5 इंग्लिश टीव्ही सिरीयल्स, ज्या तुम्ही बघितल्याच पाहिजेत !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

टीव्ही सिरीयल म्हणजे सासू-सून किंवा नायकाची अनेक लग्न/अनैतिक संबंध आणि त्यात होरपळणारी अबला स्त्री – हेच चित्र आपल्याला माहीत आहे. पूर्वी दूरदर्शनवर ‘भारत एक खोज’ किंवा ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अश्या उत्कृष्ट मालिका बनायच्या. But, thanks to Ekta Kapoor, आज हिंदी आणि मराठी टीव्ही सिरीयल्समध्ये फार तोच-तोचपणा आला आहे.

Well, “मराठी pizza” टीम तुमच्यासाठी टॉप क्वालिटी डेली सोप्स तर बनवू शकत नाही (किमान सध्या तरी…!). पण आम्ही तुमच्यासाठी टॉप क्वालिटी इंग्रजी टीव्ही सिरीयल्सची छोटीशी लिस्ट जरूर तयार करू शकतो.

Here’s a list – 5 इंग्लिश टीव्ही सिरीयल्स, ज्या तुम्ही बघितल्याच पाहिजे !

1) Friends

Friends नाही बघितली तर काहीच नाही बघितलं!
(थोडी अतिशयोक्ती आहे, पण तुम्हाला फक्त 3-4 एपिसोड्स नंतरच आमचं म्हणणं पटू शकतं!)


Image source: tv.com

6 friends…3 मित्र आणि 3 मैत्रिणी…आणि त्यांची जगण्याच्या धडपडीत चाललेली गम्मत. (No – ही सिरीयल दिल दोस्ती दुनियादारी सारखी नाही. Trust us!)

सोपी भाषा, smart one-liners, उत्कृष्ट timing आणि पाश्चिमात्य जीवनाचं खरं खुरं चित्रण. इंग्लिश स्पिकींग सुधारत मनोरंजन करून घेण्याचा उत्कृष्ट फॉर्म्युला म्हणजे friends.

2) Quantico

प्रियांका चोप्रा माहितीये ना? हो आपलीच. ती ह्या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. Awesome, no?!!!

FBI agent असलेल्या पिग्गी चॉप्सवर एका 9/11सारख्याच एका भीषण हल्ल्याच्या आरोपात अडकवलं जातं, ती पळ काढते अणि आपल्याला अडकवणाऱ्याचा शोध सुरु करते.

Image source: televisionpromos.com

तुफान गती असलेली मालिका आहे…बघायलाच हवी !

3) The Big Bang Theory

तुम्हाला गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय कसे वाटतात? आणि ह्या विषयात बुडून गेलेले आपले शाळकरी मित्र? Geeks…? Too बोअरिंग, right?

Well, अश्याच 4 अति अभ्यासू तरुणांच्या जीवनात 1 hot n sexy तरुणी येते. आणि इथून सुरु होते “हसून हसून पोट दुखवणारी” Big Bang Theory ही सिरीयल!

Image source: georgespigot.wordpress.com

कल्पकता असेल तर जड विषयांभोवती उत्कृष्ट मनोरंजन कसं तयार करतं ह्याचा उत्तम नमूना म्हणजे ही मालिका.

खबरदार – तुम्हाला व्हिडिओ pause करून क्लिष्ट जोक्स, समजून घेण्याचं व्यसन ‘नसेल’, तर ही मालिका तुम्हाला आवडणार नाही!

4) House Of Cards

पोलिटीक्स काय चीज आहे हे खरंच जाणून घ्यायचं असेल तर ही मालिका बघा. ही सिरीयल म्हणजे एका “इच्छुक” अमेरिकन राजकारण्याला हवं ते पद नं मिळाल्याने सुरु झालेला सत्तेचा खेळ आहे.

Image source: christianpost.com

White house भोवती अमेरिका फिरते…आणि आपल्या हिरो भोवती white house! पहिल्या सीझनच्या शेवटी शेवटी मालिकेचा हिरो – हिरो आहे की व्हिलन असं वाटल्याशिवाय रहात नाही.

5) Game Of Thrones

एका वाक्यात – गेम ऑफ थ्रोन्स नाही बघितली, तर काहीच नाही बघितलं – आणि ही अतिशयोक्ती अजिबात नाही.

George R.R. Martin ह्या लेखकाने लिहिलेल्या A Song of Ice and Fire ह्या पुस्तकांवर आधारित ही सिरीज आहे. एका काल्पनिक पृथ्वीवर ७ छोटी छोटी राज्य मिळून एक मोठी realm म्हणजेच साम्राज्य उभं आहे. गेम ऑफ थ्रोन्स ही त्या साम्राज्याच्या सिंहासनासाठी चालणाऱ्या राजकारण आणि युद्धांची कथा आहे.

आपल्या मोठ्या चित्रपटांचा canvas जेवढा मोठा असतो, त्याहून मोठा ह्या सिरीजच्या एका-एका एपीसोडचा आहे. ह्यात कुणी १००% चांगलं, कुणी १००% वाईट नाही. प्रत्येक major क्रूरकर्म्याचं character उत्तमरित्या चितारलं आहे.

 

Image source: watchersonthewall.com

ही सिरीज तुमच्या जीवनावर, तुमच्याही नकळत प्रभाव टाकेल. तुम्ही कुठल्यातरी character पासून inspire व्हाल, ह्या सिरीजमधली वाक्यं, quotes वापरायला लागाल – तुमच्याही नकळत !

Caution:

१ – जर इंग्लिश चित्रपट, सिरीज फारशा बघत नसाल तर बघण्याची सुरुवात गेम ऑफ थ्रोन्सवरून करू नका. Friendsनी सुरुवात करा. ती इंग्रजी आणि कथानक सोपं, सहज आहे.

२ – ह्या सिरीज subtitles सोबतच बघा. अनेक dialogues आपल्याला subtitles शिवाय कळत नाहीत आणि त्यामुळे कथानकाची सगळी गंमत निघून जाते.

So, ह्या टीव्ही सिरीज एन्जॉय करा आणि आम्हाला तुमचे अनुभव कळवा !

आणि हो – तुमच्या आवडत्या टीव्ही सिरीज असतील ज्या “नाही बघितल्या, तर काहीच नाही बघितलं!” ह्या सदरात येऊ शकत असतील – तर आम्हाला नक्की कळवा ! आम्हीसुद्धा त्या बघू आणि वाचकांसोबत तुमची लिस्ट शेअर करू.

Cheers!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 233 posts and counting.See all posts by omkar

11 thoughts on “5 इंग्लिश टीव्ही सिरीयल्स, ज्या तुम्ही बघितल्याच पाहिजेत !

  • November 27, 2015 at 9:54 am
    Permalink

    Should give more details like which chamnel and what timing the serial is telecast.
    Will b more helpful .

    Reply
    • November 27, 2015 at 12:16 pm
      Permalink

      Appreciate the feedback Amey! पुढच्या articlesच्या वेळी आम्ही नक्की लक्षात ठेऊ.

      Reply
  • November 27, 2015 at 10:35 am
    Permalink

    Faqt ek suggestion aahe tv series,mdhe Suits hya seriesla pan ad karnyay yaav…,karan awsme presentation.best dialouges…n bhari acting…pahile 2-3episodes mdhech hi series pudhe pahavylach as watat..

    Reply
    • November 27, 2015 at 12:18 pm
      Permalink

      Yea…the thing is, एक शॉर्ट लिस्ट करायची होती. म्हणून अजून बऱ्याच छान छान सिरीज नाही टाकल्या. आणखी एक लिस्ट बनवू… त्यात मोठी लिस्ट तयार करू! Thanks for the feedback!

      Reply
  • January 7, 2016 at 11:10 am
    Permalink

    Please make one list of Korean & Japanese TV serials too.

    Reply
    • January 7, 2016 at 12:29 pm
      Permalink

      Thanks Tanmay. Would you like to make the list and publish on MarathiPizza? We would be glad to present your views to our readers.

      Reply
  • January 23, 2016 at 12:08 pm
    Permalink

    खूप छान. फक्त ह्या लिस्ट मध्ये “How I Met Your Mother”, add केल कि, लिस्ट इस Complete !

    Reply
  • September 16, 2016 at 7:48 pm
    Permalink

    why quantico is here?add sherlock or breaking bad instead of this.

    Reply
  • March 18, 2017 at 1:55 pm
    Permalink

    Where should i get this serials online????

    Reply
  • October 24, 2017 at 1:55 pm
    Permalink

    थरार मालिकाची पण एक लिस्ट बनवा प्लीज…breaking bad, lost, shrelock holms, fringe, dr. who

    Reply
  • March 10, 2018 at 6:51 pm
    Permalink

    खूपच सुंदर उपाय सुचवले आहेत

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *