' अटलजींचं ३ वाक्यांचं पत्र आलं आणि एका दिग्गजाची पंतप्रधान पदाची उमेदवारी कट झाली – InMarathi

अटलजींचं ३ वाक्यांचं पत्र आलं आणि एका दिग्गजाची पंतप्रधान पदाची उमेदवारी कट झाली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ही घटना आहे १९९७ सालची! दिल्लीतले राजकीय वातावरण सामान्य नव्हते. जे सत्तेत होते त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती.

ह्याच वेळी दिल्लीत काही लोक कट रचत होते. त्याच काळात सीताराम केसरी व अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्या तोंडी तेव्हा “संभावनाएं” (शक्यता) हा शब्द बऱ्याच वेळा येत असे.

त्यावेळी दिल्लीतील राजकीय वातावरणात अस्वस्थता पसरली होती. सरकार अस्थिर होते. पी. व्ही. नरसिंह राव ह्यांच्यानंतर सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

त्यांच्या पार्टीने संयुक्त आघाडीला समर्थन दिले असल्याने पंतप्रधानपदी एच. डी. देवेगौडा हे होते.

परंतु केसरींच्या मनात स्वत: पंतप्रधान होण्याची महत्वकांक्षा निर्माण झाली व त्यांनी पाठींबा काढून घेऊन देवेगौडांचे सरकार पाडले. परंतु हे करून सुद्धा त्यांना पंतप्रधान होता आले नाही.

कारण सीपीएम महासचिव हरिकिशन सिंह सुरजित ह्यांना सीताराम केसरी पंतप्रधान व्हायला नको असल्याने ते अडून बसले.

केसरींना त्यांच्यापुढे हार मानावी लागली आणि त्यांनी पंतप्रधानपदासाठी दुसऱ्या नावाची शिफारस केली. केसरींनी इंद्रकुमार गुजराल ह्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले.

परंतु ज्या क्षणी गुजराल ह्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हाच जवळजवळ सर्वांनाच अंदाज आला होता की आता लवकरच परत लोकसभा निवडणुका होणार!

 

PM-gujral-inmarathi

 

दुसऱ्या बाजूला भाजपाने लोकसभेच्या सुरुवातीला अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली १३ दिवसांचे सरकार चालवले होते व तेव्हाच्या राजकीत स्थितीचा पूर्ण अंदाज व आढावा घेतला होता.

भारताच्या ह्या राजकीय स्थित्यंतरामुळे राजनैतिक मंडळांचे तसेच संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर होते.

ह्या राजनयिक मंडळातील मुख्य लोकांच्या भाजपातील मुख्य नेत्यांशी भेटीगाठी होत असत. अशीच १८ सप्टेंबर १९९७ रोजी एक महत्वाची मिटिंग नवी दिल्ली येथे झाली. ही मिटिंग भाजपच्या अशोक रोड येथील कचेरीत झाली.

ह्या मिटिंगला भाजपचे संघटन महासचिव कोडिपकम नीलमेघाचार्य गोविंदाचार्य व दोन ब्रिटीश डिप्लोमेट्स हजर होते.

गोविंदाचार्य ह्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात शिक्षण पूर्ण केले व नंतर रा. स्व. संघात प्रचारक म्हणून अनेक वर्ष कार्य केले. त्यांच्यासाठी ही मिटिंग म्हणजे त्यांचे रोजचे काम होते. कारण १९८८ साली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या वतीने ते सर्व प्रकारच्या लोकांना भेटत असत.

===

हे ही वाचा – शरद पवार यांना डावलून सोनियाजींनी नरसिहरावांना PM पदावर बसवले, ते घटनाचक्र!

===

१९९७ साली भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने भाजपाला सत्ता मिळण्याची दाट शक्यता होती. केंद्रात भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी पक्षाचे सर्व नेते कंबर कसून कामाला लागले होते.

आणि अर्थातच ह्या काळात गोविन्दाचार्यांचे कामही अजून वाढले होते. त्या काळात गोविंदाचार्य हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी तसेच रा. स्व. संघ ह्या दोन्हीच्या विशेष मर्जीतले होते.

त्यांनी रामजन्मभूमी आंदोलन व पक्षाच्या सोशल इंजिनियरिंग मध्येही महत्वाची भूमिका बजावली होती.

सोशल इंजिनियरिंग म्हणजे, समाजाच्या वंचित घटकातून आलेल्या नेत्यांना पक्षात महत्वाच्या संधी दिल्या. परंतु महत्वाची बाब म्हणजे भाजपचे महत्वाचे नेते अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्याशी गोविंदाचार्य ह्यांचे फारसे सलोख्याचे संबंध नव्हते.

दोघांचेही एकमेकांशी फार जमत नव्हते. ह्याचे वानगीदाखल उदाहरण म्हणजे, १९९२ साली भाजपच्या एका अधिवेशनात वाजपेयी ह्यांनी एका भाषणात गोविंदाचार्य ह्यांचे थेट नाव घेऊन त्यांना असा प्रश्न विचारला होता की,

“जर एखाद्या नेत्याचा सन्मान करायचा असेल तर दुसऱ्याचा अपमान करणे गरजेचे आहे का?”

