एका पुस्तकाचा दावा: हिटलरने आत्महत्या केली नव्हती, तो तब्बल ९५ वर्षे जगला !

जगातील सर्वात क्रूर हुकुमशाह म्हणून आजही वर्षांनी हिटलरचेचं नाव घेतले जाते. त्यांच्या घोर क्रूर कृत्यांनी त्याला क्रूरकर्मा हिटलर अशी पदवी मिळवून दिली आणि जगाच्या काळ्या इतिहासात तो अजरामर झाला. त्याच्या महत्त्वकांक्षी पण गर्विष्ठ स्वभावामुळे त्याने लोकांवर अतोनात अत्याचार केले. हजारो लोकांच्या हत्येचा कलंक त्याच्या माथी लागला. त्याच्या याच पापांची शिक्षा त्याला मरतेवेळी मिळाली असे म्हटले तरी वावगे ठरू नये. जगातील एका कुप्रसिद्ध हुकुमशहावर स्वत:च्या हाताने गोळी झाडून आत्महत्या करण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय ! कोणासमोरही न झुकणाऱ्या हिटलरने त्या दिवशी स्वत:ला मृत्युच्या स्वाधीन केले.

death-of-hitler-marathipizza01

स्रोत

१९४५ साली दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जेव्हा हिटलरला आपली घोडचूक लक्षात आली आणि जर्मनीचा घोर पराभव त्याला दृष्टीक्षेपात दिसू लागला तेव्हा त्याने ३० एप्रिल १९४५ रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली ही बाब संपूर्ण जगाला माहिती आहे. किंबहुना इतिहासचं तसा आहे, तो नाकारता येणार नाही. परंतु Simoni Renee Guerreiro Dias या लेखिकेने Hitler in Brazil – His Life and His Death या आपल्या पुस्तकामध्ये काही असे दावे केले आहेत जे हिटलरचा मृत्यच नाकारतात. तिच्या मते हिटलरने संपूर्ण जगाला चांगलेचं चकवले आहे.

असा दावा पहिल्यांदाचं केला जात आहे असेही नाही, कारण यापूर्वी एका नाझी पत्रकाराने हिटलरचा मृत्य ब्राझीलमध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी झाला होता असा दावा करत खळबळ उडवून दिली होतती. सोबत पुरावा म्हणून त्याने हिटलर आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं एक छायाचित्र देखील सादर केलं होतं आणि आता त्याच गोष्टीला पुढे नेत  Simoni Renee या लेखिकेने त्याचे विधान सत्य होते असे जगजाहीर करून टाकले आहे.

=====

=====


hitler-death-marathipizza02

 

 

स्रोत

पुस्तकातील वर्णनानुसार,

दुसऱ्या महायुद्धानंतर हिटलरने स्वत:वर गोळी झाडली नव्हती. तर तो तेथून निसटून थेट ब्राझीलला गेला आणि वयाच्या ९५ व्या वर्षी पर्यंत आपल्या गर्लफ्रेंड सोबत सुखाचे आयुष्य जगला. ब्राझीलमध्ये पलायन केल्यावर त्याने अॅडॉल्फ लिपजेग नाव धारण केले. तो ज्या भागात राहायचा त्या भागात देखील याच नावाचा मनुष्य राहत असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तेथील स्थानिकांना त्याच्याबद्दल एवढीच माहिती होती की तो जर्मनीचा रहिवासी आहे.

Simoni Renee  या लेखिकेने जवळपास २ वर्षे संशोधन करून हिटलरबद्दल हा दावा केला आहे. तिच्या मते हिटलर सर्वांच्या नजरा चुकवीत एका गुप्त मार्गाने अर्जेंटिनामध्ये पोचला. तेथे त्याची ब्राझीलमध्ये राहणाऱ्या कटिंगा नामक महिलेशी ओळख झाली आणि पुढे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या पुस्तकामध्ये Simoni Renee हीने एक छायाचित्र देखील दिले आहे. परंतु ते खूपच धुरकट आहे. या छायाचित्रामधील महिला कटिंगा असून तिच्या सोबत उभा असणारा मनुष्य हिटलर आहे.

death-of-hitler-marathipizza03

स्रोत

Simoni Renee यांच्या मते हिटलरच्या खोलीमध्ये मिळालेले शव हे हिटलरचे नव्हते. तो कोणी दुसराच व्यक्ती होता. इथे हिटलरने दुसऱ्या एका व्यक्तीचा बळी देऊन स्वत:च्या आत्महत्येचा बनव रचला. Gerrard Williams या पत्रकार आणि इतिहासकाराच्या म्हणण्यानुसार त्याच्याजवळ FBI ची अशी काही कागदपत्रे आहेत जी सिद्ध करतात की अमेरिका हिटलरच्या मृत्यूनंतरही त्याच्या शोध घेत होती. म्हणजेच त्यांना देखील हिटलरच्या मृत्यूविषयी शंका होती.

अजून एक मुख्य आणि दुर्लक्ष न करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे हिटलरच्या जिवंत असलेल्या कुटुंबियांच्या मदतीने एक डीएनए टेस्ट करण्यात आली होती. त्या डीएनए टेस्टमध्ये हिटलरच्या कुटुंबियांचे डीएनए आणि ब्राझीलमध्ये राहत असलेल्या अॅडॉल्फ लिपजेग या व्यक्तीचे डीएनए मॅच झाले आणि हा या दाव्याला बळकटी देणारा सर्वात मोठा पुरावा ठरलायं की ब्राझीलमधील अॅडॉल्फ लिपजेग हाच अॅडॉल्फ हिटलर होता.

death-of-hitler-marathipizza04

स्रोत

Simoni Renee यांच्या या दाव्यावर जगभर उलटसुलट चर्चा सुरु आहे. अनेकजण हा दावा पोकळ असल्याचे सांगतात तर अनेक जणांनी तिने दाखवलेल्या पुराव्यामुळे या दाव्यावर विश्वास देखील ठेवला आहे. Simoni Renee हिच्या या खळबळजनक दाव्याला खोडून काढणारा एकच पुरावा होता तो म्हणजे Rochus Misch हा हिटलरचा बॉडीगार्ड ! याच बॉडीगार्डने सांगितले होते की “हिटलरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली आणि तो टेबलावर पडला.” या बॉडीगार्डचा देखील गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वयाच्या ९६ व्या वर्षी मृत्यू झाला.

=====

=====

हिटलरच्या मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत चालले आहे. ते लवकरच उकलले जाईल अशी आशा करूया !

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: