दारू-सिगारेटची व्यसनं सर्वश्रुत आहेत – पण “ह्या” ७ व्यसनांच्या बाबतीत अनेक जण गाफील असतात.

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

दारू किंवा सिगारेटचे जसे लोकांना व्यसन लागते, तसेच इतर वेगवेगळ्या गोष्टींचे व्यसन देखील लोकांना लागते. एखादी वस्तू किंवा गोष्टीचा प्रमाणाबाहेर वापर करणे आणि त्या गोष्टीशिवाय न राहू शकणे, हा देखील एक व्यसनाचाच  भाग आहे. आज आपण तरुण मुलांना मोबाईलचे वेड लागलेले सगळीकडे पाहतो. मोबाईलचा खूप जास्त प्रमाणात वापर करणे, हा देखील एक अॅडिक्शनचा प्रकार आहे. हे अॅडिक्शन काही काळाने तुमच्या मनावर परिणाम करू शकते आणि तुम्ही त्यामधून कधीही बाहेर पडू शकणार नाहीत. फक्त तंबाखू, दारू, सिगारेट यांसारखे व्यसनच तुमचे आयुष्य खराब करू शकत नाहीत, तर अजूनही अनेक गोष्टी आहेत, जे तुमचे जीवन अंधारात ढकलू शकतात. चला तर मग जाणून घेऊया, या अॅडिक्शन लावणाऱ्या गोष्टींबद्दल.

१. लेट लतीफ

=====

=====


 

Addictive

 

आजच्या युगात आपण अशी कितीतरी माणसे पाहतो, जी आजच काम उद्यावर ढकलतात. ते आज व्यस्त आहेत, म्हणून काम उद्यावर ढकलतात, असे काही नसते. ते काही काम करत नसले, तरीदेखील फक्त कंटाळा येतो, म्हणून ते काम तो उद्यावर टाकतो. जेव्हा त्यांना हे समजते की, ते खूप आळशी झाले आहेत आणि आळसपणामुळे ते हे सर्व करत आहेत. त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. असे जर तुम्ही देखील करत असाल, तर आताच सावधान व्हा. तुमचे नुकसान होण्याआधी ही सवय बदला.

२. फालतूचा खर्च

 

Addictive

 

जर तुम्ही जास्त कमवत असाल आणि खूप खर्च करत असाल, तर तुम्हाला कोणतीच समस्या नाही आहे. पण जर तुमची कमाई कमी असून देखील तुम्ही फालतूचा खर्च करत असाल, तर तुम्हाला कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागले. जर तुम्ही सेलमध्ये भेटतय म्हणून गरज नसेल तरी खरेदी करत असला, तर तुम्हाला याबद्दल नक्कीच विचार करायला लागेल, कारण तुमची ही सवय तुम्हाला कर्जबाजारी बनवू शकते.

 

३. बॅकग्राउंड म्युझिक

 

Addictive

 

काही लोकांना कोणतेही काम करताना बॅकग्राउंडला म्युझिक ऐकण्याची सवय असते. त्यामुळे ते मोबाईलवर, लॅपटॉपवर म्युझिक लावून काम करतात. बॅकग्राउंड म्युझिकशिवाय ते कोणत्याही गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करू शकत नाहीत आणि मोठे झाल्यावर ही त्यांची सवय बनते. जर ते लॅपटॉपवर काम करत असतील, तर त्यांच्या कानाला म्युझिक ऐकायची सवय आहे, म्हणून टीव्ही लावून ठेवतात, भलेही तो टीव्ही ते पाहत नसतील. या प्रकारची सवय चांगली नाही, यामुळे तुमच्या प्रोफेशनल जीवनामध्ये समस्या येऊ शकतात.

४. खूप गोड खाणे

 

Addictive

 

कितीतरी संशोधनांमध्ये हे समजले आहे की, साखरेचे जास्त सेवन आपल्या मेंदूला तेवढेच नुकसान करते, जेवढे कोकीन आणि हिरोइन यांसारखे ड्रग्स करतात. हे माहित असून देखील काही लोक आपल्या गोड खाण्याच्या सवयीला कमी करत नाहीत आणि लपूनछपून खूप गोड खातात. यामुळे पुढे शरीराच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल.

 

५. सगळीकडे गाडीने जाणे

 

Addictive

 

काही लोकांना गाडीचे एवढे व्यसन असते की, पायी चालत जाण्याचा ते लोक विचार देखील करू शकत नाहीत. जवळपास जायचे असेल, तरीदेखील गाडी काढतात. जर कुठे गाडीने जाऊ शकले नाही, तर ऑटो किंवा टॅक्सीने जातात. असे लोक काही पाऊले देखील पायी जात नाहीत आणि हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. निरोगी जीवन जगण्यासाठी चालणे खूप गरजेचे आहे. पण आपण हे गाडीमुळे विसरून जातो.

६. पॉर्न पाहणे

 

Addictive

 

आजकाल इंटरनेटवर पॉर्न सामग्री सहज मिळते. बऱ्याच तरुणांना हे पॉर्न पाहण्याचे व्यसन जडले आहे. सुरुवातीला आपली जिज्ञासा शांत करण्यासाठी पॉर्न साईट्स पाहतात. पण त्यांना हे लक्षात येत नाही की, कधी त्यांना त्याची सवय जडते. लवकरच ते पॉर्न अॅडिक्टेड होतात आणि हे त्यांच्यासाठी नुकसानदायक असते.

 

७. स्मार्टफोन आणि इंटरनेटचे व्यसन

 

Addictive

 

स्मार्टफोन आल्यानंतर आपले जीवन पूर्णपणे बदलले आहे. आजकाल परिस्थिती एवढी खराब झाली आहे की, लोक १ तास देखील आपल्या स्मार्टफोनशिवाय राहू शकत नाही. काही लोक म्हणतात कि, याची त्यांना गरज आहे आणि त्याशिवाय त्यांचे काम होणार नाही. पण काही लोकांना फक्त याचे व्यासन असते. सोशल मिडिया चेक करणे, फोटोला किती लाइकस आले हे पाहणे, कुणी काय अपलोड केले आहे, हे पाहणे. हे सर्व करण्यासाठी ते दिवसभर फोनमध्ये मग्न असतात. त्यामुळे मनावर वाईट परिणाम होतो आणि आपण एकटे होतो.

=====

=====

अशा प्रकारच्या सवयी जर तुम्हाला असतील, तर लवकरात लवकर सोडणे गरजेचे आहे, कारण या सवयींमुळे तुम्हाला कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागेल.

जर तुमच्या मित्रमंडळीतही कुणाला वरील व्यसनांपैकी कुठले व्यसन असेल तर त्यांच्या सोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका… 

 स्त्रोत

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?