हे घडले तेव्हा अडवाणींचा काळ होता. परंतु नंतर चित्र बदलले. १९९५ साली मुंबई अधिवेशनात अडवाणी ह्यांनी भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून वाजपेयी ह्यांचे नाव घोषित केले.

 

atal-bihari-vajpayee-inmarathi

 

१९९७ साली गोविंदाचार्य ब्रिटीश डिप्लोमेट्सना भेटले त्यानंतर काही दिवसांनी ६ ऑक्टोबर १९९७ रोजी एका हिंदी वर्तमानपत्रात एक बातमी छापून आली. बातमीचा मजकूर असा होता की,

“एका प्रभावशाली महासचिवांनी काही विदेशी लोकांना सांगितले की, अटलजींवर फोकस करु नका. अडवाणींवर फोकस करा. अटलजी चेहरा नसून मुखवटा आहे.”

ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. पंजाब केसरीसह सर्व महत्वाच्या व मोठ्या वृत्तपत्रांनी ही बातमी त्यांच्या फ्रंट पेजवर छापली.

अटलजी ह्यांचे खास पत्रकार भानूप्रताप शुक्ल ह्यांनी त्यांच्या दैनिक जागरण ह्या वृत्तपत्रात छापल्या जाणाऱ्या स्तंभात ह्याबाबतीत विस्ताराने लेख लिहिला.

हे सगळे झाले तेव्हा अटलजी बल्गेरियाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी दिल्लीला परत आल्यावर लगेच तातडीने दोन पत्रे लिहिली.

===

हे ही वाचा – राष्ट्रपती भवनाचा थेट ‘अतिरेकी कॅम्प’ असा उल्लेख – जबाबदार होते हे वादग्रस्त राष्ट्रपती!

===

त्यातील पहिले पत्र त्यांनी त्यांचे जुने मित्र व त्यांचे सचिव म्हणून काम बघितलेले व तेव्हाचे पक्षाध्यक्ष लालकृष्ण अडवाणी ह्यांना लिहिले. हे पत्र हिंदीत होते व ह्यात फक्त तीन वाक्ये लिहिली होती.

“परदेश दौऱ्याहून परत आल्यावर श्री गोविंदाचार्य ह्यांची मुलाखत वाचली. तुम्हीही जरूर वाचली असेल. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

असे हे पत्र होते. ह्यात थेट संकेत होता की आता वधाची वेळ जवळ आली आहे.

 

images-inmarathi

 

दुसरे पत्र अटलजींनी गोविंदाचार्य ह्यांना लिहिले होते व त्यात जे घडले त्यासंबधात स्पष्टीकरण मागितले होते. दोन्ही पत्रे मिडियामध्ये लिक झाली.

त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी एका पुस्तकाच्या उद्घाटन समारंभाला गेले होते. त्या प्रसंगी भाजपा व संघाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

वाजपेयी भाषणासाठी मंचावर उभे राहिले आणि खिन्न स्वरात म्हणाले की,

“जेव्हा कोणी मला भाषणासाठी बोलावतात तेव्हा मला अतिशय आश्चर्य वाटते. एका मुखवट्याला लोक इतकी किंमत का देतात?”

हा भाजप व संघासाठी एक स्पष्ट संकेत होता की, आता गोविंदाचार्य ह्यांची गच्छन्ति होणार!

त्यानंतर वाजपेयी भाजप युवा मोर्च्याच्या एका अधिवेशनात बोलले की एखाद्या नेत्याला राजनैतिक पक्ष पंतप्रधान बनवत नाही. तर जनताच पंतप्रधान बनवते.

खरं तर हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात होता परंतु सगळ्यांनाच ह्यातील गर्भितार्थ समजला.

त्यावेळी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्तमानपत्रातून पोल छापले जात होते व त्यात जनतेचा कौल स्पष्टपणे वाजपेयी ह्यांनाच होता.

 

lead-kn-govindacharya-inmarathi

 

ह्यानंतर गोविंदाचार्य ह्यांनी स्पष्टीकरण देताना मुखवटा वाले विधान केल्याचे स्पष्टपणे नाकारले. ते म्हणाले अटलजी व अडवाणी हे माझ्यासाठी राम व लक्ष्मणाप्रमाणे आहेत व आपल्या रामाविषयी असे कोणी का बोलेल?

त्यानंतर आज तक ह्या वाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले की अटलजी माझ्यावर प्रेम करतात.

हे स्पष्टीकरण दिल्यानंतर सुद्धा अडवाणी ह्यांनी गोविंदाचार्य ह्यांची गच्छन्ति केली. त्यांना सांगितले की आता तुम्हाला पडद्यामागे जावे लागेल.

त्यानंतर अटलजी पंतप्रधान झाले व गोविंदाचार्य पडद्यामागे गेले ते नंतर कधीच पुढे येऊ शकले नाहीत..

===

हे ही वाचा – इंदिरा गांधींना कोर्टापासून निवडणुकीपर्यंत हरवत नेणारा “राजकारणातील विदूषक”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?