आपल्याला आवडणारी ही दहा प्रसिद्ध गाणी चक्क चोरलेली आहेत!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बॉलीवूड ही जगातील नावाजलेल्या फिल्म इंडस्ट्रीपैकी एक इंडस्ट्री आहे. बॉलीवूडला भारतातील आणि जगातील प्रेक्षकववर्गांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिलेला आहे. बॉलीवूडमधीलं स्टार्स जसे आपल्याला पसंत असतात, त्याचप्रमाणे बॉलीवूडमधील गाणी देखील आपल्याला खूप आवडत असतात. अगदी ८० च्या दशकापासून ते आतापर्यंत या गाण्यांना नेहमीच प्रेक्षकांनी चांगल्याप्रकारे प्रतिसाद दिला आहे. तुम्हाला देखील बॉलीवूडची बहुतेक गाणी आवडत असतील. काहींना तर या बॉलीवूड गाण्यांचे इतके वेड असते की, त्यांना त्यांची आवडती गाणी ऐकल्याशिवाय त्यांचा दिवसच पूर्ण होत नाही. अर्थातच, गाण्यांची हौस सगळ्यांनाच असते, फक्त प्रत्येकाच्या गाण्याच्या आवडी वेगवेगळ्या असतात.

पण तुम्हाला जर समजले की, तुमचे आवडते गाणे हे दुसरीकडून चोरलेले आहेत, तर तुम्हाला कसे वाटेल ? नक्कीच वाईट वाटेल यात शंका नाही. मग आज आपण अश्याच चोरलेल्या गाण्यांविषयी जाणून घेणार आहोत. चला मग बघा यामध्ये तुमचे आवडते गाणे देखील आहे का ते…

१. मुझे निंद न आये…

 

copy song.marathipizza
ytimg.com

१९९० मधील आमीर खान आणि माधुरी दिक्षित यांच्या दिल या चित्रपटामधील हे गाणे लोकांना खूप आवडले होते. पण तुम्हाला माहित आहे, हे गाणे युकेमधील चनी सिंग यांच्या बँडमधील चुन्नी उड उड जाये या गाण्यामधून घेतलेले आहे.

 

 

२. हरे राम हरे राम…

 

copy song.marathipizza1
ytimg.com

२००७ मध्ये आलेला अक्षय कुमारचा भूलभुलैया हा चित्रपट खूपच मनोरंजक होता. हॉरर कॉमेडीने रचलेल्या या चित्रपटामधील हरे राम हरे राम हे गाणे दक्षिण कोरिया डान्स म्युझिक ग्रुप जीटीएल यांच्या माय लेकॉन या गाण्यामधून घेतले आहे.

 

३. ऐ दिल लाया है बाहार…

 

copy song.marathipizza2
ytimg.com

२००० मध्ये प्रीती झिंटा हिचा ‘क्या कहना’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये जेव्हा प्रिती झिंटा घरी परत येते, तेव्हा हे गाणे आहे. हे गाणे ५० च्या दशकातील नील सेदाका यांच्या ओ कॅरोल या गाण्यामधून घेतले गेले आहे.

 

 

४. खल्लास…

 

copy song.marathipizza3
ytimg.com

२०१६ मध्ये आलेला वीरप्पन हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. या चित्रपटामधील झरीन खानचं खल्लास हे गाणं इशा कोप्पीकरच्या खल्लास गाण्याशी मिळते जुळते घेतले आहे. पण हे गाणे डिलॉन फ्रान्सिस आणि डिजे स्नेक यांच्या गेट लो या गाण्यामधून घेतले आहे.

 

 

५. प्यार तो होना ही था…

 

copy song.marathipizza4
webmusic.pw

 

१९९८ मध्ये आलेला प्यार तो होना ही था हा चित्रपट हॉलीवूड चित्रपट फ्रेंच किसचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि काजोल यांनी काम केले होते. त्यामध्ये रोमांटिक कॉमेडी दाखवण्यात आली होती. या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकच्या सुरवातीचे संगीत हे ब्रायन अॅडमच्या have you ever really loved a woman या गाण्याच्या संगीताशी तंतोतंत जुळते.

 

 

६. दिल चीझ तुझे दे दी…

 

copy song.marathipizza5
ytimg.com

२०१६ मध्ये अक्षय कुमारचा एअरलिफ्ट हा चित्रपट आला होता. कुवेतमधून भारतीय लोकांना सुखरूप सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यामध्ये दाखवलेले आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये हे गाणे आहे. लोकांना वाटते की, हे गाणे मिल्क आणि हनी यांच्या दीदी या गाण्यावरून घेतले आहे. पण खरेतर हे गाणे १९९२ मधील दीदी या गाण्यापासून घेतले आहे, जे नायजेरीन कलाकार छेब खलीफ याने बनवले होते.

 

 

७. दिलने दिल को पुकारा…

 

copy song.marathipizza6
sargambook.com

२००० मध्ये ॠतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट आला होता. राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेला आणि राजेश रोशन हे संगीतकार असलेल्या या चित्रपटामध्ये हे गाणे होते. या गाण्याच्या सुरवातीला एक संगीत आहे, जे द वॉइसेसच्या वेन्जेलीस या गाण्यामधून घेतले आहे.

 

 

८. बुलेया…

 

copy song.marathipizza7
lyricsted.com

२०१६ मध्ये आलेल्या रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटामध्ये हे गाणे आहे. अनुष्काचे लग्न झाल्यानंतर जेव्हा रणबीर कपूर मनात दुःख घेऊन परततो आणि त्याची ऐश्वर्या शी भेट होते. त्यानंतर बुलेया हे गाणे आहे. काही लोकांना वाटते की, हे गाणे पापा रोचच्या लास्ट रेसॉर्टमधून घेतले आहे. पण खरेतर हे गाणे आयर्न मेडन याच्या गेंगीस खान या संगीतामधील आहे.

 

 

९. नशे सी चढ गई…

 

copy song.marathipizza8.
lyricsjet.com

२०१६ मध्ये आलेल्या रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणे रिलीज झाल्यावर यूट्यूबवर खूप गाजले होते. पण चित्रपट एवढा काही प्रेक्षकांना आवडला नाही. ‘नशे सी चढ गई’ हे गाणे एका कार्टूनमधील junjou romantica track १ च्या संगीतामधून घेतले आहे.

 

 

१०. पहली नजर मैं…

 

copy song.marathipizza9
ytimg.com

२००८ मध्ये आलेल्या सैफ आली खानच्या ‘रेस’ या चित्रपटामध्ये हे गाणे आहे. त्यावेळी अतिफ अस्लमने गायलेले हे गाणे खूप चर्चेत होते. हे गाणे कोरियन कलाकार किम ह्युंगच्या  sarang hae yo या गाण्यामधून घेतले आहे.

 

 

काय मग, ह्याला अशीही फसवाफसवी म्हणायचं का?

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?