नदीत फेकलेले निर्माल्य गोळा करून ते दोघे कमवत आहेत वर्षाला तब्बल दोन कोटी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

व्यवसाय करणे कधी सहज शक्य होत नाही, त्यासाठी खूप मेहनत आणि त्याचबरोबर पैशांचे पाठबळ असणे गरजेचे असते. व्यवसाय करण्याच्या नवनवीन कल्पना नेहमीच अनेक लोकांच्या डोक्यामध्ये येतात, काही त्यामध्ये यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात.

तुम्ही एखादा व्यवसाय करायचे ठरवले, तर तुम्हाला त्याच्यासाठी लागणारा  खर्च आणि भविष्यात होणार फायदा व तोटा यांचा अंदाज लावणे गरजेचे आहे.

 

Airbnb Business Success.Inmarathi
businessnewsdaily.com

कधी – कधी लोक जास्त भांडवल लागणारा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत नाहीत. कारण जास्त भांडवल  लागणाऱ्या व्यवसायामध्ये फायदा जरी जास्त असला, तरी त्याचे नुकसान देखील तेवढेच भारी पडू शकते.

त्यामुळे लोक कमी भांडवल लागणारा व्यवसाय सुरु करतात. पण व्यवसायाची कल्पना चांगली नसली, तर ते चालणे खूपच अवघड असते.

पण जर तुमच्या व्यवसायाची संकल्पना चांगली असेल, तर तुम्ही कमी भांडवलामध्ये खूप नफा मिळवू शकता. याचेच एक उत्तम उदाहरण कानपूरमधील दोन युवकांनी दिले आहे.

त्याच्या या भन्नाट कल्पनेमुळे खूप कमी भांडवलामध्ये त्यांनी  एक व्यवसाय सुरु केला आणि ते आज कोटींमध्ये नफा मिळवत आहेत.

Help us green comapany.Inmarathi
twimg.com

नदीमध्ये फेकली जाणारी फुले पाहून दोन मित्रांना एक अशी कल्पना सुचली, ज्याच्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलले. कचऱ्यामध्ये फेकले जाणाऱ्या या फुलांच्या मदतीने त्यांनी एक कंपनी उभी केली. ज्या कंपनीची सध्याची उलाढाल वर्षाला  जवळपास दोन कोटींची आहे.

त्यांनी ‘हेल्प अस ग्रीन’ नावाची कंपनी सुरु केली आहे. ‘हेल्प अस ग्रीन’ कंपनीबद्दल कंपनीचा फाउंडर अंकित अग्रवालने सांगितले कि, कानपुरपासून २५ किमी दूर असलेल्या भौंती गावामध्ये त्यांचे ऑफिस आहे.

पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत शहरातील २९ मंदिरांमधून दररोज जवळपास ८०० किलो टाकून दिलेली फुले एकत्र केली जातात आणि त्यांना अगरबत्ती आणि जैविक वर्मी कंपोस्टमध्ये बदलले जाते.

यामुळे नदी-नाल्यांमध्ये घाण पसरत नाही. यातूनच या कंपनीचा व्यवसाय सुरु झाला.

 

Help us green comapany.Inmarathi1
openthemagazine.com

अंकितने याबद्दल सांगितले की,

“मी माझ्या मित्राबरोबर २०१४ मध्ये बिठूर (कानपुर ) मध्ये मकर संक्रातीच्या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर बनलेल्या मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी एकत्र निघालो होतो.

“गंगेच्या किनाऱ्यावर सडलेल्या फुलांना आणि त्याच्यामुळे अशुद्ध झालेल्या नदीचे पाणी पिताना लोंकाना पाहिलेले होते.

ही गोष्ट फक्त नदीमध्ये सडणाऱ्या फुलांचीच नाही, तर त्यावर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांची देखील आहे. जे पाण्यातील जीवनावर वाईट परिणाम करू करतात”

यापुढे सांगताना अंकित म्हणाला की,

“माझा मित्र गंगेकडे पाहताना मला म्हणाला, तुम्ही लोक यासाठी काही करत का नाहीत. तेव्हाच मनामध्ये एक कल्पना आली की,

काहीतरी असे करूया ज्याच्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होणे आणि लोकांना हे खराब पाणी पिण्यापासून वाचवणे ही  दोन्ही कामे होतील. यानंतर आपल्या गंगेच्या तटावर शपथ घेतली की, आम्ही गंगेमध्ये टाकाऊ फुले पडू देणार नाही. यामुळे पंतप्रधान मोदींचे स्वच्छता अभियान देखील यशस्वी करता येईल.”

