मुगलांचा “वारसा” जपणारी, बहादूर शाह जफर ची सहावी पिढी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ब्रिटीश येण्यागोदर आपल्या भारतावर मुगलांचे राज्य होते हे तर आपण सर्वच जाणतो. मुगलांनी भारतावर ४०० वर्ष राज्य केले. यादरम्यान त्यांनी हिंदू धर्माच्या कित्येक वस्तूंचे नुकसान केले तर  मुगलांच्या अस्तित्वाची ग्वाही देणाऱ्या अनेक वास्तू देखील बनवल्या. यात जगातील ७ आश्चर्यांपैकी एक ताजमहाल, लाल किल्ला, जामा मशीद, हुमायुचा मकबरा इत्यादी वास्तू येतात. पण आता आपल्या देशात लोकशाही आहे, मुगलांचे ब्रिटीशांचे राज्य संपून दीडशे वर्षांहून आधी काळ लोटला. आता मुगल शासक नाहीत, त्यामुळे कदाचित आपल्याला वाटत असेल की आता मुगलांची आठवण करवून देणाऱ्या केवळ या वास्तुच उरल्या आहेत. पण असं नाहीये.

अजूनही असे लोक आहेत – जे आपल्याला मुगलांच्या अस्तीवाची, त्यांच्या अलिशान राहणीमानाची करून देतात.

 

yakub-habeebuddin-tucy-inmarathi07

 

आजही आपल्या देशात मुगलांचे वारस आहेत आणि ते आजही त्याच थाटामाटात जीवन जगतात जे त्या काळी मुगल जगायचे. तसेच त्यांना समाजातही खूप आदर मिळतो.

 

yakub-habeebuddin-tucy-inmarathi9

 

बहादूर शाह जाफर हे भारतावर शासन करणारे शेवटचे मुगल सम्राट. १८६२ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या ४९ मुलांपैकी केवळ एकच मुलगा इंग्रजांच्या तावडीतून सुटून काठमांडू येथे पलायन करण्यास यशस्वी ठरला होता. त्यानंतर तो हैदराबाद येथे आला आणि तेथेच वसला.

 

yakub-habeebuddin-tucy-inmarathi02

 

सध्या आपण ज्या मुगलांच्या वारसाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव प्रिंस याकुब हबीबुद्दीन तूसी आहे. ते बहादूर शाह जफर यांची सहावी पिढीचे आहेत.


 

yakub-habeebuddin-tucy-inmarathi04

 

प्रिंस याकुब हबीबुद्दीन तूसी हे सध्या हैद्राबाद येथे राहत आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९६९ साली हैद्राबाद येथे झाला. त्यांनी आपलं पूर्ण शिक्षण याच शहरातून केलं.

 

yakub-habeebuddin-tucy-inmarathi06

 

प्रिंस याकुब यांनी १९९७ मध्ये प्रिंसेस हुमैरा फातिमा यांच्याशी निकाह केला. त्यांना तीन मुलं आणि २ मुली आहेत. यांच्या सर्वात मोठ्या मुलाचं वय १९ तर सर्वात लहान मुलीचं वय ८ वर्ष आहे.

 

yakub-habeebuddin-tucy-inmarathi05

 

हैद्राबादच्या सिविल कोर्टाने प्रिंस याकुब यांना कायदेशीररित्या मुगलांचे वारस म्हणून घोषित केले आहे. त्याच बरोबर उजबेकिस्तान सरकारने देखील प्रिंस याकुब यांना मुगलांचे वारस म्हणून घोषित केले आहे.

 

yakub-habeebuddin-tucy-inmarathi01

 

एका मुलाखतीत प्रिंस याकुब यांनी सांगितले होते की, ते काही विशेष प्रसंगांवेळीच शाही कपडे परिधान करतात. इतर वेळी ते पॅण्ट-शर्ट आणि जीन्स-टी शर्ट मध्ये घालतात.

 

yakub-habeebuddin-tucy-inmarathi03

 

प्रिंस याकुब हे खूप सोशल आहेत. ते नेहेमी मुगलांच्या कुठल्या ना कुठल्या वास्तूला भेट देत असतात. त्यासोबतच ते दरवर्षी ताजमहाल जातात.

प्रिंस याकुब यांनी मुगल शासक बहादूर जाफर यांना भारत रत्न देण्यात यावे याकरिता अनेक वेळा केंद्र शासनाकडे अर्ज देखील केला आहे. ते जेव्हाही प्रसारमाध्यमांना मुलाखत देतात तेव्हा ते मुगलांनी बनविलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या देखभालीचा प्रश्न नक्की उपस्थित करतात.

असे हे मुगलांचे वंशज प्रिंस याकुब हबीबुद्दीन तूसी मुगलांचा वारसा अजूनही जपत आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “मुगलांचा “वारसा” जपणारी, बहादूर शाह जफर ची सहावी पिढी

  • December 10, 2017 at 8:02 am
    Permalink

    Lancchanaspad gosht aahe hi Monghalanche waris Hindustan chya bhumit ajun hi aahet.

    Reply
  • April 17, 2018 at 12:40 pm
    Permalink

    khup changli mahiti ahe sir aaplya page war

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *