य यश त्यांच्या फोकस एरियात मिळालेले नाही हे कदाचित उद्धवना हे आवडलेले नसणार. पण त्याच बरोबर विजयातील हा अपुरेपण आणि त्यामागील करणे ह्याचा मागोवा आणि त्या अनुषंगाने लागणारी मेहेनत जर सेनेने घेतली तर मात्र भविष्य वेगळे असू शकेल. तूर्तास सत्ता आणि विरोधी पक्ष असा संपूर्ण स्पेक्ट्रम भाजप शिवसेनेने व्यापला आहे असेच म्हणावे लागेल. विधानसभा निवडणूक ते आज पर्यंत लोकांनी मते देऊन त्याला आपली मूक संमती पण दिलेली आहे असे दिसते. ज्याप्रमाणे तामिळनाडूत दोन द्राविडी पक्ष आपसात सर्व राजकारण वाटून घेत आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्राची वाटचाल होते आहे असे दिसते. आणि त्या न्यायाने – 2014 नंतर खुद्द भाजपने शिवसेनेला, कमी उंच का होईना पण स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले हे लक्षात घायला पाहिजे.

devendra-fadnavis-with-uddhav-thackeray_marathipizza

शिवसेना जगतीये आणि जिंकतीये हाच “शत प्रतिशत” चा पराभव आहे, सक्षम पर्याय जिवंत नसावा हेच प्रभावी राजकारणाचे मूळ असते.

त्याच प्रमाणे anti-incumbency असा जो प्रकार आपल्याला सांगितलं जातो त्या प्रमाणे pro-incumbency म्हणजे सत्तान्वेषी वळण सुद्धा निकालांना असते हे लक्षात घायला पाहिजे. आज जसे युती चा बोलबाला पालिकेत आहे तसा आघाडी ची सत्ता असतानाचे पालिकांचे निकाल बघितले कि सत्तापक्षाला त्यात्यावेळी लोकांनी झुकते माप मिळालेले दिसेल. झेडपी आणि गाव पातळीवर मात्र पारंपरिक पकड कायम असल्याचेच चित्र दिसते.

 

मोठी पालिका म्हणून मुबाईच्या निकालांचे निरीक्षण केले असता दोन गोष्टी अगदी स्पष्ट होतात.

पहिली म्हणजे शिवसेनेचं राज ग्रह अजूनही वक्र आहे आणि तो दर वेळी थोडा फार प्रभाव दाखवतोच. आता निकाल लागलेले असल्याने मुंबईचे सगळे राजकरण महापौर पदाभोवती फिरणार असे दिसते. जम्मू काश्मीर प्रमाणे, थोडा का होईना महापौर पदावर बसून सत्तेचे आपले कथानक/narrative रचण्यावर भाजप चा भर असणार. पण त्यासाठी शिवसेनेची कोंडी करताना मुंबई महापौर पदाला लागू पडणारा न्याय मुख्यमंत्री पद आणि इतर मंत्रिपद ह्यांना पण लागू पडेल का – हा महत्वाचा प्रश्न असणार आहे. इथे मात्र सेनेची बार्गेनिंग शक्ती जास्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे माध्यमातून महापौर पदासाठी भाजप सेनेची किती कोंडी करेल असे दाखवले गेले असले तरी 82 नेत्यांसह भाजप हीच negotiation table वर येऊन बसलेली आहे हे लक्षात येते. त्यातही अपक्षांना सोबत घेऊन भाजप काही दमदार डाव खेळेल असे वाटणे स्वाभाविक असले तरी पवित्रा म्हणून तो तात्कालिक/tactical स्वरूपाचा आहे हे लक्षात घ्याल पाहिजे. मुंबई असो की इतरत्र – आयात पचण्याचा जो जबरदस्त ट्रॅक रेकॉर्ड काँग्रेसचा आहे तसा तो भाजपचा नाही, त्यामुळे दीर्घकालीन व्युव्हरचना म्हणून एकंदरीत भाजप ला हे पचन जमेल का हा प्रश्नच आहे.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ह्यांनी ह्या निवडणुकीत खूप श्रम घेतलेले आहे. आधीचे नगरपालिका आणि आताचे महानगरपालिका निकाल मिळून आता महाराष्ट्रात देवेंद्र युग आले आहे असे म्हटले जाते. पण ते खूप घाईचे ठरते.

