दिवाळीमध्ये बाईक खरेदी करताय? तर ‘ह्या’ १ लाखांपेक्षा कमी किंमतीच्या बाईक्सचा नक्की विचार करा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

सर्वात आधी तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीला सुरुवात झाली आहे आणि सर्वांचीच आता धावपळ सुरू झाली असेल. दिवाळीमध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन वस्तू आपण खरेदी करतो. काहीजण दिवाळीच्या ह्या शुभ मुहूर्तावर बाईक देखील खरेदी करतात. पण बाईक घेताना, जी बाईक आपण घेत आहोत तिच्याबद्दल आपल्याला योग्य ती माहिती असणे गरजेचे आहे, कारण कधी कधी आपण उत्सुकतेने कोणतीही बाईक घेतो आणि कालांतराने आपण ही बाईक का घेतली, म्हणून आपल्याला पश्चाताप होतो. त्यामुळे कोणतीही बाईक घेताना तिची योग्य ती माहिती काढणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला काही अश्या बाईक सांगणार आहोत, ज्यांचे बजेट १ लाखांच्या आत आहे आणि त्या चालवण्यासाठी देखील खूप चांगल्या आहेत.

१. यमाहा एफझेड-एस (Yamaha FZ-S ) :

Bikes.Inmarathi
gaadicdn.com

यमाहा एफझेड-एस ही बाईक २०१४ मध्ये लाँच करण्यात आली. ही बाईकचे इंजिन १४९ सीसीचे आहे. ही बाईक दिसायला देखील खूप चांगली आहे. तिचे वजन १३२ किलो इतके आहे. या बाईकची पॉवर ८००० आरपीएमला १३.२ एचपी एवढी आहे. तसेच, टार्क ६००० आरपीएमला १२.८ एनएम एवढी आहे. या बाईकची किंमत जवळपास ९५००० एवढी आहे.

 

२. बजाज अवेंजर २२० :


Bikes.Inmarathi1
maxabout.us

बजाज अवेंजर ही भारतानी बनवलेली पहिली क्रुज गाडी आहे. २००५ मध्ये अवेंजर ही बाईक लाँच करण्यात आली होती. आता याच अवेंजरच्या दोन नवीन मॉडेल लाँच करण्यात आलेल्या आहेत. या नवीन अवेंजरमध्ये दोन वर्जन आहेत. एक आहे अवेंजर स्ट्रीट आणि दुसरी अवेंजर क्रुज. त्यामधील स्ट्रीट मॉडेल २२० सीसी आणि १५० सीसीच्या आवृत्तीमध्ये उपलब्ध आहेत आणि क्रुजमधील २२० सीसी ही आवृत्ती आहे. २२० क्रुजचे मायलेज ४० किमी / ली आहे. तिचे वजन १५५ किलो एवढे आहे. या बाईकची पॉवर ८४०० आरपीएमला १९.३ एचपी एवढी आहे. तसेच, टार्क ७००० आरपीएमला १७.५ एनएम एवढी आहे. या बाईकची किंमत जवळपास ८८१६६ एवढी आहे.

 

३. टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० – ४ व्ही :

Bikes.Inmarathi2
ste.india.com

चेन्नई आणि कोइंबतूरच्या रेस ट्रॅक्सवर विकसित करण्यात आलेली टीव्हीएस अपाचे ही एकमेव भारतीय बाईक आहे. तिच्या नावाप्रमाणेच तिचे इंजिन १९७.७५ सीसी आहे. सिंगल सिलिंडर, एअर – ऑईल – कुल इंधन इंजिन आहे. ही बाईक एबीएस आणि स्टॅन्डर्ड या दोन इंजिन प्रकारात येतात. टीव्हीएस अपाचे २०० ची पॉवर ८५०० आरपीएमला २०.५ एचपी एवढी आहे. तसेच, टार्क ७००० आरपीएमला १८.१ एनएम एवढी आहे. या बाईकची किंमत जवळपास ९२५०९ एवढी आहे.

 

४. बजाज पल्सर २०० एनएस :

Bikes.Inmarathi3
vicky.in


बजाज पल्सर एनएस ही बाईक पहिल्यांदा १६० सीसी इंजिनमध्ये काढण्यात आली होती. ही बाईक चालण्यासाठी देखील खूप चांगली आहे. या बाईकचा कम्फर्ट पण खूप चांगला आहे. तुम्ही लांबच्या ट्रीपसाठी तिचा वापर करू शकता. आता हीच बाईक १९९.५० सीसी इंजिनमध्ये लाँच करण्यात आलेली आहे. सिंगल सिलिंडर असलेल्या या बाईकची पॉवर ९५०० आरपीएमला २३.५ एचपी एवढी आहे. तसेच, टार्क ८००० आरपीएमला १८.३ एनएम एवढी आहे. या बाईकची किंमत जवळपास ९६३८४ एवढी आहे.

 

५. सुझुकी जीक्सर एसएफ :

Bikes.Inmarathi4
autocarindia.com

सुझुकी जीक्सर एसएफ ही या बजेटमधील सर्वात जास्त लोकांना पसंत पडलेली बाईक आहे. २०१४ मध्ये सुझुकी जीक्सर मूळ वर्जन लाँच करण्यात आले होते. नुकतेच जीक्सरचे हे नवीन वर्जन लाँच करण्यात आले आहे. यामध्ये १५४.९० सीसी असून, तिचे वजन १३९ किलो आहे. या बाईकची पॉवर ८००० आरएमपीला १४.८ एचपी एवढी आहे. तसेच, टार्क ६००० आरपीएमला १४ एनएम एवढी आहे. या बाईकची किंमत जवळपास ९४२०५ एवढी आहे.

अश्या या स्वस्तात मस्त बाईकची राइड करताना देखील तुम्हाला खूप मज्जा येईल आणि तेवढीच सुरक्षा देखील मिळेल. चला मग लवकर ठरवा या दिवाळीत तुम्ही यापैकी कोणती बाईक घेणार..

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *