' मोदींवर सर्वबाजूने होणाऱ्या “हल्ल्यांचा” एका सायकॉलॉजिस्टने घेतलेला भेदक आढावा – InMarathi

मोदींवर सर्वबाजूने होणाऱ्या “हल्ल्यांचा” एका सायकॉलॉजिस्टने घेतलेला भेदक आढावा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

हे जगभरातील गनिमी काव्यांमध्ये वापरले गेलेले एक प्रभावी शस्त्र आहे. ज्या शत्रूबरोबर आपण समोरासमोर लढून जिंकू शकत नाही, ज्यांच्या समोर येण्याची सुद्धा भीती वाटते अशा शत्रूला गनिमी काव्याने हरवता येऊ शकते. यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते.

यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूसैन्याचे मनोधैर्य खच्ची होते.

गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. हीच पद्धत सध्या भारतात नरेंद्र मोदींबाबत प्रस्थापित विरोधकांनी, अभ्यासकांनी आणि विशिष्ट विचारांच्या प्रसार माध्यमांनी अवलंबलेली दिसून येते.

इथे फरक फक्त इतकाच आहे की इथे जे विरोधक गनिमी काव्याने लढाई करू पाहत आहेत, त्यांचा शत्रू कोणी परकीय शक्ती नसून तोही याच मातीतला आहे, भूमिपुत्र आहे.

 

modi-inmarathi
punjabtribune.com

आजवरच्या इतिहासात, जेव्हा जेव्हा प्रशिक्षित नसलेल्या, शिस्तबद्ध नसलेल्या, आणि काही वेळेस नैतिकदृष्ट्या देशोधडीला लागलेल्या, स्वतःला लढवय्ये म्हणवणाऱ्या समूहासमोर शत्रू उभा ठाकलाय, तेव्हा तेव्हा त्यांनी शत्रूला संपवता तर येणार नाही हे लक्षात घेऊन शत्रूला इतकं जखमी केलंय की शत्रू मृत्यूशय्येवर असल्याची परिस्थिती निर्माण होईल.

ते या छुप्या युद्धात जिंकण्यासाठी सर्व नीतिनियम धाब्यावर बसवून त्याच्यावर हल्ला चढवितात.

बहुतेकदा ते यात अयशस्वी होतात पण काहीवेळेस जिंकतात सुद्धा. जिंकले तर यासाठी त्यांनी काहीतरी कपट कारस्थान केलेलं असतं किंवा समान शत्रूची मदत घेतलेली असते. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता असंच काहीसं केलं जातं असल्याचा अंदाज आहे.

विविध दिशांनी हजारो वार नरेंद्र मोदींवर केले जात आहेत. याचा उद्देश त्यांची इतकी दमछाक होईल की ते स्वतःहूनच हार पत्करतील असा आहे. आजकाल कित्येक ठिकाणी त्यांच्यावर टीका ऐकायला मिळते आहे. कित्येक अभ्यासक त्यांच्याबद्दल जमेल तेवढे वाईट लिहीत आहेत. या देशात होणाऱ्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी त्यांना जबाबदार धरले जात आहे मग अगदी ती त्यांच्या जन्माच्या आधीपासून चुकीची चालत आली असली तरीही.

त्यांच्याबद्दल अत्यंत द्वेषपूर्ण भाषेत बोलले जाते. एखाद्या देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल असं बोललं जाण्याची ही पहिलीच वेळ असावी.

त्यांच्या काही विरोधकांनी त्यांना उलथवून टाकण्यासाठी पाकिस्तान आणि चायनासारख्या देशांशी हातमिळवणी केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या गोष्टी मुसलमानांची आणि ब्रिटिशांची सत्ता आली तेव्हा झाल्या होत्या. याला इतिहासाची पुनरावृत्ती म्हणायची का?

 

modi-gandhi-inmarathi
dnaindia.com

मी कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही. पण मला असं वाटतं की एखाद्या नेत्याचं उदात्तीकरण करताना खूप चुका नकळत केल्या जातात. एखादी घटना कोणाची सत्ता असताना घडली आहे हे पाहण्यापेक्षा एक राष्ट्र म्हणून आपण ठराविक घटनेकडे निरपेक्षपणे घटना म्हणून पाहावं. माझा मुळात उद्वेग हा आजकाल सर्वत्र पसरत असलेल्या “धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे” अशा उगीचच गळे काढणाऱ्या लोकांच्या ढोंगीपणाविरुद्ध आहे.

धर्मनिरपेक्षता ही पहिल्यापासूनच भारताचा आत्मा आहे. सध्याची so called धर्मनिरपेक्षता ही उपरी आणि इंपोर्टेड असल्यासारखी वाटते. आजवर ज्यांनी कधी धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गायले नाहीत तेच आज मात्र धर्माच्या नावाने गळे काढत आहेत, हे जरा विचित्र वाटतं.

आपण देश म्हणून निधर्मी आहोत आणि सर्वांना सारखे वागवतो, या भावनेने माझ्या मातृभूमीला आजवर अनेकदा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागण्यात आले.

नरेंद्र मोदींवर शरसंधान करण्याचे सर्व प्रयत्न विविध नेत्यांकडून चालू आहेत. हे प्रयत्न मुख्यत्वे २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चालले आहेत. त्यात विरोधक विजयी होतील का?

त्यांच्या विरोधक असण्याला माझा विरोध नाही माझा विरोध ते विरोधासाठी वापरात असलेल्या पद्धतीला आहे. ते ज्या ढोंगीपणाने मोदींवर सर्व बाजूने वर करून त्यांना संपविण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला माझा विरोध आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धूर्त कोल्ह्यांनी त्यांच्याविरुद्ध चालवलेल्या कावेबाजपणाला माझा विरोध आहे.

 

opposition-inmarathi
youtube.com

जर ते यात यशस्वी झाले नाहीत तर ते समूळ नष्ट होतील, त्यांचा नायनाट होईल पण जर ते त्यांच्या so called धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जिंकले तर त्यानंतरच्या परिणामांची मला कल्पना करवत नाही. मग ते प्रत्येक लढाई अशीच कपटाने जिंकतील. संपूर्ण देश फक्त त्या एका माणसाची सत्ता उलथवून टाकण्याच्या मागे लागलाय.

यासाठी ते कितीही किंमत मोजायला तयार आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारे पायउतार व्हायला लावायचं हाच विरोधकांचा मंत्र आहे.

यासाठी ते आपापल्या शत्रूंची सुद्धा गळाभेट घ्यायला मागेपुढे पाहणार नाहीत. यात मधल्यामधे फसणार आपण सामान्य भारतीय नागरिक आहोत. आपली मातृभूमी यात भरडली जाणार आहे. याने आपण देश म्हणून तरी एक राहू का ?

मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं जे मोदींना विरोध करताहेत ते बहुतेक सगळे मुरलेले राजकारणी आहेत. त्यांनी स्वतःनी अनेक राष्ट्रीय निवडणूका एकहाती जिंकून दिल्या आहेत आणि त्या देखील मोठ्या फरकाने.

मग त्यांच्यातील कोणीच मोदींविरुद्ध एकटे उभे रहायला का तयार नाहीत? त्यांना एवढं मोठं का केलं जातंय? त्या सगळ्यांना एका माणसाविरुद्ध उभं राहण्यासाठी एकमेकांशी जुळवून घेत एकत्र का यावं लागतंय?

त्यांना मोदींना एकट्याने हरवण्याचा विश्वास वाटत नाही म्हणून ते सर्वजण एकत्र येऊन तसा प्रयत्न करताहेत का? की त्यांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांची सत्तेबद्दलची लालसा, आणि त्यांच्या काळात त्यांनी केलेली अपरिमित लूट यामुळे त्यांना एकट्याने मोदींच्या विरोधात उभे राहणे आणि एका माणसाला हरवणे शक्य वाटत नसावे?

 

opposition-leaders-inmarathi
static.dnaindia.com

एक मानसशास्त्रज्ञ म्हणून मला असे वाटते की विविध दिशांनी हजारो वार नरेंद्र मोदींवर केले जात आहेत. याचा उद्देश त्यांची इतकी दमछाक होईल की ते स्वतःहूनच हार पत्करतील असा आहे. आश्चर्य याचे वाटते की एकही विरुद्ध पक्षाचा नेता असा नाही जो एकटा त्यांच्याविरुद्ध पूर्ण शक्तीनिशी लढू शकेल. त्यांना हरविण्यासाठी, नव्हे उध्वस्त करण्यासाठी त्यांना एकत्र येण्याची गरज का पडावी?

एक सर्वसामान्य भारतीय म्हणून मला या गोष्टीचे खूप दुःख आहे. मी कोणत्याच राजकीय पक्षांचा कधीच समर्थक नव्हतो. पण आज आपल्या निर्वाचित प्रधानमंत्र्यांची अशा प्रकारे अत्यंत ही पद्धतीने टवाळी केली जाते आहे आणि अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत त्यांच्यावर गरळ ओकली जात आहे हे पाहून खेद होतो.

खरंतर चार वर्षांपूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हा इतर लाखो लोकांप्रमाणेच मला सुद्धा धक्का बसला होता. माझ्या मित्रांनी असं भाकीत केलं होतं की एका वर्षात ते आपल्या देशाची वाट लावतील.

एक वर्षं गेलं. दोन वर्षं गेली. देशाची परिस्थिती डबघाईला आली नाही.मी त्यांना त्यांच्या भाकिताची आठवण करून दिली. ते म्हणाले, पुन्हा पुढची टर्म जर ते निवडून आले तर खूप नुकसान होईल. मला वाटतं लवकरच सगळ्या बुद्धीमंतांकडून असं प्रतिपादन केले जाईल.

मात्र ज्याच्याबद्दल असं बोललं जातंय ती व्यक्ती मात्र यातल्या कशालाच प्रतिक्रिया देत नाहीये. त्यांच्याबद्दल उच्चारल्या जाणाऱ्या अपशब्दांना देखील ते काहीच उत्तर देत नाहीत किंवा त्याबदल्यात कोणावर प्रत्यारोप करत नाहीत की शिवीगाळ करत नाहीत.

मी लहान असताना माझे एक शिक्षक होते. आम्हा विद्यार्थ्यांना ते खूप आवडायचे. पण त्यामुळे इतर शिक्षक त्यांच्यावर जळत असत. त्यांना शाळेत काही सुधारणा घडवून आणायच्या होत्या. त्या वेळी त्यांच्यावर खूप खोटेनाटे आरोप केले गेले. या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांना शाळा सोडावी लागली. आम्हाला त्यांच्याविरुद्ध असलेला इतर शिक्षकांचा हा मत्सर बघून खूप वाईट वाटलं. त्यांनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची किंमत चुकवली होती.

जेव्हा ते आमचा निरोप घ्यायला आले तेव्हा आम्ही विचारलं की तुम्ही शाळेत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असताना इतकी लोकं तुमच्या विरोधात का गेली? त्यांनी हसून आमच्याकडे बघितलं आणि म्हणाले, “I am in the majority of one.”

नंतर कितीतरी वेळा माझ्या आयुष्यात असे चढ उतार आले तेव्हा मला त्यांच्या शब्दांनी आधार दिला. मला हळूहळू कळत होतं सत्य किंवा बदल हा कायम एकट्या माणसापासून सुरू होतो. ती कायमच सुरुवात होताना एका माणसाची लढाई असते.

 

 

त्यावेळी आमच्या त्या शिक्षकांचा चेहरा खूपच शांत होता आणि इतर शिक्षकांच्या चेहऱ्यावर सूड घेतल्याचं समाधान होतं. एक माणूस त्याच्या रक्तासाठी हपापलेल्या माणसांकडे तोंड करून एकटा उभा होता.

हे मी वडिलांना सांगितलं असता ते मला म्हणाले होते,

“जेव्हा तू एकटा माणूस व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी झटतोय हे पाहशील तेव्हा हे लक्षात घे की त्याच्यावर चहूबाजुंनी टीका ही होणारच.”

त्यांनी मला तेव्हा सत्य सांगण्यासाठी एकट्या उभ्या राहिलेल्या सॉक्रेटिसची गोष्ट सांगितली. तेव्हा माझ्या मनाने एक गोष्ट मला शिकवली ती म्हणजे नैतिक ताकद, स्वतःच्या मूल्यांवरचा विश्वास हा तुमच्या हृदयात असतो. तिथे तुमच्या एकाचीच मेजॉरीटी असते.

आज इतक्या वर्षात मी जगभरातील खूप झगडे अनुभवलेत. कोण सत्याच्या बाजूने आहे याचा निर्णय घेण्याची वेळ माझ्यावर खूप वेळा आली. अशावेळी बरोबर कोण हा प्रश्न मला पडला तेव्हा या एका घटनेची आठवण मला उत्तराकडे नेत राहिली.

बरखा दत्त किंवा अन्य कोणी काँग्रेसी नेतेमंडळी यांनी शतकांपासून चालत आलेली हिंदूंची धर्मनिरपेक्षता समजून घेतली आहे का? ही जमीन कायमच इतर लोकांना आपल्यात सामावून घेत आलीये. कायमच बेघर लोकांचं पुनर्वसन करत आली आहे.

 

opposition-rally-inmarathi
manoramaonline.com

बरखा दत्त यांनी आपल्या एका लेखात म्हटलं आहे की मोदींविरुद्ध स्थानिक पातळीवर लढा द्या, जेणेकरून राष्ट्रीय पातळीवर त्यांना उलथून टाकण्यात मदत होईल. हा प्राचीन काळातील गनिमी काव्याचाच एक भाग झाला.

यावरून एक सिद्ध होते की मोदींचे प्रतिस्पर्धी त्यांना मुळापासून संपलेले पाहू इच्छितात. पण मला खरी भीती याची वाटते की खरंच उद्या ह्यांनी मोदींची सत्ता उलथवून टाकली आणि सत्तेत आले तर कशावरून ते आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून देशात दुफळी माजवणार नाहीत?

जर त्यांनी आपल्या देशातील लोकांमध्ये परस्परांत गनिमी काव्याचा वापर करायला सुरुवात केली तर? मग आपण काय करू? कोणाकडे दाद मागू?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?