bjp modi shah fadnavis marathipizza

तुमच्या शब्दाने, तुमच्या असण्याने आणि तुमच्या मौनाने जेव्हा निकाल फिरतात तेव्हा नेते किंवा युग म्हणून तुम्ही अवतरला (have arrived) असे म्हणता येते. स्वतः देवेंद्र कितीही लोभस किंवा स्वच्छ असले तरी ते कंपनी CEO सारखे – पात्र पण स्थापित केलेले आहेत – हे मागील कसोटी वरून स्पष्ट होते. त्यामुळे CEO देवेंद्र ह्यांनी अजून एका तिमाही चा निकाल चांगला लावून दाखवला, तर कदाचित पुढे जाऊन ते नेते म्हणून प्रस्थापित होतील असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राचे राजकारण त्यांच्या भोवती फिरायला अजून खूप वेळ आहे. ज्या दिवशी आपल्या मर्जी प्रमाणे देवेंद्र हे भाजप चे प्रदेशाध्यक्ष बदलतील त्या दिवशी फडणवीस has arrived असे समजावे.

मुळात मोदी च्या भाजप ला ceo टाईप लोक नेतृत्व म्हणून आवडतात असे दिसते. खट्टर ह्यांच्या निवडीत आपल्याला ते दिसून आलेले आहे. बिहार किंवा आताच्या UP निवडणुकीत भाजपनं मुख्य चेहरा म्हणून कुणालाही प्रोजेक्ट केलेले नाही! त्यामुळे “गुणी देवेंद्र” आणि “शक्तिशाली देवेंद्र” ह्याची गफलत होऊ नये. एकवेळ श्रेष्टी बळामुळे पक्षात त्यांना कुणी आव्हान देणार नाही पण
मराठा मूक मोर्चा सारखी बाहेरील आव्हाने इथून पुढे मूक राहील का? ह्याचे उत्तर “नाही” असेच आहे.

मुळात भाजपचं सुर बहुजन दलित आणि मग क्षत्रिय असा इतर राज्यात दिसून आलेला आहे. त्यामुळे महाराष्टात जातीबल बघता देवेंद्र 5 वर्ष टिकवले जातील असे वाटते आणि दरम्यान मुंढे ह्यांची जागा भरून काढणारे बहुजन नेतृत्व शोधून प्रोजेक्ट केल्या जाऊ शकते. किंबहुना तसे होई पर्यंत देवेन्द्र ह्यांना केंद्रात बोलावतील असे दिसत नाही आणि मोदी मार्ग सुकर करण्यासाठी काढलेले गडकरी पण महाराष्ट्रात परत येतील असे दिसत नाही. सोबत वेगळा विदर्भ आहेच.

हे सगळे बोलत असताना मतदार म्हणून लोकमानस सतत प्रवाही असते हे पण लक्षात घेतले पाहिजे.

elections-courtsey-livemint

म्हणजे tv वर बोलतात तसे 1999 चे ठोकताळे आज तसेच लागू पडणार नाहीत हे लक्षात येते. त्यामुळे हा निकाल आणि नोटबंदी ह्यांचा संबंध जोडताना नोटा बंदी हा मोदींचा निर्णय म्हणून सांगितला आणि मानला गेलेला आहे हे विसरायला होत नाही. आणि त्यामुळे त्याचा काय तो पडसाद असेल तो लोकसभा निकालात जास्त दिसून येईल ह्यावर विश्वास ठेवता येतो. त्याच सोबत निव्वळ भावनिक आवाहनाचे दिवस सम्पलेत, आमचे मावळे आणि मला साथ द्या ह्याचे पण दिवस सरलेत हे लक्षात येते.

जगातील निवडणूक ह्या वोट बँकेची पक्की गणिते, perception चे व्यवस्थापन आणि जिंकू शकणारे शॉर्ट टर्म उमेदवार, Social मीडिया,  – ह्यांवर आधारित राहतील असे दिसते. त्यामुळे छान प्रकारे convince केलेले असल्यास लोकांना गृहीत धरले जाण्याचे फार वाईट वाटत नाही – असा काहीसा धक्कादायक निष्कर्ष आपल्या समोर येतो.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?