ही ५ पुस्तकं तुम्हाला आयुष्यात नव्याने काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देतील!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : निखील सुभेदार

===

=====

=====


कोणीतरी म्हणून गेलंय की, माणसापेक्षा पुस्तकांना आपला मित्र बनवा, ते तुम्हाला कधीही फसवणार नाहीत, तुम्हाला कधीही निराश करणार नाही. उलट नेहमी जीवनात तुमची साथ देतील, तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकवतील आणि समाजाचा खरा आरसा दाखवतील. आज मी तुमच्यासमोर अशी ५ प्रेरणादायी पुस्तके मांडतोय जी निराशेत गुरफटलेल्यांना आशेची नवी किरण दाखवतील, यशाचा खडतर मार्ग चोखाळू पाहणाऱ्यांना संयमाचे आणि मेहनतीचे धडे देतील, तरुणांना नवा आत्मविश्वास देतील आणि प्रौढांना उत्तम साहित्य वाचल्याचे मानसिक समाधान देतील. याचं कारणांमुळे प्रत्येकाने ही ५ पुस्तके आपपल्या संग्रही ठेवायलाच हवीत!

१) अग्निपंख :

 

books-marathipizza01
majesticonthenet.com

वर्तमानपत्रे वाटून शिक्षण पूर्ण करणारे आणि संपूर्ण भारतीय जनतेचे लाडके असणारे माजी राष्ट्रपती श्री कलाम सर यांचे अग्निपंख पुस्तक वाचून मन खरंच उत्साहित होते. हे पुस्तक वाचल्यानंतर दुर्दम्य आशावाद काय असतो याची प्रचिती येते. संपूर्ण आयुष्य या भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण करणारे श्री कलाम सर यांचे हे पुस्तक खरोखरच खूप प्रेरणादायी आहे.

 

२) मुसाफिर : 

 

i.ytimg.com

हे दुसरे पुस्तक आहे एका इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बॉम्बे (IIT-B) या मानांकित संस्थेतून पदवी मिळवणाऱ्या एका अवलियाचे. हा अवलिया आहे प्रसिद्ध लेखक श्री अच्युत गोडबोले. अच्युत गोडबोले यांच्या बद्दल जितके बोलावे तेवढे कमीच आहे. एक Chemical Engineer ते एक यशस्वी लेखक हा त्यांचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. या पुस्तकात अच्युत गोडबोले यांनी त्यांचा जीवन प्रवास मांडला आहे. या त्यांच्या जीवन प्रवासात येणारी आव्हाने कशी पेलली किंवा वैयक्तिक जीवनात येणारी आव्हाने खूप सुंदर अशा शब्दात मांडलेली आहेत.

आज एखाद्या computer engineer ला operating system बद्दल चार वाक्ये बोलायला किंवा लिहायला लावलीत तर त्याची त्रेधा तिरपीट उडेल परंतु या माणसाने operating सिस्टिम काय, कॉम्पुटर networks काय, संगीत,अर्थशास्त्र, व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधली माहिती देणारी पुस्तके लिहिली आहेत.

 

३) इडली, ऑर्किड आणि मी :

 

books-marathipizza03
majesticonthenet.com

या पुस्तकाचे लेखक आहेत श्री विठ्ठल कामत. आज विठ्ठल कामत यांचे नाव माहित नसणारा खाद्यप्रेमी सापडणार नाही. या पुस्तकात श्री कामत यांनी आपल्या जगातील पहिल्या अशा इको फ्रेंडली हॉटेलची सुरुवात करताना ज्या अनंत अडचणींना तोंड दिले ते या पुस्तकात मांडले आहे.

असे म्हणतात कि, माणसाला सर्व सोंगे करता येतात परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. या माणसाच्या आयुष्यात सुद्धा अशी आर्थिक अडचण आली, परंतु या माणसाने त्याच्या संकटांवर मात करून एक आलिशान हॉटेल उभे केले. हा त्याचा प्रवास खरंच खूप प्रोत्साहित करणारा आहे. हे पुस्तक खरोखरच संग्रही असावे.

 

४) एक होता कार्व्हर :

 

books-marathipizza04
majesticonthenet.com

हे पुस्तक वीणा गवाणकर यांनी मराठीत भाषांतरित केले आहे. ज्या व्यक्तीने हे पुस्तक वाचले नाहीये त्या व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार नाहीये. एक निग्रो मुलगा ज्याला त्याचे आई-वडील माहित नाहीये. त्याला असेच कोणीतरी सांभाळले, हाती येईल ती कामे म्हणजे कपड्यांना इस्त्री ते रंगकाम अशी सगळी कामे करून अमेरिकेचा एक थोर शास्त्रज्ञ तयार झाला, अशी खूप प्रेरणादायी कथा आहे. हा थोर शास्त्रज्ञ म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर.

 

=====

=====

५) स्टिव्ह जॉब्स याचे आत्मचरित्र :

 

books-marathipizza05
amazon.com

आज iPhone किंवा iPad किंवा iPod माहित नसेल अशी व्यक्ती या जगात सापडणार नाही. कुठलेही तांत्रिक शिक्षण न घेता किंवा कुठलीही पदवी नसताना स्टिव्ह जॉब्स ह्याने जे साम्राज्य निर्माण केले आहे, याला खरोखरच तोड नाहीये. शून्यापासून सुरुवात ते अॅपल कंपनीचा मालक, तिथून हकालपट्टी आणि मग परत शून्यावर आणि मग परत अॅपलमध्ये पुनरागमन! खरंतर ह्या घटना चित्रपटात शोभतील अशा आहेत, परंतु या खरोखर स्टिव्ह जॉब्सच्या आयुष्यात घडल्या आहेत.

आपल्याला जर काही मोठं, वेगळं, खास असं साध्य करायचं असेल तर ही पाच पुस्तके खरोखरच वाचावीत. काहीतरी नावीन्यपूर्ण घडवण्यासाठी जी जिद्द लागते ती निर्माण करण्यासाठी ही पाच पुस्तके नक्की मदत करतील.

तुम्हाला आवडणारी अशी इतर कुठली पुस्तकं आहेत का? जी मनाला भावली, जीवनाला नवी दिशा-उमेद देणारी? असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “ही ५ पुस्तकं तुम्हाला आयुष्यात नव्याने काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देतील!

 • September 13, 2017 at 11:29 pm
  Permalink

  Nice.pan tumhi he visarlat 1.c.shivaji maharaja che aatmcharitra.2.vivek aanand yache aatmcharitra.

  Reply
 • November 4, 2017 at 8:18 pm
  Permalink

  Biography of Warren Buffett (Marathi translation)

  Dr. Raghunath Mashelkar

  Corporate Gandhi: Narayan Murthy

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?