' “जय श्रीराम” विरुद्ध “जय भीम” : भारत विरोधी लोकांचं युद्ध पेटविण्याचं षडयंत्र? – InMarathi

“जय श्रीराम” विरुद्ध “जय भीम” : भारत विरोधी लोकांचं युद्ध पेटविण्याचं षडयंत्र?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

२०१९ काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. २०१९ ची निवडणुक हा खरोखर महारणसंग्राम होणार आहे हे जेंव्हा मी माझ्या काही मोदी समर्थक भक्तांना सांगतो तेंव्हा ते ही गोष्ट हसण्यावारी नेतात.

मुळात त्यांना ही कल्पनाच नसते की ज्या व्यक्तीला ते पप्पू म्हणुन हिणावताहेत ती व्यक्ती त्यांना वाटते तितकी कच्चा गुरुची खेळाडू नाहीय.

मोदी-शहा जोडगोळीचे डोळे दिपवून टाकणारे विजय हे अंध भाजप भक्तांच्या डोळ्यावर पट्टी बांधतात, अर्थात ही बेसावधगिरीची पट्टी भाजप समर्थकांना काही नवीन नाही. २००४ साली फक्त त्याला इंडिया शायनिंगच नाव होतं इतकंच.

आज बरखा दत्तच एक ट्वीट आलं त्याला मी फेसबुकवर पोस्ट केलं.

 

 

barkha dutt jai shri ram vs jai bhim tweet inmarathi

 

पण हाय रे माझ्या कर्मा, भक्तांच्या प्रतिक्रिया मात्र त्याच होत्या.

ज्यांना डोळ्यावर पट्टी बांधून राहण्यात आनंद आहे त्यांची पट्टी मी काढणार नाही उगाच का त्यांचं अज्ञानातील सुखाची झोपमोड करा पण ज्यांना खरंच डोळसपणे बघायचं आहे त्यांनी मात्र वेळीच सावध होणं गरजेचं आहे.

बरखा दत्तचं ट्वीट असं होतं तरी काय??

“मला दिल्ली विमानतळावर भेटलेल्या एका राजकीय नेत्यानुसार २०१९ च्या निवडणुका ह्या जय श्रीराम विरुद्ध जय भीम ह्या धर्तीवर लढल्या जाणार आहे”

हे ट्वीट वाटतं तितकं साधं नक्कीच नाहीय आणि त्याची पार्श्वभूमी ही ही आताच्या काळातील नसून गेल्या २-३ वर्षांत घडलेल्या घटनांची आहे.

जरा २-३ वर्ष मागे जाऊयात २०१५ मध्ये रोहित वेमुला हत्याकांडनंतर पद्धतशीरपणे एक अवार्ड वापसीचा तमाशा रंगला होता (काल परवा बातमी आली की तो तमाशा हा निव्वळ मोदींना बदनाम करण्याचा फार्स होता अर्थात त्याचा कबुलीजवाब काही दिवसांपूर्वी रोहित वेमुलाच्या आईनेच दिला होता) त्यात अचानकपणे हैदराबादमधील रजाकारांच्या पक्षाने उडी घेतली होती.

तसा रोहित वेमुलाच्या केसमध्ये मुस्लिमांचा काही संबंध नव्हता तरी देखील एक रंग त्याला देण्यात आला तो होता दलित-मुस्लिम ह्यांचा रंग.

उस्मानिया विद्यापीठातील एक नामवंत डीन, काही PHD करणारे विद्यार्थी माझ्या परिचयातील आहेत. ह्या विषयाच्या खोलात शिरल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या ज्याविषयी मी मुंबई, नागपुर आणि पुणे तरुण भारत आवृत्तीत चार लेखांची एक सविस्तर लेखमाला लिहली होती.

===

हे पण वाचा:

रोहित वेमुला ते उधम सिंघ : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तथाकथित पुरोगामी

रोहित वेमुलाची आत्महत्या – राजकारण, चौकशी अहवाल आणि – एक दुर्लक्षित सत्य!

===

ह्यातील बऱ्याचश्या लिंक आजही तंतोतंत जुळतात.

आज तीन वर्षानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे महाराष्ट्रात भीमा कोरेगाव सारख्या घटनांमध्ये शहरी नक्षलवादाची लिंक सापडली आहे ज्यात ह्या अभद्र युती मधला तिसरा कोन समोर आला आहे आणि तो आहे माओवाद.

 

Maoists_Naxal_Movement-inmarathi
indiandefencereview.com

पद्धतशीरपणे काही असामाजिक तत्व दलित चळवळीला हायजॅक करण्याचा प्रयत्न करताहेत. ज्या कम्युनिझमला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानसभेत थेटपणे देशद्रोही ठरविलं होतं आज दुर्दैवाने आपल्याच दलित नेत्यांच्या चुकांमुळे दलित चळवळ काही माओवादी आणि शहरी नक्षलवादी गिळंकृत करायला निघाले आहेत.

त्यांनी वापरलेला मार्ग देखील तितकाच भयानक आहे आणि तो आहे धार्मिकतेचा मार्ग.

दलित विरुद्ध हिंदू ही ठिणगी मुद्दामहुन पाडली जातेय आणि त्याला जातीयतेची तर किनार आहेच पण त्याला धार्मिकतेची आणि श्रद्धास्थानांची देखील किनार आहे.

===

हे पण वाचा:

अॅट्रोसिटी कायद्यावरील निर्णय : दलितांच्या आत्मसन्मानावर पुन्हा एकदा पद्धतशीर आक्रमण

अॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय रे भाऊ?

===

तुम्हाला जर वाटत असेल की हे सगळं भारतातील काही लोक मिळून करताहेत तर तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्या घटनांना चीन आणि रशियाची नुसती किनारच नाही तर छुपं समर्थन देखील आहे.

बरोबर एक वर्षापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे चीनच्या राजदूतांना भेटले.

बरं साधी भेट असती तर काही शंकेला वाव नव्हता, पण मोठा गोंधळ तेंव्हा उडाला जेंव्हा काँग्रेस प्रवक्त्याने राहुल गांधी आणि चीनचे राजदुत ह्या दोघांमध्ये कुठली भेट झाल्याचं स्पष्टपणे नाकारलं. त्यानंतर काही वेळातच राहुल गांधींनी ट्वीट करून सांगितलं की हो मी राजदूतांना भेटलो होतो! दोन्ही परस्पर विरोधी भूमिका.

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याना तत्कालीन उपाध्यक्ष राहुल गांधी कुणाला भेटतात ह्याची साधी माहितीही असु नये?

 

Rahul-China-inmarathi
jansatta.com

पक्षाला अंधारात ठेवून ही भेट का झाली ह्यावर कुठलंही स्पष्टीकरण राहुल देऊ शकले नव्हते. ही भेट जेंव्हा झाली तेंव्हा भारत आणि चीन ह्यांच्यात डोकलाम मुद्यावरून अत्यंत तणावाची स्थिती उत्पन्न झाली होती.

तेंव्हा हा प्रश्न नक्कीच ग्राह्य होता की सरकार आणि पक्षाच्या नकळत ह्या भेटीमागचं प्रयोजन काय होतं?

काही महिन्यांपूर्वी भारतातील एका मोठ्यापक्षाच्या नेत्या रशियाच्या खाजगी दौऱ्यावर गेल्या होत्या. अर्थात त्यांचे ह्या आधीचे दौरे देखील अत्यंत खाजगी स्वरूपाचे असायचे त्यामुळे त्याविषयी फारशी काही माहिती बाहेर येत नसत पण ह्या सुमारास ती थोड्याफार प्रमाणात का होईना बाहेर आली, त्यातली एक बातमी अशी होती की ह्या नेत्यांच्या दौऱ्यात KGB (रशियन गुप्तचर संस्था) ह्याचे काही वरिष्ठ अधिकारी जातीने लक्ष देत होते.

बऱ्याच वाचकांना KGB प्रकरण काय आहे ह्याची कल्पना नाही त्यांना दोन वाक्यात सांगतो. ७० च्या दशकात KGB ने भारतात जो धुमाकूळ घातला होता त्याला आजही आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संघटना चवीने चघळतात.

भारतीय माध्यमात प्रसिद्ध झालेले जवळ जवळ ३५०० लेख हे KGB ने प्लॉट केले होते काही नेते आणि अनेक डिप्लोमॅट KGB ने प्लॉट केलेल्या ‘हनी ट्रॅप’ मध्ये फुटलेले होते.

थेट PMO पर्यंत KGB ची पकड होती इतकी की ते भारताचा पुढचा पंतप्रधान कोण हे देखील ठरवु शकत होते असं म्हटलं जायचं.

तर वर उल्लेख केलेल्या ह्या मोठ्या नेत्यांच्या २०१८ मधील मॉस्को दौऱ्यात काय घडलं काय खलबतं शिजली त्याचे सविस्तर तपशील आता समोर येत आहेत.

 

kgb-inmarathi
dailyexpress.com

ह्या मोठ्या नेत्याच्या मॉस्को दौऱ्यानंतर आठवड्याभराच्या अंतरातच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा ह्यांचा हायप्रोफाईल रशिया दौरा झाला. वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्रांनी देखील त्याची दखल घेतली. बाजवांच्या ह्या दौऱ्यात मॉस्को आणि इस्लामाबादमध्ये जे शिजलं ते आता हळुहळु समोर येत आहे.

मॉस्कोने इस्लामाबादला सुखोई ३५ एमकेआय लढाऊ विमानं विकण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध प्रशिक्षणावर सुद्धा एकमत झालं आहे.

वास्तविक पाहता रशिया हा आपला जुना मित्र आहे, पण जागतिक राजकारणात कुणीच कुणाचा सदैव मित्र वा शत्रु नसतो सगळे आपापला फायदा बघत असतात, फ्रेंड्स इन बेनिफिट सारखं.

तिकडे काल परवा चीनचे राजदुत अमृतसर मध्ये सुवर्ण मंदिराला भेट देऊन आले आहेत. का? त्यांचं अमृतसरला जाण्याचं प्रयोजन काय? त्याआधी ह्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारत दौऱ्यावर आले होते तेंव्हा त्यांच्या खलिस्तान समर्थक जसपाल अटवाल ह्या नेत्यासोबत झालेल्या भेटीमुळे बराच वादंग निर्माण झाला होता.

ह्या आधीही कॅनडाने खलिस्तान समर्थकांना आश्रय दिल्याचा इतिहास आहे. ह्यात आता भर पडली आहे चीनचे राजदुत ह्यांची.

कुठल्याही कार्यालयीन भेटी ह्या कारणाशिवाय होत नसतात. चीनने कायम भारतातील नक्षलवादाला आर्थिक आणि युद्धसामुग्रीचा हातभार दिला आहे. उल्फा, NCER सारख्या पूर्वोत्तर भारतातील उग्र आतंकवादी संघटना असो की सीपीआयएम (माओवादी) ह्यासारख्या माओवादी संघटना ह्यांचे भारताबाहेरील शक्तींशी असलेले कनेक्शन वेळोवेळी उघड झाले आहेत.

 

naxalites-marathipizza01
youngisthan.in

Institute Of Defense Study abd Analysis मधील डॉ पी.व्ही.रमणा ह्यांचा एक पेपर प्रसिद्ध झाला होता ज्यात त्यांनी नक्षलवाद्यानी चालवलेली समांतर व्यवस्था ही जवळजवळ १२५ ते १४० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करते ह्याचा उल्लेख सप्रमाण दिला होता.

मागच्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालय ह्यांनी NIA, IB, RAW, ED आणि स्थानिक पोलीस ह्यांच्या मदतीने एक ऑपरेशन लॉन्च केलं आहे.

त्याचे निकाल दिसायला लागायच्या आधीच नवीन बातम्या खलिस्तान विषयावर यायला लागल्या आहेत ज्या नक्कीच चिंता वाढविणाऱ्या आहेत. तिकडे अफगाणिस्तान फ्रंटवर देखील अमेरिकेतील लिबरल लोकांमधील खास पठडीतल्या भारतविरोधी बाई रॉबिन राफल ह्यांच्या हाती तालिबानशी वाटाघाटीची सूत्रं हाती आली आहेत.

पाकिस्तान मध्ये देखील इम्रान खान सारखा तद्दन टिपिकल खडूस आणि भारतावर कायम डूख धरून बसणारा व्यक्ती पंतप्रधान पदावर आरूढ होणार आहे.

एकूणच सगळ्या फ्रंटवर परिस्थिती कठीण होत जाते आहे.

गेल्या काही महिन्यात घडलेल्या ह्या घटनांना २०१९ च्या परिपेक्षेने डोळ्यासमोर ठेवून बघा काही लिंक लागते का?

हैदराबादमधील रजाकारांच्या खानदानातील ओवैसी जेंव्हा सतत दलित-मुस्लिम ऐक्याचा राग आवळतो, महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये त्याचा पक्ष ह्याच फॉर्म्युलाच्या आधारावर दलित बहुल भागात बऱ्यापैकी मुसंडी मारतो तोच ओवैसी काल परवा हरियाणात झालेल्या एका घटनेवरून,

“आमचं शीर कापलं तरी आम्ही आमचा धर्म सोडणार नाही पण जी लोक आमच्या बांधवांच्या दाढीला हात लावण्याची हिम्मत करताहेत त्यांना आम्ही मुस्लिम धर्म स्वीकारायला भाग पाडु”

अशी जाहीर धमकी देतो तोच आज दलित-मुस्लिम ऐक्याचा आवाज होऊ बघतोय. कुठून? काय संबंध? संबंध हाच आहे की मोदींनी ज्या मुस्लिम व्होट बँकेला हिंदू एकतेने सुरुंग लावला त्याच व्होट बँकेला पुनरुज्जीवित करायला हिंदू मतात फूट पाडणं!

===

हे पण वाचा:

मुस्लिम भारतात का आले? इस्लाममध्ये खरंच “समता” आहे का? : वाचा डॉ आंबेडकरांची उत्तरं

“जय भीम” हा नारा इस्लाम विरोधी आहे : इस्लामची अधिकृत भूमिका

===

 

muslimleader_owaisi_inmarathi
indianexpress.com

राजकारण हा खेळ आहे राजेहो आणि ह्या खेळात तुम्हाला समोरच्याच्या ताकदीचा त्याच्या चालींचा अंदाज घेतच खेळावं लागतं, आणि जेंव्हा प्रतिस्पर्धी हा बलाढ्य असतो तेंव्हा ४-५ पेहलवान मिळून त्याला चीत करण्याचा प्रयत्न करतात. बरखाच कालचं ट्वीट हे ह्या दृष्टिकोनाने बघावं लागतं. सुटलेल्या तुटक रेषा जोडव्या लागतात तेंव्हा कुठे चित्र स्पष्ट होतं.

अर्थात त वरून प्रत्येकवेळी ताकभातच असतो असं नाही, कधीकधी तलवार देखील असु शकते.

इन मराठीचा वाचकवर्ग सुज्ञ आहे त्यामुळे काल बरखाला दिल्ली विमानतळावर भेटलेला ‘तो’ नेता कोण हे मी ओळखणं मी वाचकांच्या सद्सदविवेक बुद्धीवर सोडुन देतो.

फक्त एकच विनंती जी मी माझ्या लेखात नेहमी करतो सतत जागरूक राहा २०१९ केक वॉक नक्कीच नाहीय.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?