 

Help us green comapany.Inmarathi2
dainikbhaskar.com

लोक वेडे म्हणत हसले होते.

अंकितने अकरावीमध्ये त्याच्याबरोबर शिकलेल्या करण रस्तोगी या २९ वर्षीय मित्राबरोबर याबद्दल चर्चा केली. त्यावेळी करण फॉरेनमधून शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आला होता. त्या दोघांनी गंगेमध्ये फेकल्या जाणाऱ्या फुलांबद्दल चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ठरवले की, नद्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रदूषणमुक्त करण्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागेल.

जेव्हा त्यांनी लोकांना सांगितले की, ते नद्यांना फुलांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी काही वेगळे करू इच्छित आहेत. तेव्हा लोकांनी त्यांना वेडे म्हणून त्यांची मस्करी केली. पण त्यांनी कोणाचीही पर्वा केली नाही.

 

Help us green comapany.Inmarathi3
telegraphindia.com

७२ हजारांमध्ये सुरु केली कंपनी

अंकितने सांगितले की,

“२०१४  पर्यंत मी पुण्यामधील एका सॉफ्टवेयर कंपनीमध्ये ऑटोमेशन साइंटिस्टच्या स्वरूपात काम करत होतो.  तर करण हा मास्टर्सच्या शिक्षणानंतर भारतामध्ये येऊन आपले स्वतःचे काम करत होता.”

अंकित आणि करण यांनी आपली जुनी कामे सोडून २०१५ मध्ये ७२ हजार रुपयाच्या भांडवलामध्ये ‘हेल्प अस ग्रीन’ कंपनी लॉंच केली. या दरम्यान त्यांना ओळखणारे लोक त्यांना वेडे म्हणत होते. दोन महिन्यानंतर ते आपले पहिले वर्मी कंपोस्ट उत्पादन घेऊन आले. ज्याला त्यांनी ‘माती’ असे नाव दिले. 

या कंपोस्टमध्ये १७ नैसर्गिक वस्तू आहेत. ज्यामध्ये कॉफीच्या स्थानिक दुकानांमध्ये फेकण्यात आलेल्या कॉफीचा गाळ देखील आहे. काही काळानंतर आयआयटी कानपुर देखील आर्थिक सहाय्यासह यांच्याबरोबर जोडली गेली.

काही काळानंतर त्यांची ही कंपनी कानपूरच्या सरसौल गावामध्ये पर्यावरणाला अनुकूल असणाऱ्या उदबत्त्या बनवायला लागली.

उदबत्तीच्या डब्ब्यांवर देवांचे फोटो असल्याने त्यांना कचरपेटीमध्ये फेकण्यास श्रद्धाळूंना अडचण येत असे. त्यामुळे हेल्प अस ग्रीनने उदरबत्ती या तुळशीच्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या पेपरमधून  विकण्यास सुरुवात केली.

आज आहे २ कोटींपेक्षा जास्त उलाढाल

 

Help us green comapany.Inmarathi4
dainikbhaskar.com

अंकित अग्रवालने सांगितले की,

“त्यांची कंपनी २०,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. त्यांच्या कंपनीमध्ये ७० पेक्षा जास्त स्त्रिया काम करतात आणि त्यांना दररोज कमीत कमी २०० रुपये मजूरी  मिळते.

या त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल सध्या जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त आहे. कानपूर, कन्नौज, उन्नाव यांच्या व्यतिरिक्त इतर काही ठिकाणी देखील त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे.

२९ मंदिरांमधून दररोज जवळपास ८०० किलो टाकाऊ फुले एकत्रित केली जातात आणि त्यानंतर त्यांना अगरबत्ती व जैविक वर्मी कंपोस्टमध्ये रुपांतरीत येते.

पहिल्यांदा त्यांच्या टीममध्ये दोन लोक होते. आज नऊ लोक आहेत. आज त्यांच्या ‘हेल्प अस ग्रीन’ या कंपनीला आयआयटीकडून चार कोटींपेक्षा जास्त रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

 

Help us green comapany.Inmarathi5
indiabeyondnews.com

अशाप्रकारे एका भन्नाट कल्पनेमुळे या २८ वर्षीय तरुणाने कमी भांडवलामध्ये जास्त नफा मिळवणाऱ्या व्यवसायाची निर्मिती केली आणि त्याचबरोबर पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी देखील हातभार लावला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?